धार्मिक

गुढीपाडवा २०२१: करा लक्ष्मीला प्रसन्न करणारा एक महाउपाय

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो १३ एप्रिल रोजी हिंदू नाव वर्षास सुरु होत आहे. ह्या दिवशी आपण लक्ष्मी मातेस प्रसन्न करणारा हा एक उपाय नक्की करा हा केल्याने आपल्या जीवनातील सर्व काही धनसमस्या दूर होतील. मित्रांनो गुढीपाडवा हा सण नवचैतन्याचे, सुखसमृद्धी, व ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो. गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एकी मुहूर्त मानला जातो. ह्याच दिवसापासून चैत्र नवरात्रीचा पर्व सुरु होतो आणि तो रामनवमीला समाप्त होतो. मित्रांनो ह्या वर्षी गुढीपाडवा महासंयोग साधून आला आहे म्हणजे गुढीपाडवा तर आहेच त्याचबरोबर हा सण मंगळवारी आला आहे. त्यामुळे ह्या शुभ संयोगावर माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा एक उपाय आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

ह्या दिवशी आपण लवकर उठून स्नान व नित्यकर्म करून आपण गुढी आपण मुहूर्तावरच उभी करायची आहे. आणि गुढीचे विधिवत पूजन करावे त्याच्या आधी आपण श्री गणेशाच्या पूजनाने आपन सुरवात करायची आहे कारण कोणत्याही शुभ प्रसांगाची सुरवात आपण गणपतीच्या आशीर्वादाने त्यांच्या पूजनाने करतो. व नंतर गुढी उभा करायची आहे त्यानंतर सर्वकुटुंब गुढीला आपण प्रार्थना करायची आहे. त्यानंतर गोड नेवैद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपण आपल्या पूजा स्थळी आपण माता लक्ष्मीचे आपण पंचोपचार पूजन करायचे आहे. पूजेनंतर आपण माता लक्ष्मीला एक लाल फुल अर्पण करायचे आहे.

त्यानंतर आपण जो उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला ११ कवड्या लागणार आहेत त्या आपण आधीच आणून ठेवाव्यात. मग आपण लक्ष्मी मातेची पूजा झाल्यानंतर आपण एक पिवळ्या रंगाचे कापड ठेवून आपण त्यावर ह्या ११ कवड्या ठेवाव्यात त्यानंतर त्यावर आपण हळदी कुंकू वाहून आपण त्याचे पूजन करावे. त्यानंतर आपण लक्ष्मी मातेचा ओम महालक्ष्मेय नमः ! ह्या मंत्राचा १०८ वेळा जाप करावा त्यानंतर आपण माता लक्ष्मीचे आशीर्वाद घेऊन आपण त्या कवड्या आपण पिवळ्या कपड्यात बांधून त्या आपण आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवाव्यात.

मित्रांनो हा उपायासोबत आपण उद्यापासून नवरात्री सुरु होत आहे तर ह्या नवरात्रीत आपण माता लक्ष्मीचा सप्तपदीचा पाठ चे वाचन केल्याने ह्याचे कित्येक पटीने फायदे आपल्याला मिळतात. ह्याचे शुभ फळ आपल्याला कित्येक पटीने आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण माता लक्ष्मीचे पूजन करून अश्या पद्धीतीने माता लक्ष्मीच्या मंत्राचा जाप व पाठाचे वाचन करा तुम्हाला नक्की त्याचे चांगले फळ मिळेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट