पावसाळा सुरु झाला कि ,उन्हामुळे निर्माण झालेली वातावरणातील उष्णता कमी होऊन हवेत गर्व निर्माण होतो,. पावसाळा सुरु झाला कि अनेक आजारांना हि निमंत्रण दिले जाते. हवेच्या दामटपणामुळे विषाणूंची वाढ होते. पावसामुळे न वळणारे कपडे ,सामानाला येणारी बुरशी तसेच एकसारखा पडणारा पाऊस त्यामुळे दोन तीन दिवस कपडे वळत नाहीत . त्यामुळे पावसाळ्यात आपल्या कपाटात जास्तीचे कपड्यांचे सेट असलेले बार असते. पावसाळ्यात पावसात बिजलेले कपडे तसेच रोजचे धुतलेले कपडे ते लवकर वळत नाहीत. तसेच कपडे वळायला वेळ लागतो .
पावसाळा सुरु झाला कि ,मनात पहिला प्रश येतो तो म्हणजे ओले कपडे आणि घरात दरवळणारा तो कुबट वास आणि धुतलेले कपडे आणि पावसात भिजलेले कपडे ते कसे वळतील आणि त्यासाठी काय करता येईल . यासाठी आपण खालील प्रमाणे उपाय पाहणार आहोत.
१)मित्रानो, तुम्ही तुमचे कपडे जर वॉशिंग मशीन मध्ये लावत असाल तर ते कपडे धूवून झाल्यावर दोन वेळा ड्राय करून घ्या जेजे करून ते कपडे लवकर वळतील. तसेच जर तुम्ही हातानी कपडे धुवत असाल तर ते घट्ट पिळून मग ते झटकून वळत घाला त्यामुळे ते लवकर वाळण्यास मदत होईल आणि घरात कुबट वास हि येणार नाही.
२)मित्रानो धुतलेले कपडे हे तुम्ही बंदिस्त जागी ठेऊ नका ते हवेशीर ठेवा जेणे करू हवा लागून ते कपडे लवकर वळतील. आपण जर दिवसभर घरात घरात नसाल बाहेर असाल तर कपडे घरात व्यवस्तीत वळत घाला जेणे करून ते कपडे दिवसभरात वळतील .
३)मित्रानो, हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे द्रयार उपलब्ध आहेत. ज्यामुळे कपडे व्यवस्तीत ड्राय होतात आणि आपल्याला ओल्या कपड्याचा हि काही टेन्शन नाही. ते ड्रायर असल्यामुळे नंतर कितीही पाऊस पडला तरी आपल्याला कपडे कसे वळतील हा प्रश्न पडणार नाही.
४)आपण कपडे वळत घालताना जर त्या कपड्याना एकाच बाजूने हवा लागत असेल तर ते त्याच बाजूने वाळतात आणि आतील बाजूनी तसेच ओले राहतात . त्यामुळे आपण रात्री झोपताना न विसरता ते कपडे दुसऱ्या बाजूने म्हणजे पालटून टाकायचे मग ते सकाळपर्यंत ते आतील बाजूनी पण व्यवस्तीत वाळतात .




