या पाच गोष्टी लक्षात ठेवा ज्यावेळेस कोणालाही पैसे उधार देण्याआधी.
लाईफस्टाईल

या पाच गोष्टी लक्षात ठेवा ज्यावेळेस कोणालाही पैसे उधार देण्याआधी.

बऱ्याच व्यक्तीना अनेक अनुभव आले असेल कि आपल्या जवळच्या व्यक्तीला पैसे उधार दिले आहेत आणि त्या व्यक्तीने गरजेच्या वेळी वापस केले नाहीत. काही व्यक्ती पैसे घेताना वेळेवर फोन करतात, आपल्या तब्यतेची काळजी घ्या असे वारंवार संगतात आणि पैसे घेतले कि पुन्हा साधा फोन सुद्धा करत नाही. काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ज्या वेळेस पण पैसे कोणाला उधार देत असतो.

आज आपण असे काही नियमा बद्दल बोलणार आहोत. ज्या वेळेस आपण कोणाला जर पैसे उधार देणार आहोत त्या वेळेस त्याचा उपयोग नक्की होणार आहे. जेणेकरून समोरचा व्यक्ती पैसे उधार घेऊन गेला कि तो पुन्हा वापस करेल. पैसे उधार देताना काही महत्वाचे नियम लक्षात ठेवा जेणेकरून पैसे वापस मिळतील शिवाय कोणाला पैसे द्याचे कि नाही हे सुद्धा ठरवता येईल.

पहिला नियम स्वतः आपण दुसऱ्याला पैसे उधार देऊ शकू इतकी चंगली आपली परिस्थिती आहे का. कारण काही वेळेस काही व्यक्ती हे भावनेच्या आधारे पैसे उधार देतात आणि ज्या वेळेस स्वतःला गरज असते ते पैसे वापस येत नाहीत. अशा वेळी स्वतःची आर्थिक स्थिती खराब होण्याची पूर्णपणे शक्यता असते. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीला उधार देण्याआधी सर्व गोष्टींचा विचार करावा आणि मगच उधार द्यावे पैसे

दुसरी गोष्ट समोरचा व्यक्ती कशासाठी पैसे उधार मागत आहे हे एकदा तपासून पहा. त्याला खरच तेवढ्या पैशाची गरज आहे का. तसेच उधार घेतलेले पैसे तो त्याच काम काम साठी वापरणार आहे का. कोणत्याही व्यक्तीला पैसे देताना त्याची गरज पाहून पैसे उधार द्यावे. जसे कि जर त्या व्यक्तीला मेडिकल, मुलांचे शिक्षण किंवा अन्य महत्वाच्या कामासाठी. पण एक गोष्ट लक्षात असुद्या फक्त मौजमजा करण्यासाठी कोणाला पैसे उधार देऊ नका, अन्यथा तुमचे पैसे वापस मिळण्याचे खुप कमी चान्स आहेत.

तिसरी गोष्ट पैसे उधार देण्याआधी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे समोरच्या कडून काढून घ्या. त्याचा कडे कोणते प्ल्यान आहेत जेणेकरून तो तुमचे पैसे परत करू शकेल. तसेच समोरच्या व्यक्तीने जर तुमचे पैसे परत केले नाही तर अशा वेळी काय करायचे यासाठी सुद्धा तुमची तयारी असली पाहिजे. तसेच ज्या व्यक्तीवर तुमचा विश्वास असेल त्यालाच पैसे द्या अन्यथा देऊ नका.

चैथी गोष्ट कोणत्याही व्यक्तीला पैसे उधार देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर अवश्य करा यामुळे पैसे दिल्याची नोंद अवश्य रहाते. तसेच शक्य असल्यास एका पेपरवर किती पैसे दिले आणि वापस काही किंवा किती टप्यात करणार याची नोंद करून दोघांच्या स्वाक्षरी करून घ्यावी. जेणेकरून पैसे वापस करताना कोणतीच अडचण येणार नाही.

पाचवी गोष्ट स्वतः उधार घेऊन दुसऱ्याला पैसे कधीही देऊ नका किंवा आपले जमा केलेले पूर्ण पैसे कधीच दुसऱ्याला देऊ नका. यामुळे भिवष्यात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. या पाच गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करूनच समोरच्या व्यक्तीला पैसे उधार द्याचे कि नाही हे ठरवा.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट