धार्मिक

होळी २०२२, घरातून गरिबी काढून टाकण्यासाठी पेटत्या होळीत टाका हि एक गोष्ट.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो १७ मार्च गुरुवारी होळी आलेली आहे. होळीचा शुभ मुहूर्त म्हणजेच होलिकादहनाचा मुहूर्त १७ मार्च गुरुवारी रात्री ९:२० मिनीटांनी सुरु होत असून आणि त्याची समाप्ती हि त्याच दिवशी १०:३१ मिनीटांनी होत आहे. थोडक्यात ह्या एक सव्वा तासाच्या कालावधीत आपण होलिकादहन अवश्य करावे. ह्या दिवशी होलिका दहन केल्याने आपल्या घरातील रोग आजारपण कलह क्लेश असे काही घरातून सर्व निघून जाते म्हणून ह्या दिवशी आपण होलिकादहन अवश्य करावे.

होळीची अग्नी हि पवित्र मानली जाते. सर्व प्रकारचे रोग दूर करण्याबरोबरच आपल्या हातून जी काही पाप कर्म घडतात. त्या पापांचा नाश करण्याचे काम हि होळी करत असते म्हणून आपण सहपरिवार सहकुटुंब आपण होळीदहन अवश्य करावे.

त्यानंतर आपण जलप्रदक्षिणा म्हणजे पाण्यासोबत प्रदक्षिणा देखील आपण घालावी. मित्रांनो आपल्या कडे जी काही प्रथा आहे जसे कि मोसमी फळे किंवा खजूर किंवा मक्याची किंवा ज्वारीची कणसे आपण होळीला अर्पण करावे. ह्या होळीच्या दिवशी आपण गोरगरिबांना दानधर्म अवश्य करावे.

मित्रांनो होळीच्या काही दिवसापूर्वीच गोवऱ्या म्हणजेच शेण्या असे देखील काहीजण म्हणतात ह्या पासून ते चंद्र, सूर्य इत्यादी नऊ ग्रह ते तयार करतात. आणि ते होळीला अर्पण करण्याची प्रथा आहे. अशी मान्यता आहे कि ह्या गौऱ्या होळीला अर्पण केल्याने सर्व प्रकारचे ग्रहदोष शांत होऊन आपल्याला शुभ फळे देतात.

मित्रांनो आपल्याला ह्यापैकी काहीही करणे जमल नाहीतर आपण थोडीशी लाकडे थोड्याश्या गौऱ्या आपण होळीत नक्की टाका. आजच्या लेखात आपण एक असा उपाय पाहणार आहोत कि ज्यामुळे आपल्या जीवनातील रोग आजार तर दूर होतीलच परंतु त्यासोबत आपल्या घरात जर गरिबी असेल तर तीही घरातून निघून जाईल.

मित्रांनो ह्या उपायासाठी काही साहित्य लागेल त्यातलेच एक वस्तू म्हणजे पिवळी मोहरी हि आपण थोडीशी घ्याची आहे व त्या मोहरीला आपण तिळाच्या तेलात किंवा मोहरीच्या तेलात टाकून आपण व्यवस्थित मिश्रण करायचे आहे. अश्या मिश्रणाने आपण आपल्या अंगाचे संपूर्ण शरीराचे मसाज करायचे आहे. हे तेल व मोहरी आपण घासायची आहे. घरातील सर्वानी हि लावू शकता पंरतु लहान मुले सोडून बाकी सर्व घरातील मोठी सदस्य लावले तरी चालेल.

हे मिश्रण आपण लावताना जी काही मोहरी खाली पडणार आहे. ती मोहरी आपण गोळा करून एका लाल कपड्यात ती बांधून आपण तो लाल कपडा आपण पेटत्या होळीची टाकायचा आहे. मित्रांनो तुमच्या घरात ज्या काही बाधा आहेत. जे काही दोष आहेत त्या सर्व गोष्टी संपुष्टात आणण्याचा दिवस म्हणजे होळी.

जर आपल्या घरावर कोणी काही केलं असेल घरात अस्वस्थ वाटते तर अश्या वेळी पिवळी मोहरी आपण आपल्या उजव्या हातात धरून संपूर्ण घरावरती फिरवून एक प्रकारची दृष्ट काढून ती मोहरी आपण पेटत्या होळीत टाकून द्याची आहे. सर्व नाकारात्मक शक्ती बाधा घरावरून दूर होतील.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट