धार्मिक

घरातील भांडणे संपवण्यासाठी ३ उपाय.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्या घरात जर पती पत्नीमध्ये जुळत नाही अगदी छोट्या गोष्टींवरून भांडणे होत असतील घरामध्ये रुसवे, फुगवे वाढलेले असतील, घरातील लहान व्यक्ती मोठ्यांचे ऐकत नाहीत मोठ्यांचा अपमान करतात. मित्रांनो अश्या वेळी घरातील रुसवे, क्लेश, आणि भांडणे दूर करण्यासाठी आणि घरात सुख शांती नांदावी ह्यासाठी काही उपाय आपण करू शकता त्यातील ३ अत्यंत प्रभावशाली उपाय आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

मित्रांनो घरातील भांडणे समाप्त करण्याचा पहिला उपाय, आपण हा उपाय बुधवारच्या दिवशी करायचा आहे. आपण बुधवारच्या दिवशी आपल्या घरातील दक्षिण आणि पश्चिम मधील नैऋत्य कोपरा साफ करा. आपण एक साफ चौरसाकृती एक कापड घ्याचे आहे आणि त्यावर सात प्रकारचे धान्य वेगळे वेगळे धान्य एकत्र करून त्याची आपण पुरचुंडी बांधायची आहे.

अशी हि पुरचुंडी आपण आपल्या घरातील नैऋत्य कोपऱ्यात ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठून स्नान करून झाल्यानंतर आपण हि पुरचुंडी तिथून उचलून आपण आपल्या छतावर किंवा बालकनी मध्ये अंगणात अगदी कुठेही आपण हे धान्य आपण पक्ष्यांना ठेवायचे आहे. दर आठवड्याला हा उपाय करा आपल्या घरातील भांडणे हळू हळू कमी होतील लोक प्रेमाने वागू लागतील.

दुसरा उपाय अत्यंत प्रभावशाली, ह्यासाठी आपल्याला काही तांदूळ लागतील. असे थोडे तांदूळ घ्या व गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या असे दोनी घेऊन त्याची मिक्सर मध्ये पावडर बनवा व दररोज सकाळी आपण देवपूजा झाल्यानंतर आपण ह्यातील पावडर आपल्या मुख्य घरातील दरवाजपासून घरभर शिंपडायची आहे. आपण एकसाथ खूप मोठ्या प्रमाणात हि पावडर बनवून ठेवा व ती पण महिनाभर अश्या पद्धतीने घरभर शिंपडावी. ह्या उपायाने घरातील नाकारात्मक ऊर्जेचा पूर्णतः नाश होतो.

तिसरा उपाय ज्यांच्या घरात कोणत्याही २ व्यक्तींमध्ये भांडणे झालेली असतील व त्यांचे एकमेकांमध्ये पटत नसेल तर आपण हा एक उपाय करावा त्यासाठी आपण एक काचेची बाटली घ्यावी त्यात आपण थोडासा मध टाका व त्यासोबत आपण आपण त्यात एक चमचा साखर व काही गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या टाकायच्या आहेत. त्यानंतर आपण एका सफेद कागदावर लाल रंगाच्या शाईने ज्यांच्यासोबत आपले भांडण आहे त्यांचे नाव आपण त्या कागदावर लिहायचे आहे व तो कागद फोल्ड करून तो कागद आपण त्या बाटलीत टाकायचे आहे. त्या बाटलीतील मध, साखर, चिट्टी, गुलाबाच्या पाकळ्या एकत्र मिक्स करायचे आहे व त्याचे झाकण लावून ती काचेची बाटली आपण आपल्या घरातील नैऋत्य कोपऱ्यात ठेवायची आहे. हा उपाय आपण कोणत्याही दिवशी करू शकता.

दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हि बाटली उघडून ते मिश्रण ढवळायचे आहे व पुन्हा त्याचे झाकण लावून ठेवून द्याची आहे हे आपण १३ दिवस असे दररोज करायचे आहे. व १४ व्य दिवशी आपण हि बाटली आपण कोणत्याही झाडाखाली जाऊन मातीत गाढायची आहे. परत घरी या व देवघरात नमस्कार करा. आपले त्या व्यक्तीसोबतचे भांडण अवश्य संपलेले असेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट