मित्रांसोब आपले वाद विवाद होत नाही असे नाही. त्याच बरोबर इतर व्यक्ती सोबत सुद्धा आपले वाद होत असतात. या वादा मागे काही शुल्क गोष्टी असतात. पण आपण त्या गोष्टीचा खूप मोठा तर्क वितर्क काढत बसतो. अशा सवयी मुळे आपले त्याच्या सोबत मतभेत हॊत जातात आणि आपण ठरून ठेवतो कि हा व्यक्ती चागला नाही. याचे मत आपल्याबद्दल चागले नाही. तो नेहमी स्वतःचा विचार करत असतो. आपण त्याचा सोबत सर्व गोष्टी शेयर करतो आपण त्यांनी एखादी गोष्ट का सागितली नाही.
आपण आज काही गोष्टी पाहणार आहोत त्यामुळे आपला वाद कोणासोबत सुद्धा होणार नाही. जर का आपण असाच दृष्टिकोन ठेवला तर त्याचे परिणाम खूप चागले येतात. आणि वाद विवाद होणार नाहीच शिवाय आपली प्रतिमा सर्वाना चागली वाटायला लागेल. या साठी आपल्याला खुप मोठा तप, पूजा असे काही करायचे नाही. ज्या गोष्टी मुळे आपला वाद होत आहे त्याच्या कडे एका वेगळ्या दृष्टी कोनातून पहायचे आहेत.
आपला दृष्टिकोन कसा ठेवायचा या बदल एक उदाहरण पाहू. आपला एक चागला मित्र आहे. आपण त्याच्या सोबत नेहमी सर्व गोष्टीवर चर्चा करत असतो. अशाच एका दिवशी दोघाना पण एक सारखी वस्तू बाजारातून आणायची असते. आपण काही कारणांमूळे आपला मित्र बाजारात जातो आणि स्वतः साठी ती वस्तू घेऊन येतो. आणि आपल्याला नंतर त्याच्या या कृती बदल समजते. आणि आपण त्याच्या बदल लगेच वाईट मत मांडून ठेवतो.
त्या वेळेस आपण आपल्या थोडा दृष्टीकोन बदला तर खुप फरक पडतो. त्या मित्राने न कळत ती कृती केलेली असते तो काही कामासाठी बाजारात गेला होता आणि त्यावेळेस त्यानी ती वस्तू आणली आहे. यामागे त्याचा दुसरा कोणताही हेतू मानतात नव्हता. पण आपण त्याच्या बदल वाईट विचार करून त्याला स्वार्थी विचार जाणारा असे बनवून टाकतो.
एखाद्या व्यक्तीची न कळत कृती होऊन गेली असेल तर तो व्यक्ती वाईट मनाचा नसून फक्त एक कृती चुकली आहे. आणि आपण अशा छोटया गोष्टीचे मानत न ठेवता ते लगेच विसून जायला हवे. त्या व्यक्तीच्या इतर चलगल्या गोष्टी लक्षात ठेऊन त्याचा बदल वाईट विचार करणे लगेच बंद करावे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात असुद्या आपला राग हाच आपला खरा शत्रू आहे. कोणत्याही छोट्या गोष्टीचा राग लोभ न ठेवता त्यातून शांततेने मार्ग काढावा.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




