धार्मिक

घरामध्ये इथे काढा एक स्वस्तिक.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो स्वस्तिक चिन्ह हे मंगलतेचे प्रतीक आहे. आपण घरामध्ये किंवा आपल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा आपल्या ऑफीस मध्ये योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी हे चित्र काढले तर आपल्याला अपेक्षित असलेला लाभ नक्कीच भेटतो. जर तुमच्या जीवनामध्ये खुप सारी दुःख संकटे असतील किंवा धनप्राप्ती होत नाही. घरामध्ये क्लेश होत आहेत. घरामध्ये सुखशांती नांदत नाहीये. अश्या अनेक प्रकारच्या समस्यांवर योग्य प्रकारे काढलेलं स्वस्तिक चिन्ह हा ह्या समस्या दूर करते. मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल कि आपण कोणत्याही शुभ वेळी कोणतेही मंगल काम प्रारंभ करताना आपण स्वस्तिक चिन्ह काढतो आणी ह्या स्वस्तिक चिन्हाची पूजा करतो. असे म्हणतात की आपण हे केल्याने आपण जे मंगल कार्य जे करणार आहोत ते सफल होते.

हिंदुधर्मशास्त्रानुसार स्वस्तिक चिन्ह हे विघ्णहर्ता गणेश आणि धनाची देवता माता लक्ष्मी यांच प्रतीक आहे. आणि ज्याठिकाणी हे स्वस्तिक असेल त्या ठिकाणची नकारात्मकता बाहेर पडते आणी त्याठिकाणी साकारत्मकता वास करते. गणेशाच्या कृपेने त्या ठिकाणची त्या वास्तूवर येणारी संकटे दूर होतात आणि माता लाक्षिमीची त्या ठिकाणी त्या वास्तूवर आपली कृपादृष्टी ठेवते. मित्रांनो ह्या स्वस्तिक मध्ये असणाऱ्या ४ रेषा ४ दिशांचे प्रतिनिधीत्व करतात. ह्या ४ रेषा ४ वेदांचं प्रतीक आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. हे ४ वेड म्हणजे ४ रेषा आहे. ह्या स्वस्तिकचा जो मध्यबिंदू आहे तो भगवान विष्णूंची नाभी दर्शवतो. आणि ह्या नाभीतूनच भगवान ब्रह्मदेव प्रकट झाले होते. आणि ह्याच ब्रह्मदेवांनी ह्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आहे. मित्रांनो हे चिन्ह ज्या ठिकाणी काढलेले असेल त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक रोग उत्पन्न होत नाहीत.

जर आपल्या जीवनामध्ये जर खूप मोठी शत्रू पिढा असेल तर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाजवळ हळदीने स्वस्तिक काढावे जेणेकरून तुमचे शेजारीपाजारी, किंवा ऑफिसमधील कलिक त्रास देत असतील त्यांच्यापासून तुम्हाला मुक्तता भेटेल. मित्रांनो तुमच्या घरात जर वास्तुदोष असतील तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर बाजारातुन ६.५ इंचाचे स्वस्तिक आपल्याला मिळेल ते तिथे लावावे. अनेक प्रकारचे वास्तुदोष ह्यामुळे बरे होतात.

जर घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असेल तर त्यावर उपाय म्हणून आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू किंवा हळदीच्या मदतीने स्वस्तिक चिन्ह काढावे यामुळे आजारी व्यक्ती बऱ्या होतात. आपल्यावर नेहमी समस्या अडचणी येत असतील तर बाजारातून मिळणारे पंचधातूंचे स्वस्तिक चिन्ह आपण आणावे व प्राणप्रतिष्ठा करून ते स्वस्तिक चिन्ह आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर लावावे. जेणेंकरून आपले सर्व अडचणी, समस्या दूर होतात.

ज्यांना धनप्राप्ती करायची आहे ज्यांच्याकडे गरिबी आहे आणि त्यातून मुक्तता हवी असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठयावर दोन्ही बाजूला कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. आणि त्यावरती एक एक मूठभर तांदूळ आपण ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्या तांदळाच्या ढेरावर एक सुपारी जी लाल रंगाच्या धाग्याने बांधून त्या ढिगावर ठेवायची आहे. ह्या उपायाने आपल्या जीवनातील सर्व काही पैस्याच्या अडचणी दूर होतात. पैसे टिकण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट