धार्मिक

गुरुवारी केळीच्या झाडाखाली ठेवा एक वस्तू, घरात सुख, शांती, आणि समृद्धी नांदेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो सर्व श्रीमंत लोकांच्या कुंडलीत गुरु ग्रह फार मजबूत असतो ह्या गुरु ग्रहाच्या प्रभावानेच त्यांच्या जीवनात धन, वैभव, पैसे, ऐश्वर्य सातत्याने निर्माण होते. प्रश्न असा आहे की गुरु ग्रहाला मजबूत कस बनवायचं. गुरु ग्रहाची गुरु देवांची कृपा मजबूत कशी करावी. गुरु ग्रहाला गृहस्पती देव ह्या नावाने देखील मानले जाते. आणी गुरुवारच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय करून गुरु ग्रहांची कृपा प्राप्त करू शकता आणि आपल्या देखील जीवनात आपण धन, वैभव, पैसे, ऐश्वर्य ह्याची प्राप्तता करू शकता. एवढेच नव्हे तर ज्यांच्या कामामध्ये नेहमी संकटे येतात अश्या लोकांसाठी देखील आपण आज काही छोटे उपाय आपल्या लेखामध्ये सांगणार आहोत.

मित्रांनो ज्यांना नोकरी आणि उद्योगधंद्यामध्ये आपल्याला सफलता मिळवायची असेल तर आपण गुरुवारच्या दिवशी केळीच्या बुंद्या केळीच्या खोडाला आपण एक तांब्याभर पाणी अर्पण करायचे आहे मात्र हे जल अर्पण करताना सर्वप्रथम आपण केळीच्या झाडाखाली जा मनोभावे प्रणाम करा आणि प्रणाम केल्यांनतर आपण तांब्याभर जल आपण अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर आपण एक शुद्ध तुपाचा दिवा एक अगरबत्ती थोड्या अक्षदा आणि फुले त्या खोडाशी अर्पण करायची आहे आणि प्रसाद म्हणून थोडासा गुळ अर्पण करणार आहोत. सोबतच हरभऱ्याची डाळ हि आपण अर्पण करायची आहे. आणि हि पूजा झाल्यानंतर आपण आपल्या उद्योगधंद्यात व नोकरी मध्ये प्रगती होऊ दे म्हणून आपण प्रार्थना करायची आहे व सोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय…! ह्या महमंत्राचा आपण जाप करायचा आहे. व ॐ बृं बृहस्पतये नमः ! ह्या गुरु ग्रहाला प्रसन्न करणाऱ्या मंत्राचा देखील तुम्ही जाप करा. आणि हे सर्व केल्यानंतर केळीच्या झाडाला १, ७, ११,… , १०८ जेवढ्या शकय असतील तेवढ्या प्रदक्षणा घाला.

मित्रांनो दुसरा उपाय ज्यांच्या घरामध्ये सुखशांती नाहीये त्यांनी ह्या केळीच्या बुंध्याखाली थोडासा गूळ आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ आपण अर्पण करायची आहे. ग्रहस्पती देवांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख समृद्धी नक्की निर्माण होईल, घरातील क्लेश भांडणे असतील तर ती सर्व दूर होऊन घरात आंनदी वातावरण निर्माण होईल. एखादे आपले काम पूर्ण होत नसेल तर ते काम पूर्ण व्हावे म्हणून आपण केळीच्या खोडाशी आपण अशे जल अर्पण करायचे आहे ज्यात थोडीशी साखर आपण टाकून ते पाणी आपण त्या खोडाला अर्पण करायचं आहे. तुमच्या कामातील सर्व अडचणी बाधा दूर होतील व आपली सर्व कामे यशस्वी रित्या पार पडतील.

ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील नवरा बायको मध्ये नेहमी भांडणे होत असतील तर आपण ह्या गुरुवारच्या दिवशी दोन साबूत हळकुंडे व मनुके असे भिजवलेले मनुके आपण केळीच्या खोडाला अर्पण करायचे आहेत. मित्रांनो ७ गुरवार हा उपाय तुम्ही करायचा आहे. ह्या उपायाने विवाहाचे योग देखील जुळून येतात. केळीच्या झाडाला चंदनाची माळ आणि थोडीशी हळद आपण गुरुवारच्या दिवशी आपण अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये सर्व सुख समृद्धी नांदू लागेल आपल्या घरात काही छोटे वास्तुदोष असतील तर तेही आपण आपल्या घरातून दूर होतील.

धनप्राप्तीसाठी आपण चंदनाच्या झाडाचे ९ तुकडे आपण केळीच्या खोडाशी व्हायच्या आहेत आपल्या लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे आपण सर्वप्रथम पूजा करायची आहे आणि नंतर आपण हे चंदन अर्पण करायचे आहे. पूजा करताना आपण भगवन्तांची पूजा करत आहोत असा भाव असायला पाहिजे. तर हे काही उपाय होते जे गुरुवारच्या दिवशी आपण करू शकता जेणेकरून आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी आपण जीवनामध्ये मिळवू शकता. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट