गेले काही वर्ष बंद असलेली पालखी सोहळा यंदा सुरू होणार आहे. आषाढी वारी पंढरपूरची पुन्हा सुरु होणार आहे. यावर्षी जवळपास सर्व बंधने संपली असल्यामुळे शासनाकडून पालखी सोहळा सुरु करण्यासाठी मान्यता देण्यात अली आहे. गेले दोन वर्ष पालखी सोहळा झाला नव्हता. यामुळे पालखी सोहळ्यात भाग घरणारे सर्व भक्त खुप आनंदात आहेत.
गेले दोन्ही वर्ष पालखी एसटी बसने पंढरपूरला जात होत्या. मात्र यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातुन चंद्रभागेच्या वाळवंटात सर्व पालख्या आणि पंडुरंगाचे भक्त येणार आहेत. यावर्षी सर्व वरकऱ्याना आषाढी एकादशीचा सोहळा चालत जाऊन त्यात सहभागी होता येणार आहे. यावर्षी होणाऱ्या पालखी सोहळ्याचा कर्यक्रम पत्रिका प्रसीद्ध करण्यात अली आहे.
जून महिन्याच्या २१ तारखेला संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान होणार असून या पालखी मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. फलटण मध्ये हि पालखी दोनदिवस तर लोणंदमध्ये हि पालखी अडीच दिवस रहाणार आहे. यामुळे गेल्या काही वर्षा पेक्षा यंदाचे पालखीचे काही दिवस वाढले जाणार आहेत. तसेच यावर्षी पासून वहाण पास कोणत्याही दिंडीला हवे असेल तर संस्थांच्या सही आणि शिक्का सोबत पास दिला जाणार आहे. पण त्यासाठी मागणी करणे अवश्य आहे. याबद्दल ची महती ॲड. विकास ढगे पाटील यांनी दिली आहे. हे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख आहेत.
पालखी नियोजनाची बैठक नुकतीच संत ज्ञानेश्वर महाराज मठात पार पडली होती. बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असुन पालखी सोहळ्याचे ते प्रमुख आहेत. तसेच या सोहळ्याचे विविध अधिकारी या बैठीला उपास्थित होते. या बैठकीत बरेच विविध विषयावर चर्चा झाली आणि काही नवीन निर्यण सुद्धाझाले अशी माहिती आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे वेळापत्रक
- जून २१ मंगळवार या दिवशी ४ वाजता सायंकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानआनंदी येथून होईल.
- दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ बुधवारी आणि २३ गुरुवारी पुणे मुक्कामी असेल. तर २४ शुक्रवार आणि शनिवार २५ रोजी सासवडला असेल.
- २६ रविवार २६ रोजी जेजुरी, वेळेला २७ सोमवार यादिवशी, तर २८ आणि २९ रोजी लोणंद ला असेल.
- ३० जून ला तरडगांवला तर जुलै १ आणि २ ला फलटण याठिकाणी असेल.
- जुलै ३ ला रविवार या दिवशी बरडला, सोमवारी ४ रोजी नातेपुतेला असणार आहे. माळशिरसला ५ मंगळवारला असणार आहे.
- ६ रोजी बुधवार वेळापूर, तर भांडीशेगावला गुरवार ७ ला असणार आहे.
- वखरी शुक्रवार ८ रोजी असेल तर श्री क्षेत्र पंढरपुरला मुक्कामी शनिवार ९ यादवीशी पोहोचेल.
- आषाढी एकादशीचा महासोहळा रविवारी १० जुलै रोजी होणार आहे.
- चांदोबाचा लिंब , बाजीराव विहीर व इसबावी येथे पालखीचे उभे रिंगण होणार आहे.
- पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.
संत तुकाराम पालखी वेळापत्रक
- 20 जून 2022 – पालखी प्रस्थान
- 21 जून 2022 – आकुर्डी
- 22 आणि 23 जून 2022 – नानापेठ, पुठे
- 24 जून 2022 – लोणी काळभोर
- 25 जून 2022 – यवत
- 26 जून 2022 वरवंड
- 27 जून 2022 – उंडवडी
- 28 जून 2022 – बारामती
- 29 जून 2022 – सणसर
- 30 जून 2022 – आंधुर्णे
- 1 जुलै 2022 – निमगाव केतकी
- 2 आणि 3 जुलै 2022 – इंदापूर
- 4 जुलै 2022 – सराटी
- 5 जुलै 2022 – अकलूज
- 6 जुलै 2022 – बोरगाव
- 7 जुलै 2022 – पिराची कुरोली
- 8 जुलै 2022 – वाखरी
- 9 जुलै 2022 – पंढरपूर
- 10 जुलै 2022 – आषाढी एकादशी
वारी मध्ये ज्या वाहनांना पास नाहीत आहे गाड्या वारीत सोदुनयेत. तसेच पास देताना सुस्थेचा शिक्का आणि सही त्या पासवर अवश्य करावी जेणेकरून ओळख लगेच पटेल. तसेच बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे काम चालू असल्यामुळे काही पालखीचे ठिकाणी बदल्यांत अली आहेत. फक्त जेवणाची. त्याच सोबत सर्व वारकऱ्यांची संसर्गा संबंधीची नियमांचे पालन अवश्य करावे.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.




