चार अशा गोष्टी ज्या नवरा बायको मधील नात्यात दुरावा आणतात. या गोष्टी करू नका.
लाईफस्टाईल

चार अशा गोष्टी ज्या नवरा बायको मधील नात्यात दुरावा आणतात. या गोष्टी करू नका.

नवरा बायको यांचे नाते हे देवा जवळ बांधून आलेले असतात. आणि असे हि बोले जाते ज्या ठिकाणी योग असेल तेथेच नाती जुळतात. सर्वानी कितीही पर्यंत केले तरी त्याचे लग्न लवकर जुळत नाही जोपर्यंत योग येत नाही. जरी दोन वेगळे शरीर एका लग्न गाठीत बांधले जातात, त्या वेळी त्यांची मने सुद्धा एक होतात. आणि ज्या वेळी एकमेकांची मने जुळतात त्यावेळी प्रत्येकांचे सुख दुःख सारखेच होतात.

सध्याच्या युगात प्रत्येक जण हा स्वालंबी होत चले आहे. प्रत्येक क्षेत्रात पहिल्या सारखे स्त्री पुरुष असा भेदभाव कमी झाला आहे. प्रत्येक कामात प्रत्येक जण आपला ठसा उमटवत आहे. या सर्व गोष्टी चागल्या होत चालल्या आहेत. तसेच देवशाच्या प्रगती मध्ये सुद्धा तरी स्त्री पुरुष समसमान काम करून पुढे जात आहे. हे हि सुद्धा खुप महत्वाची गोष्ट आहे. पण या सर्व चागल्या गोष्टी होत असताना कुठेतरी नात्याला दुरावा निर्माण झाल्यासारखे वाटत आहे.

सध्या आपण पाहत आहोत नवरा बायको वेगळे होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात होत आहे. यांच्यात नाती किंवा प्रेम हे फक्त सोशल मीडिया पुरतेच राहिले आहे कि काय असे सुद्धा वाटत चाले आहे. प्रत्येक फोटोत एकत्र जरी असलो तरी मनात काहीतरी वेगळे चालेले असते. आणि एकदा का आपण मनानी वेगळे झलो कि त्या नात्याला काहीच अर्थ रहात नाही.

आपण कधी विचार केला आहे का आपल्या नात्यात कोणत्या कारणामुळे दुरावा येत आहे. तसे विचार केल्यास कारणे खुप असतात, काही वेळेस तर खुप शुल्क कारण सुद्धा असते. पण जाऊद्या पण काही अशी करणे आपण पाहणर आहोत ती आपल्या टाळता येऊ शकतात. आणि त्यामळे आपल्या नात्यातील गोडवा तसाच राहील.

पहिली गोष्ट म्हणजे अपेक्षा. एकमेकांकडून ठेवलेल्या अनावश्यक अपेक्षा. जसे कि तो मला कधीच फोन करत नाही, तो बाहेर फिरायला घेऊन जात नाही, ऑफिस मधून लवकर घरी येत नाही. मेसेज वाचून सुद्धा उत्तर दिले नाही. तसेच ती लकर सकाळी उठत नाही, मला लकर जेवायला वाढत नाही, चहा लकर कर असे सारखे सागावे लागते. या सारख्या छोट्या अपेक्षा आपल्या एकमेकांकडून ठेवल्या तर कसे चालेल. जरी तुमच्या या अपेक्षा असतील तर या पूर्ण करण्यासाठी आग्रह करू नका. ज्या ठिकाणी तुम्ही आग्रह ठेवताल त्या ठिकाणी मतभेद होण्याची शक्यता असते. त्या पेक्षा एक मेकांना समजून घ्या.

दुसरी गोष्ट तुझी चूक आहे माझे बरोबर आहे. प्रत्येक गोष्टी मध्ये दोनच बाजू असतात. एक चूक आणि बरोबर. आणि प्रत्येक जण माझेच बरोबर आहे से बोलत असेल तर यातून मार्ग कसा निघेल. प्रत्येक नवरा बायको जर का माझेच बरोबर तुझे चुकीचे आहे असे बोलत आले तर यातून मार्ग निघत नाही. आणि नवरा बायको हि नाती आयुष्य भरायची नाती असतात. यात कोणीतरी माघार घ्याल हवी. प्रत्येक वेळेस मीच का माघार घेऊ या गोष्टीला जास्त महत्व दिऊ नका कारण नाती जपण्यासाठी असतात ती तोडण्यासाठी नसतात. प्रत्येक वादात माघार घ्याला शिका.

तिसरी गोष्ट एकमेकांची काळजी न घेणे. आपण एक मेका सोबत आयुष्य काढणार आहोत त्यामुळे आयुष्य भर एक मेकांची काळजी घ्याल शिका. छोट्या मोठया अडचणी मध्ये एक मेकांना समजून घ्या. ज्या ठिकाणी एकमेकांना गरज लागणार आहे त्या ठिकणी कोणताही विचार न करता मदत करा. ज्या नवरा बायको मध्ये एकमेकांची काळजी घेलती जात नाही त्या ठिकाणी वाद विवाद होत जातात. ज्या प्रमाणे आपल्या इच्छा पूर्ण झल्या पाहिजे असे वाटते त्याच प्रमाणे आपल्या जोडिताच्या इच्छा सुद्धा पूर्ण झाल्या पाहिजे असे आपल्या मनाला वाटले पाहिजे.

चौथी गोष्ट विश्वास घात करणे. नवरा बायको हे नाते एकमेकांवर असलेल्या विश्वासावर अवलंबून असते. ज्या नात्यात विश्वास घात येतो त्या नात्याला कोणतातच अर्थ रहात नाही. प्रत्येक गोष्ट एकमेका सोबत आनंदाने आणि मन मोकळ्या पणाने शेअर करा. कोणतीही गोष्ट एकमेकापासून लपून ठेऊ नका. आता लपवलेली गोष्टी भिवष्यात खुप त्रास देऊन जातात. यामुळे कितीही छोटी किंवा मोठी गोष्ट असुद्या एकमेकांना लगेच सागा. यामुळे एकमेकांवरती विश्वास वाढेल.

या खुप छोट्या गोष्टी आहेत. याचे नीट पालन केले तर नवरा बायको या नात्यात कधीच वाद विवाद होणार नाही आणि कधी हि दुरावा येणार नाही.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट