वास्तू शास्त्र

घरात ह्या दिशेला खिडकी असल्याने घरात येतो, पैसा धन व आरोग्य.

मित्रांनो आजच्या लेखात आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्रातील काही खिडक्या संबधीचे काही नियम. घरात खिडक्या कश्या असाव्यात, कोणत्या दिशेला असाव्यात ह्या खिडक्यांची संख्या किती असावी आणि त्यांचे नियम. मित्रांनो खिडकी हा वास्तुशास्त्रातील फार महत्वाचा घटक आहे. घरातील खिडक्या योग्य जागी असतील तर त्यामुळे घरात सुख शांती व घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. मात्र चुकीच्या दिशेला असलेल्या खिडक्या, घरात समस्या निर्माण करू शकतात. म्हणुनच आजचा लेख आपण खिडकीविषयी आपण पाहणार आहोत.

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार खिडक्यांना वास्तूचे जणू डोळेच समजले जाते, म्हणजेच आपल्या वास्तूचे डोळे म्हणजे घराच्या खिडक्या म्हणूनच घरातील खिडक्यांचा आणि वास्तुसौख्यायचा जवळचा संबंध आहे. खिडक्या किती असाव्यात हे पाहण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या कि आपण आपल्या घराच्या खिडक्या ह्या कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका. मित्रांनो दक्षिण दिशा हि मृत्यूची दिशा यम ह्यांची दिशा आहे म्हणून दक्षिण दिशेला असणाऱ्या खिडक्या ह्या वाईट फळे घेऊन येतात. ह्यामुळे अनेक वाईट प्रसंग घरावर येऊ शकतात.

मित्रांनो वारंवार अपघात होणे ह्याचे मुख्य कारण हे दक्षिण दिशेच्या खिडक्या आहेत, म्हणून अश्या खिडक्या ताबड्तोक आपण मुजवून टाकाव्यात. दुसरी दिशा आहे ते म्हणजे पूर्व दिशा, ह्या जर दिशेला खिडक्या असतील तर त्यामुळे घरातील व्यक्ती बुद्धिमान बनतात. ज्यांच्या घरात विद्यार्थी दशेतील मुले आहेत त्यांच्या घरात तर पूर्वेलाच खिडक्या असतील ह्याची काळजी घ्यावी.

आणखी एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे घरात पूर्वेला खिडक्या असल्याने घरात रोगराई राहत नाही. तर असे दोन फायदे म्हणजे रोगराई निवारण व बुद्धिमतेसाठी ह्या दिशेला खिडकी असने खूप फायदेशीर आहे. मित्रांनो जर आपल्या घरात लक्ष्मी नसेल धन संपदा नसेल तर आपल्या घराच्या खिडक्या आपण उत्तर दिशेला ठेवायला हव्यात, ज्यांच्या घरात उत्तर दिशेला खिडक्या असतात त्या घरात भरपूर पैसा येतो. आर्थिक काळजी त्या घराला भासत नाही.

पश्चिमेला जर खिडक्या असतील तर काय होते. मित्रांनो ह्या दिशेला खिडकी जर असेल तर फायदे ना तोटा होतो म्हणजेच आपल्याला ह्यामुळे काही नुकसान होत नाही व आपल्याला ह्याचे जास्त काही फायदे देखील होत नाहीत. मित्रांनो घरात खिडक्या किती असाव्यात. मित्रांनो घरात खिडक्या अगदी कितीही असूद्यात मात्र त्यांची संख्या हि सम संख्या असावी. २, ४, ६ ह्या संख्येत असाव्यात. विषम संखेत त्या अजिबात नसाव्यात.

नंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील ज्या काही काचा आहेत त्या फुटक्या नसाव्यात. बऱ्याचदा कोणत्या तरी कारणाने खिडकीची काच फुटलेली असेल तर आपण ती काच लगेच बदलून घ्यावी कारण फुटक्या काचेमुळे घरात अनेक प्रकारचे वास्तुदोष निर्माण करतात. खिडक्यांना रंग द्यावा कि नाही तर मित्रांनो अवश्य आपण खिडक्यांना रंग देऊ शकता. रंगाबद्दल आपल्याला कोणतेही नियम सांगितलेले नाहीत. मॅत्रर खिडक्या ह्या आतील बाजूस उगडणाऱ्या असाव्यात.

तर मित्रांनो हे काही वास्तुशास्रातील खिडक्यासंबंधी नियम होते. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही, धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट