घरगुती उपाय

घरगुती उपाय एका मिनिटांत पायाच्या पोटऱ्या सांधेदुखी बरी होईल, एकदा नक्की करून पहा

नमस्कार मित्रांनो आजच्या खास विषयावरच्या लेखात आपले स्वागत आहे. मित्रांनो आपल्याला घ्याचे आहे बदली भरून पाणी ते पाणी कोमट किंवा शक्य असेल तेवढे कडकच असूद्यात म्हणजे तुम्हाला जितके जास्त सोसेल तेवढे. त्यानंतर आपण ह्या पाण्यात आपण चार चमचे मीठ टाकायचे आहे आपले खायचे मीठ. त्यानंतर आपण ते पाणी चांगले मिक्स करून घ्याचे आहे व त्यानंतर आपण त्यात पाय टाकून मस्त आरामात १५ ते २० मिनटे बसायचे आहे. स्वतःसाठी वेळ द्याला शिका मित्रांनो कारण आपण आहोत तर जग आहे. १५ ते २० मिनीटांनी आपण त्या पाण्यातून पाय बाहेर काढायचे आहेत.

त्यानंतर आपण पाय पुसून घ्याचे आहेत, त्यानंतर आपण आपल्या पायांना लावणार आहोत खोबरेल तेल ह्याहून चांगले असते ते म्हणजे मोहरीचे तेल व त्याहून चांगले असते ते म्हणजे तिळाचे तेल तुमच्याकडे जे कोणते तेल असेल ते तुम्ही वापरू शकता. हे लावण्यासाठी एक पद्दत वापरायची आहे ती म्हणजे गुडघ्यापासून आपण ते तेल तळपायापर्यन्त लावायचे आहे. हे तेल आपण उलटे लावू नका कारण त्यामुळे आपले दुखणे बंद होणार नाही.

जर आपली पोटरी जर कायमची दुखणे बंद करायचे असेल तर गुडघ्यापासून आपण तळपायापर्यंत हलक्या हातांनी मालिश करायची आहे. हे तेल चोळून झाल्यानंतर आपण तिसरी गोष्ट करायची आहे, जे लोक उभा राहून जे काम करतात विशेषकरून महिला उभा राहून स्वयंपाक करणे ह्यामुळे अगदी तासंतास उभा राहावे लागते. किंवा ज्यांना कोणाला असे उभा राहून काम असेल त्यांना देखील हे पोटऱ्या दुखण्याचा त्रास होतो.

खुर्चीवर जी लोक बसतेत ज्यांचे पाय जमिनीवर टेकत नाहीत त्यांना देखील हा त्रास होत असतो. आपली टाच हि जमिनीवर टेकली पाहिजे. तर हा मित्रांनो तिसरी गोष्ट जी आहे ती फार महत्वाची आहे ते म्हणजे आपण एक विटेचा तुकडा घ्याचा आहे व तो गॅस वरती गरम करायचा आहे . त्यानंतर आपण त्या विटेने आपण ह्या पोटऱ्या जिथे जिथे पाय दुखतेत तिथे आपण शेकायचे आहे.

शेकल्यानंतर आपले जे पाय पोटऱ्या दुखत आहे ते दुखायचे लगेच थांबेल. हा उपाय आपण रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. आणि सकाळी उठल्यानंतर आपण अंघोळीच्या आधी खोबऱ्याच्या तेलाने किंवा आधी सांगितले तसे तुमच्यकडे जे कोणते तेल असे त्याने मालिश करून परत आपण गरम पाण्याने अंघोळ करायची जेणेकरून आपल्या पायांना आणखी एकदा शेक बसतो त्यामुळे देखील तुमच्या पायांना अराम मिळेल.

तर हा उपाय साधारण पणे आपण सलग ४ ते ५ दिवस करायचा आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच ततुम्हाला अराम मिळेल. पण पुन्हा हा त्रास होऊ नये म्हणून हा उपाय करायचा सलग ४ ते ५ दिवस. ह्या उपायामुळे आपल्या पायातील नसांचे रक्ताभिसरण ब्लड सर्कुलेशन चांगले होते. आखडलेल्या नसा चांगल्या होतात. पुन्हा तुमच्या पिंढऱ्या किंवा पाय दुखीची समस्या तुम्हाला होणार नाही. म्हणून आजचा उपाय एकदा नक्की करून पहा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट