लाईफस्टाईल

शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या तळपायाला लावा हि एक वस्त्तु, सर्व बाधा दूर होईल

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो कोणत्याही शनिवारी रात्री झोपताना आपल्या तळपायांना हि एक वस्तू आपण नक्की लावा ह्याने तीन प्रकारचे लाभ होतात पहिली गोष्ट जर घरात आपल्या सतत भांडणे होत असतील घरात अशांतता असेल तर अशी भांडणे क्लेश वादविवाद ह्याने दूर होतात व घरात सुखशांती नांदू लागते. दुसरी गोष्ट आपल्या कुंडलीत कोणत्याही प्रकारचा शनिदोष असेल मग कोणत्याही प्रकारचा असेल, जसे कि शनीची साडेसाती चालू असेल किंवा शनीची अडीचकी किंवा महादशा अंतर्दशा चालू असेल तर अश्या सर्व प्रकारचे शनिदोष ह्या आजच्या उपायाने दूर होतात.

आपण हा उपाय कमीत कमी ३ शनिवार सलग करायचा आहे जास्त वेळा केला तर ह्यामुळे आपल्याला लाभच प्राप्त होतो. घरातील ज्या कोणत्या व्यक्तींना त्रास होतोय अश्या व्यक्तीने हा उपाय शनिवारी रात्री झोपताना करू शकता. आणखी एक लाभ ह्या उपायाने होतो तो म्हणजे घरात जर आपल्या लक्ष्मी टिकत नसेल गरिबी असेल आजारपणामध्ये किंवा आणखी काही वायफळ ठिकाणी आलेला पैसे खर्च होत असतील. ज्या प्रमाणात पैस्यांची आवक असायला हवी तुमच्या उद्योगधंद्यातून ती जर घरातून येत नसेल तर त्यासाठी देखील हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे.

परंतु शनिदोषामुळे जी पैसा येणे थांबलेले आहे त्यासाठी ह्याचा फायदा होतो. कधी कधी शनी इतर ग्रहांशी दृष्ट युती करतो जसे कि राहू किंवा केतू असेल किंवा इतर ग्रहांशी काही अशी युती निर्माण होते ज्यामुळे आपल्या कुंडलीतील धन प्राप्तीचे योग नाहीसे होतात. पैसा येता येता थांबतो, मित्रांनो आजच्या उपायासाठी जी वस्तू आपण वापरायची आहे ती म्हणजे मोहरीचे तेल.

हिंदीत ह्याला सरसो का तेल असे देखील संबोधतात. ह्यासोबत आपण तेलात आपण काळे तीळ टाकायचे आहेत अगदी एक चिमूटभर टाकले तरी पुरेसे आहेत. हे दोन पदार्थ म्हणजेच काळे तीळ व मोहरीचे तेल असे एकत्र आपण थोडे तापवायचे आहे जेणेकरून त्या दोन पदार्थांचा अर्क एकत्र होईल आणि रात्री झोपण्यापूर्वी आपण हे तेल आपल्या तळपायांना चोळायचे आहे. थोडेसे तेल जे आहे ते आपण आपल्या भुवयांना लावायचे आहे दोन्ही भुवया व दोन्ही तळपाय ह्यांना हे तेल लावायचे आहे.

ह्यानंतर आपण झोपी जायचे आहे. ज्या काही बाधा असतील जे काही दोष असतील ते तात्काळ सर्व दूर होतील. ह्या उपायादरम्यान आपण आपल्या कुलदेवतेचे स्मरण करण्यास विसरू नये. काही दिवसांतच आपल्याला ह्याचा परिणाम दिसून येऊ लागेल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट