नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, मित्रांनो ज्यांच्या केसात सारखा कोंढा होतो ज्यांचे केस गळतात ज्यांच्या केसात सतत गुंता होतो, केस चिकट होतात अश्या सर्व लोकांनी आजचा उपाय नक्की करून पहा. अगदी नक्की तुमची केस गळती थांबून तुमची केस वाढतील. केस अगदी इतकी वाढतील कि लोक देखील तुम्हाला विचारतील.
ह्या उपायाने आपला सर्व डोक्यातील कोंढा गायब होईल तसेच केसांतील कसलेही इन्फेकशन झाले असेल तर ते सर्व दूर होईल. डोकं खाजणे, तसेच ज्यांची केस चिकट होतात त्यामागील प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या केसांच्या मुळांशी तेल जाऊन बसते, व तिथे फॅट तयार होते व त्यामुळे केसांची मुले पॅक होतात व त्यामुळे केसांची वाढ होत नाही, केसांमध्ये कोंढा होतो.
केसांत आपल्या धूळ जाऊन बसते ती काही केला निघत नाही, अगदी सर्वांवर म्हणजेच पांढरा कोंढा असुदे, किंवा काही असुदे त्यावर रिस्ल्ट देणाराच. हा उपाय आयुर्वेदिक आहे, ह्याचा कसलाही साईड इफेक्ट नाहीए. आजच्या उपायासाठी आपण वापरणार आहोत ते म्हणजे कोरफड ज्यालाच इंग्रजी मध्ये एलोवेरा(alovera) असे देखील म्हणतात. केसांच्या उपायांसाठी अगदी प्राचीन काळापासून आपण हि कोरफड वापरत आलेलो आहोत. ह्या कोरफडीचे अनेक फायदे आहेत, जर कोणाच्या आतड्याला सूज आलेली असेल तर ती सूज कमी होते.
मधुमेह, कावीळ अश्या अनेक रोगांमध्ये हि कोरफड फायदेशीर ठरते. आता जर केसांच्या बाबतीत जर आपण पहिले तर आपण एक शाम्पू बनवायचा आहे, अगदी आयुर्वेदिक शाम्पू. अगदी २ मिनटात बनवायला वेळ लागतो. दुसरा एक उपाय आहे तो देखील आपण आजच्या लेखात पाहुयात हे दोन्ही उपाय केले तर आपल्या केसांच्या सर्व काही समस्या असतील त्या सर्व समस्या दूर होणार.
पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात शाम्पू कसा बनवायचा आहे ते, तर त्यासाठीच आपण कोरफड घ्याची आहे ती तोडून आणल्यानंतर तिला ज्या बाजूने तोडले आहे त्या बाजूने आपण पाण्यात ठेव्याचे आहे जेणेकरून त्यातील सर्व चीक असतो त्यातील तो निघून जातो. त्यानंतर आपण कोरफड घेऊन त्यावरील साल काढून घ्याची आहे व त्यानंतर आपण त्यातील गर आपण चाकूच्या साह्याने आपण काढून घ्याचा आहे. हा गर आपण एका वाटीत काढून घ्याचा आहे त्यानंतर आपण ह्या वाटीत अर्धा लिंबू पाळायचे आहे.
त्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घ्या म्हणजेच लिंबाचा रस आणि कोरफडीचा गर असे हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या, आता ह्या मिश्रणात आपण अर्धा ग्लास पाणी आपण टाकायचे आहे. तर अश्या प्रकारे झाला तयार आपला शाम्पू.
तर हा शाम्पू लावायचा कसा, सर्वात आधी आपण आपल्या शाम्पू ने डोकं धोईचे त्यानंतर आपण आपन बनवलेला कोरफडीचा शाम्पू आपण वारपायचा आहे. त्यानंतर आपण हा शाम्पू आपल्या केसांना अगदी मुलांपासून व्यवस्थित लावून घ्याचा आहे व तो तसाच साधारण ३ ते ४ मिनटे ठेवून द्या. त्यानंतर आपण हे धुवून घ्याचा आहे.
हा शाम्पू आपण अगदी महिन्यातून २ वेळा करून आपल्या केसांना लावला तरी चालेल. आता ह्याच्या सोबतीला एक आणखी एक उपाय, नेहमी प्रमाणे आपण आपण कोरफडीचा गर आपण घ्याचा आहे, आता ह्यामध्ये आपण एक चमचा खोबरेल तेल टाकायचे आहे. त्यानंतर आपण हे सर्व चांगले मिक्स करून घ्याचे आहे.
ह्याआधी आपण एक शाम्पू बनवला होता तो आपण केसांना लावून झाल्यानंतर एका आठ्वड्यानी आपण हा एक उपाय करायचा आहे. ह्या उपाय करताना मात्र हे अंघोळ करण्यापूर्वी आपण हे कोरफड व तेलाचे मिश्रण आपण केसांना लावायचे आहे. अगदी मुळांना आपण हे असे मिश्रण चांगले लावून घ्याचे त्यानंतर ते मिश्रण आपण केसांवरती तसेच एक तासभर ठेवायचे आहे त्यानंतर आपण केस धुवायचे आहेत.
त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी तुम्हाला आपला दररोजचा शाम्पू लावायचा असेल तर लावू शकता किंवा तसेच ठेवले तरी चालेल. कारण ह्या कोरफडीच्या गुणधर्म आपल्या केसांच्या मुळांशी टिकून राहिला पाहिजे. बरेचजण हे मिश्रन लावलेत व लगेच शाम्पू ने धुवून टाकतात त्यामुळे त्याचा गुण नष्ट होतो, म्हणून हि काळजी नक्की घ्या. हा उपाय आपण पंधरा दिवसातून एकदा करा. मित्रांनो हे उपय करून पहा तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होतील.




