वास्तू शास्त्र

आपल्या घरातील ठेलेल्या पिण्याच्या पाण्याची टाकी जर ह्या जागी ठेवली तर होते मोठे नुकसान

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनात फार महत्व आहे. बांधकाम करताना वास्तुशास्त्राचा विचार नक्कीच केला जातो कारण घरातील प्रत्येक वस्तू जर योग्य दिशेला असेल तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला दिसायला मिळतात परंतु जर वस्तू योग्य दिशेला नसतील तर त्याचे वाईट परिणाम दिसतात. वास्तुशास्त्रात पाण्याची, देवीदेवतेची ह्यांची प्रेत्येकाची जागा निश्चित आहे.

आपण जर पाण्याच्या ठिकाणी अग्नी आणि अग्नीच्या ठिकाणी पाणी अशी जर योजना केली तर आपल्याला ह्याची अशुभ फळेच मिळतात. वास्तूमध्ये वास्तुपुरुष असतो आणि त्याचे पाय हे नैऋत्य दिशेला असतात तर डोके हे ईशान्य दिशेला असतात. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घराची रचना करावी लागते. आपण बांधकाम करताना आपल्या घरातील बाकीच्या इतर गोष्टींकडे लक्ष देतो परंतु घरात पाण्याची दिशा कोणती, पिण्याचे पाणी कोणत्या दिशेला असावे सांडपाणी कोणत्या दिशेला सोडावे.

पाण्याची साठवणूक कोणत्या दिशेला ठेवावे ह्या गोष्टींकडे आपण सहसा इतके लक्ष देत नाही, आणि मग आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बहुतेकवेळा पाण्याची संबंधी वास्तुदोषामुळे घरात दारीद्र्य देखील येते. घरातील गृहिणी हि सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी आजारी पडते, आरोग्याच्या तक्रारींशी पीडित असते. नेहमी आजारी पडतात. म्हणून घरातील पाण्याची दिशा योग्य असणे फार आवश्यक आहे. चला जाणून घेउयात वतुशास्त्राप्रमाणे पाण्याची योग्य दिशा कोणती आहे ते.

वास्तुशास्त्राप्रमाणे विहीर, बोअरवेल किंवा जलतरण तलाव असेल तर ते घराच्या ईशान्य दिशेला असावेत कारण ईशान्य दिशा हि पाण्याची दिशा आहे. वास्तूशास्त्रानुसार घराच्या ईशान्य भागात विहीर बनवणे अतिशय शुभ मानले जाते. ईशान्य भागात पाण्याचा साठा असल्यास आपल्याला सर्व प्रकारच्या वैभव व ऐश्वर्याची प्राप्ती होते. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेलाच आपण बोअरवेल घ्यावी त्यामुळे आपल्या घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते.

वास्तूशास्त्रानुसार जर आपल्याला भूमिगत म्हणजे आपल्याला अशी पाण्याची टाकी बनवायची असेल तर ती घराच्या वायव्य, नैऋत्य, आग्नेय, व दक्षिण दिशेला तर अजिबात बनवू नये. वास्तुशास्त्रानुसार भूमिगत टाकीसाठी सर्वंत्तोम दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय. त्याशिवाय आपण उत्तर, पश्चिम, पूर्वेला देखील आपण भूमिगत टाकी बनवू शकतो जर आपल्याला छतावर टाकी ठेवायची असेल तर ती उत्तर किंवा पश्चिम च्या मधोमध किंवा वायव्य व पश्चिम दिशेच्या मधोमध आपण ठेवावी.

हे पण वाचा :-  या दिशेला नक्की लावा आरसा आर्थिक प्रगती थंबणार नाही. आलेला पैसा बाहेर जारण नाही.

वास्तूशास्त्रानुसार छतावरील टाकी ईशान्य, नैऋत्य व आग्नेय ह्या दिशेला चुकूनही ठेवू नये. वास्तूशास्त्रानुसार आपल्या घरातील सांडपाणी शक्यतो ईशान्य दिशेने बाहेर पडेल अशी वास्तूची बांधणी असावी. घरातील पिण्याचे पाणी हे पूर्व दिशेला असावे. पिण्याच्या पाण्याचे भांडे हे स्वयंपाक घराच्या उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेला भरून ठेवावे. घरातील पिण्याचे पाणी जर योग्य दिशेला भरून ठेवलेले असेल तर कुटूंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. व सुख समृद्धी नांदते.

घरातील कोणत्याही दिशेला पाणी जर नळातून टपकत असेल तर ते लगेच दुरुस्त करावे कारण पाणी हि एक संपत्तीच आहे आणि अश्या प्रकारे जर पाणी वाया जात असेल तर आपल्या घरातील संपत्ती देखील थोडी थोडी कमी होते आणि मग दारिद्र्य येऊ शकते. म्हणून आपण असे वाहणारे पाणी तात्काळ नीट करून घ्यावे. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.