वास्तू शास्त्र

घराजवळ जर हे झाड असेल तर चमकून उठेल तुमचे नशीब.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत असे झाड जे तुम्ही तुमच्या अंगणात किंवा अगदी घराजवळ जरी लावले तरी, घराच्या आसपास कोणतीही नाकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही कुठल्याही प्रकारची नकारात्मकता तुमच्या घराजवळ देखील फिरकणार नाही. तुमचे घर सुरक्षित होईल. हा अनुभव तुम्हाला आलाच असेल कि अनेक जण तुमच्या प्रगतीच्या आड येतात.

अनेकांना तुमचे पुढे जाणे प्रगती होणे बागवत नाही. अश्या लोकांच्या नाकारात्मक विचारांचा प्रभाव तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर किंवा तुमच्या घरावर देखील होतो. जेव्हा ती लोक तुमच्या घरी येतात तेव्हा तुम्हाला जाणवत असेल कितीही प्रयत्न केले, कितीही प्रगती केली तरी प्रगती होत नाही. घरात पैसा टिकत नाही, त्याचबरोबर घरात असुरक्षित वाटयाला लागते हे सर्व दोष निर्माण होतात.

म्हणूनच हे सर्व दोष दूर करण्यासाठी असे हे एक झाड आहे जे आपण आपल्या घराच्या शेजारी किंवा अंगणात लावावे. ह्यामुळे सकारात्मक शक्ती वाढीस लागतात आपले मन शुद्ध होते, प्रगती होते. ह्या झाडाचे महत्व इतकेच नाही तर सर्व प्रकारच्या संकटातून सुद्धा हे झाड तुमचा बचाव करेल. तुमच्या जीवनात काही संकट आलेली असतील तर त्यांना सामोरे जाण्यासाठी ताकद तुम्हाला देईल.

तुमच्या घरातील काही वादविवाद असतील, पतिपत्नीमध्ये काही भांडणे असतील किंवा आणखी काही घरातील वाद असतील तर हे सर्व वाद ह्या झाडाच्या सकारात्मक शक्तीने दूर होऊ शकतात. थोडक्यात सकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे काम हे झाड करते. पण कोणते झाड आहे हे, हे झाड म्हणजे गणपती देवांचे स्वरूप मानले जाते. ह्या झाडाचे नाव आहे पांढरी रुई, अनेक जण ह्याला मंदार वृक्ष ह्या नावाने देखील ओळखतात.

असे हे पांढऱ्या रुईचे झाड आपण आपल्या घराजवळ नक्की लावावे. अश्या झाडात गणपती बाप्पांचा वास असतो असे म्हण्टले जाते. गणपती बाप्पा हे ६४ कलांचे अधपती आहेत, त्यामुळे प्रामाणिक कष्ट करणाऱ्या लोकांना गणपती बाप्पा नेहमीच चांगले फळ देतात, आपण गणपती बाप्पांची कशी पूजा करतो त्याचप्रकारे ह्या झाडाची देखील पूजा आपण करायची आहे. जशी तुळशीची पूजा करतो तश्या पद्दतीने पूजा केली तरी चालेल. ह्यामुळे घरात सकरात्मक शक्ती निर्माण होते.

शास्त्र असे सांगते कि आपण कपभर दूध आपण पांढऱ्या रुईला अर्पण करावे ज्यांना शक्य नसेल त्यांनी कपभर पाणी घेऊन त्यात दुधाचे २ थेंब टाकावेत आणि असे दूधमिश्रित पाणी आपण त्या झाडाला घालावे. श्रद्धापूर्वक आपण त्या रुईच्या झाडाला पाणी अर्पण केले तर रुईचे झाड आपल्याला चांगलीच फळे अर्पण करते. त्यामुळे तुमच्या घरावर कोणतेही प्रकारचे संकट आले तर त्यापासून गणपती बाप्पा तुमचे रक्षण करतात, असे हे झाड आहे.

जर तुम्ही घरातून महत्वाचे काम करण्यासाठी बाहेर पडत असाल त्यावेळी आपण ह्या झाडाचे फुल आपण आपल्या सोबत बाळगावे जे काम करण्यासाठी निघाले आहेत ते काम देखल पूर्ण होणार अशी देखील श्रद्धा आहे. कोणत्याही प्रकराची अडचण तुम्हाला कामात येणार नाही.

तुम्हाला तुमच्या पैस्यांची अवाक जर वाढवायची असेल तर तुम्ही ज्या ठिकणी तुमचे पैसे ठेवतात त्या ठिकाणी आपण ह्या रुईच्या झाडाचे फुल आणि तुळशीचे पान आपण नित्यनियाने ठेवा. ह्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. पण रोजच्या रोज आपण फुल व तुळशीचे पण बदलावे सुकलेले फुल किंवा पान चुकनही ठेवू नये.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट