लाईफस्टाईल

घडून गेलेल्या चुकांना किंवा घडलेल्या चुकांना कसे सामोरे जावे

मित्रांनो जीवनात जो चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो हुशार माणूस आणि जो घडलेल्या चुका पुन्हा घडूनच देत नाही तो अगदी देवमाणूस अशी एक व्याख्या आपल्याकडे सहसा सांगितले जाते. हा साधा विचार आहे आणि हा आपल्याला काळूनदेखील आपण घडलेल्या चुकांच्या अपराधीपणाच्या भावनेत आपण आयुश्य वाया घालवतो. मग ह्या अपराधी भावनेतून आपण स्वतःची सुटका कशी करावी. आपल्याला असा प्रश्न पडत असेल तर आजचा लेख केवळ खास आपल्यासाठीच आहे.

मुळात आपल्याकडून चूक केली कि आपल्याकडून चूक घडली आहे हे आपल्याला उमजणे फार महत्वाचे आहे. चूक हि प्रेत्येकाकडून होतच असते आणि ह्या चुकीतूनच आपल्याला शिकवण मिळत असते, आपल्या हातून चुकाच घडणार नाही अश्या व्यक्ती जगात नाही, म्हणून हातून चुकाच होणार नाहीत अशी व्यक्ती जगात नाही म्हणून चुका घडत असेल तर प्रगतीचे लक्षण आहे. पंरतु एकच चूक वारंवार घडत असेल तर मात्र ते आपल्या बुद्धीचा आकलन क्षमतेचा दोष असू शकतो.

मूळ मुद्दा हा आहे कि चुका ह्या मुद्दाम घडल्या आहेत कि चुकून घडल्या आहेत, उदाहरणार्थ रस्त्यावर वाहन चालवताना आपण सर्व नियम पाळूनही अपघात घडतात हि चुकून झालेली किंवा परस्थितीमुळे झालेली चूक आहे. तर नियमांचे उलंघन करत वेगाने गाडी चालवत वाटेत येईल त्याला तुडवत जाणे हे मात्र जाणून बुजून केलेली चूक आहे, अक्ष्यम अपराध आहे हा. ह्या दोनीतील फरक लक्षात घेतला तर आपल्या हातून घडलेल्या चुकांचे वर्गीकरण आपल्याला करता येईल. काही गोष्टी स्थळ, काळ व्यक्तिनुरूप घडून जातात.

त्या क्षणी योग्य वाटलेला निर्णय अपराधी भाव निर्माण करणारा ठरू शकतो, अश्या वेळी आपण सर्वप्रथम जी गोष्ट घडून गेली ती का घडून गेली आणि ती आपल्याला टाळता अली असती का भविष्यात त्याचे काय परिणाम होणार आहेत, चूक मान्य केल्याने अपराधी भावनेतून मुक्ती मिळणार आहे का, ह्या सर्व गोष्टींचा विचार करा. घडून गेलेल्या गोष्टींमध्ये कोणीच बदल करू शकत नाही मात्र चूक मान्य केल्याने मनावरचा भार हलका होतो. मात्र तीच चूक मान्य केल्याने मनावरचा भाग हलका होतो.

त्या चुकीची जाणीव ठेवल्याने ती चूक तुमच्याकडून पुन्हा घडत नाही. पुढच्या वेळी आपण निर्णय घेताना आपण सावधगिरी बाळगतो. शक्य तितक्या चुका आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. चूक झाली आहे हे मान्य करण्यासाठी मनाचा प्रामाणिकपणा फार महत्वाचा असतो. झालेली चूक पुन्हा घडू नये ह्यासाठी मनाचा जागृकपणा देखील हवा. ह्या गोष्टींचा नीट विचार केला असता अपराधीपणाचे ओझे वाहावे लागणार नाही. चुका होणे हि सामान्य बाब आहे. आपल्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावी लागत असेल, तर ती चूक नाही अपराध आहे.

ह्या अपराधी भावनेतून मुक्त होण्यासाठी क्षमा मागणे हि सर्वात पहिली पायरी आहे आणि अश्या चुका हातून घडून न देणे हि अंतिम पायरी आहे. आयुष्य फार छोटे आहे ते कुडत जगू नका, आनंदात जगा तसेच दुसऱ्यांना देखील आनंदात जगू द्या. आपण दुसऱ्यांना फसवू शकतो मात्र स्वतःला नाही. आपण स्वतःशी अगदी प्रामाणिक राहावे आणि आपल्या मनाचा कौल नक्की घ्यावा. मित्रांनो आजचा आपला लेख कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा तसेच आपला लेख आपल्या मित्रकुटुंबपरिवाराला शेयर करा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट