वास्तू शास्त्र

घरातील वास्तुदोष कसे ओळखावे.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो खूप लोकांना हे कळत नाही कि आपल्या घरात वास्तुदोष आहे कि नाही ते, नेमके कसे ओळखावे कि घरात वास्तुदोष आहे कि नाही. ज्या घरात अगदी शुल्लक कारणांमुळे लोक भांडतात अगदी किरकोळ कारणांमुळे देखील जेवताना वादविवाद होतात शारीरिक किंवा मानसिक कष्ट करून देखील रात्री नीट झोप लागत नाही. अश्या घरात हमखास वास्तुदोष आहे असे समजावे.

अनेकजण वास्तुदोष आहे म्हणून वास्तूची तोडफोड करतात लक्षात घ्या कि हे शास्त्रसंमत नाही अश्या प्रकारे वास्तूची तोडफोड केल्यास वास्तूला वास्तुभंगाचा दोष लागतो. मित्रांनो वर्षातून किमान एकदा तरी घरात उदकशांती करून घ्या जर तुम्हाला वाटते आहे कि तुमच्या वास्तूत दोष आहे. तर वर्षातून किमान एकदातरी हि शांती करावी आणि हे जर शकय नसेल तर कमीत कमी दही भात नारळ ह्यांचे उतारे घरावरून करावेत. किंवा घराच्या घरी तुम्ही ग्रह यज्ञ देखील करू शकता.

उदकशांती, ग्रहशांती, वास्तुशांती, गृहशांती असे वेगवेगळे प्रकार आहेत वास्तूला तेजोवलय म्हणजेच प्रकाशमय करण्याचे ह्यामुळे घरात सौख्य लाभते, सुख शांती लाभू लागते. जेव्हा जेव्हा तुमच्या घरातील नवीन घराचा दरवाजा जर तुटला तर लक्षात घ्या कि ह्याचा त्रास घरातील स्त्रियांना जास्त होतो. आणि म्हणून शांती कर्म करणे आवश्यक असते.

मित्रांनो जेव्हा जेव्हा आपला मुख्य दरवाजा बदलला जाईल तेव्हा नव्याने आपले घर जन्म घेते आणि तेव्हा अश्या घराची वास्तुशांती करणे गरजेचे असते. नवीन घरात प्रवेश करताना जर घुबड घरात शिरताना आढळले किंवा त्या घरात किंवा घराजवळ मधमाश्यांनि पोळे केले असेल, कबुतराने घरटे केले असेल किंवा एकाद्या व्यक्तीचा अपमृत्यु झाला असेल किंवा आपण घराचा दरवाजाच बदलेला असेल तर अश्या वेळी वास्तूशांती नक्की करून घ्या.

हे सर्व माहिती ग्रंथसमथ आहे आणि हि माहिती आपण त्यातूनच आपल्यापर्यंत पुरवली जात आहे.मित्रांनो आणखी एक गोष्ट आपल्या घरात एखादी खोली बंद आहे ह्यामुळे घरात अदृश्य शक्तींचा वावर आपल्या घरातील अश्या खोलीत होऊ शकतो म्हणून कायमची बंद अशी खोली कधीही ठेवू नये दिवसातून अगदी २ मिनटे का होईना आपला वावर तिथे असायला हवा.

जिथे मनुष्यचा वास असतो तिथे अनेक जीव प्राणी त्यांना मनुष्याचा गंध जाणवतो. आणि ह्या उलट जर वावर नसेल तर त्या ठिकाणी पारवे पाकोळ्या पाली इत्यादी तिथे येतात. म्हणून अशी बंद खोलीत आपण झाडून पुसून घ्यावे तिथे वेळ घालवावा आणि ते शक्य नसेल तर दररोज तिथे अगरबत्ती लावून आला तरी चालते कारण ह्यामुळे तेथील वातावरण चैतन्यमय राहते.

विशेषकरून वास्तूच्या पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेकडच्या खोल्या कधीही बंद ठेवू नये, त्यांचा नियमित वापर करा. वास्तूपुरुषाची प्रतिमा जी आहे त्याबद्दल अनेकांना माहिती नसेल जी हि प्रतिमा आहे, वास्तूसोभवतालच्या जागेत पुरु नये मग ते पुरावे कुठे तर ती आपल्या वास्तूच्या आत अग्न्येय कोपऱ्यात पालथ्या पद्दतीने हि प्रतिमा ठेवावी. आणि जेव्हा आपल्या घरात सणवार आहेत त्या वेळी आपण तिथे आपण हळदी कुंकू आणि नैवैद्य दाखवायला विसरू नये. ह्यामुळे वास्तुपुरुष आहेत ते प्रसन्न राहतात आणि वास्तूची आपल्या नेहमी भरभराट होते.

गृहप्रवेश करताना नेहमी किंवा पायाभरणी करताना ती नेहमी दिवसा करावी रात्री करू नये. रात्री केलेली पायाभरणी किंवा गृहप्रवेश हे घरातील करत्या व्यक्तीस त्रास निर्माण करते. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट