मित्रांनो ज्या घरात अश्या दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरात येतो राजयोग, तर त्या कोणत्या मूर्ती आहेत ते जाणून घेऊयात. आपण आपल्या घरात दररोज देवपूजा करत असतो, आता ह्यात संयुक्त मूर्तीचे काय महत्व आहे ते जाणून घेऊयात. ज्या घरात ह्या संयुक्त मूर्ती असतात तर तिथे येतो राजयोग, अगदी आपण आपल्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होतील.
देवघरात आपण मूर्ती फोटो ठेवतो त्यांचे आपण दररोज पूजा करतो व त्यांचे आशीर्वाद घेतो अश्याच देवघरात आपण आणखी काही फोटो मूर्ती ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्या जीवनातील अडचणी संपतील. त्या कोणत्या मूर्ती आहेत ज्यामुळे घरात सुख समृद्धी येईल, त्या जाणून घेऊयात.
पहिली मूर्ती आहे ती म्हणजे कुष्णाची मूर्ती, आपण आपल्या घरात बालगोपालाची मूर्ती म्हणजेच कृष्णाची मूर्ती सहसा सर्वांच्या घरात असते. आपण कृष्णाच्या मूर्तीची दररोज पूजा करत असतो. ह्या बाळकृष्णच्या मूर्तीबरोबर राधा राणी म्हणजेच राधा कृष्णाची जोडीची मूर्ती किंवा त्यांचा फोटो आपण घरात आणावा तो आपण आपल्या देवघरात किंवा अगदी तो आपल्या बेडरूम मध्ये ठेवला तरी चालतो. ज्या घरात अशी राधाकृष्णाची मूर्ती असते त्या घरात वादविवाद किंवा भांडणतंटे कमी प्रमाणात होतो.
पतिपत्नींमध्ये नेहमी स्नेह प्रेम व एकमेकांशी जिव्हाळा निर्माण होतो. म्हणून तुम्ही घरात राधा कृष्णाची मूर्ती आपण अवश्य ठेवा आपल्याला फायदा अवश्य होईल. आपण राधा कृष्णाची मूर्ती ठेवनारच आहे तसेच आपण त्या सोबात आणखी एक मूर्ती ठेवायचॆ आहे.
माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवतो व त्यांची पूजा करतो तर आपण माता लक्ष्मीची मूर्ती केवळ न ठेवता आपण त्याऐवजी लक्ष्मी व नारायण दोघांची एकत्र मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवावा असे मानले जाते कि जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाहीत. कारण जिथे विष्णू आहेत तिथे लक्ष्मी हि राहतेच.
कृष्ण लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घरात आणताना एक काळजी मात्र अवश्य घ्या कि त्यांचा फोटो किंवा मूर्ती उभ्या स्वरूपात नसावा तो बसलेल्या स्तिथीत असावा, लक्षमीच्या डाव्या बाजूस गणपती असलेला फोटो आपण देवघरात ठेवला तरी चालतो. लक्ष्मीच्या डाव्या बाजूला जर गणपतीची मूर्ती असा फोटो देवघरात ठेवल्याने धनलाभ होतो.
पुढील मूर्ती आहे ती म्हणजे हनुमान ह्यांची देखील मूर्ती किंवा फोटो आपण देव्हाऱ्यात आपण अवश्य ठेवावी हनुमानाच्या मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवल्याने घरावर कसलेही संकट किंवा बाधा येत नाही. घरातील व्यक्तींची त्यांच्या कामात प्रगती होते. हनुमानाचा फोटो सोबत आपण श्री रामाची मूर्तीची देखील पूजा केली तर अतिउत्तम, कारण हनुमान हे श्री रामाचे भक्त आहेत म्हणून हनुमान व श्री रामाची एकत्रित मूर्ती किंवा फोटो अवश्य असावी.
आणखी एक मूर्ती आहे जी आपणास मिळाली तर तिया आपण अवश्य आपल्या देवघरात ठेवावी ती म्हणजे ब्रह्मा विष्णू व महेश ह्या तिघांचा फोटो किंवा मूर्ती जर मिळाली तर तुम्ही ती देवघरात नक्की लावा, त्यांच्या पूजनाने आपली मोठ्यातील मोठी संकटे नाहीशी होतात. आता जाणून घेऊयात थोडक्यात कि देवघरात किती मूर्ती असाव्यात ते.
गणपतीची मूर्ती एकच असावी, शिवलिंगाची देखील मूर्ती हि १, ३ किंवा ५ एवढ्या असाव्यात. देवघरात २ शिवलिंग नसावेत, शिवलिंगाची साईझ हि आपल्या अंगठ्यापेक्षा लहान असावी, घरात हनुमानाची मूर्ती पूजनात असेल तर हनुमानाची बसलेली मूर्ती असावी, बजरंग हे शिवलिंग अवतार आहेत म्हणून त्यांची बसलेली मूर्ती असावी. हनुमान हा बालब्रह्मचारी आहेत म्हणून त्यांची मूर्ती किंवा फोटो हा बेडरूम मध्ये कधीही ठेवू नका.
त्याउलट आपण राधा कृष्णची मूर्ती किंवा फोटो आपण बेडरूम मध्ये ठेवू शकता. सकाळी उठल्यानंतर आपण राधा कृष्णाच्या मूर्ती किंवा फोटो पहिला तर तुमचा दिवस अगदी आनंदी व चांगला जाईल. घरातील पूर्वजांचे फोटो हे आपण कधीही देवराच्या वरती लावू नयेत त्यामुळे अशुभ घडू शकते.
टीप: लेखात दिलेली माहिती धार्मिक पुराण ग्रंथांच्या आधारावर दिली गेलेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा त्यास पसरवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणही तसा गैरसमज करून घेऊ नये, धन्यवाद.




