नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये सणांची काही कमीच नाही जितके हे सन आनंदी उत्साही आहेत तितकेच महत्व पूर्ण देखील आहेत. शेवटचा मराठी महिना म्हणजे फाल्गुन आणि ह्या मराठी महिन्यात येणारा सण आहे होळी अगदी काही दिवसांवर होळी आली आहे. दृष्ट प्रवृत्ती, वाईट विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विहार अंगी बाळगावे हा या सनामागिल उद्देश आहे. मित्रांनो होळी दिवाळी यासारख्या काही तांत्रिक रात्री आहेत कि ज्यादिवशी आपण पैसा धन मिळवण्यासाठी काही उपाय केले जातात. माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी ह्या दिवशी उपाय केले जातात. जर आपल्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील पैसे घरामध्ये टिकत नाहीत अश्या जर समस्या आपल्या जीवनामध्ये असतील तर ह्यवर्ती काही विशेष उपाय ह्या दिवशी आपण करू शकतो. अश्या विशेष तिथींना केलेले उपाय शिग्र् सफल होतात. म्हणजे काही दिवसांमध्येच आपल्याला त्याचा सकारत्मक उपाय आपल्याला दिसून येतो.. आपल्या आजच्या लेखामध्ये असेच काही उपाय आपण पाहणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला होळीच्या आधी काही वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत.
मित्रांनो प्रेत्येकाला आपल्या घरात पैसे असावा असं वाटते त्यासाठीच आपण होळीच्या आधी काही वस्तू आपल्या घरात आणायच्या आहेत त्यामधील पहिली वस्तू आहे ती म्हणजे महालक्ष्मी यंत्र, किंवा लक्ष्मी कुबेर यंत्र मित्रांनो ह्या पैकी कोणतेही एक यंत्र आपल्याला घरी आणायचे आहे आणि हे यंत्र आपल्याला देवघरात आणून त्याची स्थापना करायची आहे. यामुळे तुमच्या घरात कोणतेही पैस्याची अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट आहे पिंपळाचे पान हे पान आपण होळी येऊपर्येंत दररोज एक पान आपल्या घरात आणायचे आहे त्यावरती कुंकवाने आपल्या मनात जी इच्छा आहे ती त्यावर लिहायची आहे. कुंकवामध्ये थोडेसे पाणी मिक्स करून त्या पिंपळाच्या पानावर आपण पाली इच्छा दररोज एक ह्या पद्धतीने लिहायची आहे. आणि होळीच्या दिवशी हि सर्व पाने आपण त्या होळी मध्ये आपण अर्पण करायची आहेत. आणि अशी प्रार्थना करायची आहे कि माझ्या ह्या सर्व इच्छा पूर्ण होउदे.
मित्रांनो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तुळस जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुळस लावायची असेल तर ती तुम्ही होळीच्या आदल्या दिवशी लावा. बऱ्याचदा अशे होते की आपण सतत तुळस लावतो पण काही ना काही कारणाने ती जळते किंवा व्यवस्तिथ फुटत नाही. जर तुम्हाला तुळस आणायची असेल तर तुम्ही होळीच्या दिवशी नक्की आना. तुळशीमध्ये दिव्य शक्ती असते आणि ह्या तुळशीमध्ये नकारात्मक शक्ती घरापासून दूर ठेवण्याचे काम करत असते. मित्रांनो चौथी गोष्ट आहे ती म्हणेज चांदीचा सिक्का. माता लक्ष्मी किंवा श्री गणेशांचा चित्र असलेला चांदीचा सिक्का आपलयाला आपल्या घरी आणायचा आहे. आणि होळीच्या दिवशी आपण तो विधिवत पूजा करून आपण तो सिक्का आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्याचा आहे.
पाचवी आणि शेवटची वस्तू आहे ती म्हणजे मोरपंख होळीच्या आदल्या दिवशी हे मोरपंख आणून आपण हे मोरपंख आपण आपल्या घरात ठेवायचे आहेत. आणि होळीच्या दिवशी आपण हे मोरपंख होळीवरून ७ वेळा फिरवून आपण ते आपल्या घरात अगदी कुठेही ठेवून द्याचे आहेत जर एकापेक्षा जास्त मोरपंख असतील तर एक एक करून ते आपण आपल्या घरातील प्रेत्येक खोलीमध्ये आपण ठेवू शकता. या मुले आपल्या घरातील काही भांडणे असतील वादविवाद असतील ते सर्व मिटून आणि कुटुंबातील व्यक्ती मधील प्रेम वाढेल. हे वरील वस्तू ह्या सर्व होळीच्या आधी आणून ठेवायच्या आहेत कारण आपल्याला होळीच्या दिवशी हे उपाय करता येतील. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




