लाईफस्टाईल

ह्या ४ गोष्टी करा नकारात्मक व फालतू विचार १०० % बंद होतील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कि एक रिसर्च नुसार सर्वसाधारण माणूस दिवसाला ६० हजारहून जास्त विचार करतो. आणि सामान्य माणसाचे त्यातील ९० % विचार हे नकारात्मक असतात. आणि महत्वाची बाब म्हणजे माणसाला आपण नाकारात्मक विचार करत आहोत हेच माहिती नसते. बऱ्याचवेळा असे होते कि आपल्याला शाररिक थकव्यापेक्षा मानसिक थकवाच जास्त असतो त्यामुळे आपण आजच्या लेखात सांगणार आहोत कि हि नाकारात्मक विचारांची साखळी कशी थांबवता येईल. काय असे करता येईल कि हे फालतू विचार बंद होतील.

मित्रांनो आपण काही तरी ठरवतो आणि ते मिळवण्यासाठी आपण काही तरी विचार करतो ते विचार आपल्यासाठी चांगले असतात आणि असे विचार आपल्याला प्रगती पथावर घेऊन जातात. पण एखाद्या गोष्टींवरती आपण काही करू शकत नाही आणि त्यावर आपण निष्कारण त्यावर विचार करतो त्याला आपण अनावश्यक किंवा नाकारात्मक विचार म्हणतात. असले विचार आपल्या मनात टेन्शन, नैराश्य, मानसिक ताण निर्माण करतात.

एक उधारण पाहुयात जसे कि एक विद्यार्थी आहे आणि त्याच्या परीक्षेच्या तयारीसाठी तो नियोजन करतो कि योग्य पद्धतीने कसा अभ्यास करायचा. सकाळी किती वाजता उठायचे किती तास वाचायचे नंतर किती तास लिखाण करायचे कोणत्या विषयाला जास्त वेळ द्याचा इत्यादी हे सर्व विचार त्याच्या हिताचे आहेत आणि हे विचार त्याला त्याच्या प्रगती पथावरती जाण्यास मदत करणारे आहेत.

आता त्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली आणि आता तो दररोज विचार करतो कि मला चांगले गुण मिळतील ना, मला एवढे टक्के मिळाले नाही तर मला योग्य चांगल्या कॉलेज ला ऍडमिशन मिळणार नाही. आता हे जे विचार आहेत ते सर्व फालतू व नाकारात्मक विचार आहेत कारण हे असे विचार करून काही मिळणार नाही. कारण परीक्षा तर आता संपली आहे आणि ज्या गोष्टींचा आता विचार करून फायदा होणार नाही. मला वाटते आता तुम्हाला कळाले असेल कि चांगले विचार आणि नाकारात्मक विचार म्हणजे काय ते.

आता हे विचार थांबवता कसे येतील यासाठी आपण काही सूत्र सांगणार आहोत. पहिले सूत्र म्हणजे

विचारांवर लक्ष ठेवणे: मित्रांनो बऱ्याच लोकांना लक्षात देखील येत नाही कि त्यांच्या मनात कोणत्या प्रकारचे विचार येतात आणि जातात. म्हणून कधी त्या विचारांची साखळी तयार होते आणि आपण कधी त्यात गुरफटून जातो हे आप्ल्यालालच कळत नाही. उदाहरण द्याचे झाले तर आपल्या फेसबुक वरील आपल्या खास मित्राने आपला फोटो लाइक केलेला नसतो आणि मग आपले विचार चालू होतो कि त्याने तर माझ्या फोटो ला लाइक च केले नाही. आणि माझा व्हाट्स अँप मेसेज ला पण रिप्लाय दिला नाही.

मी तर त्याच्या सर्व मेसेज ला रिप्लाय देतो. त्यानंतर आपण दुसरी पोस्ट पाहतो त्या मध्ये आपला दुसरा मित्र सिनेमा पाहायला गेलेला असतो. परत तुम्ही विचार करता मला त्याने बोलवले देखील नाही माझ्याच बाबतीत असे का होते. मग असा विचार करतो कि आता आपण सिनेमा पाहायला जायचे का आणि कोना कोणाला बोलवता येईल. आणि मग बऱ्याच वेळानंतर आपण भानावर येतो कि बराच वेळ निघून गेलेला आहे आणि आपण आपल्या विचारांवरती लक्ष द्याला हवे.

स्वीकार करणे: बऱ्याच वेळी गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात आणि मग आपण सारखेच त्याच गोष्टीबद्दल विचार करतो. समजा आपण गाडी वरती ऑफिस ला चाललो आहोत आणि एखादी व्यक्ती आपल्याला ओव्हरटेक करते तेव्हा त्या माणसावर आपण प्रचंड रागावतो वेळ प्रसंगी आपण त्याला २ शिव्या देखील देतो. ऑफिस मध्ये गेल्यानंतर देखील आपण पूर्ण दिवस तोच विचार करतो. मग त्यामुळे आपल्या कामावर त्याचा परिणाम होतो.

गाडीवाला तर आपल्याला ओव्हरटेक करून गेलासुद्धा मग त्यावर आपण विचार करत दिवस घालवयण्यपेक्षा आपण स्वीकार करणे महत्वाचे आहे. मनात विचार करायचे के समोरच्याचे संस्कार त्या प्रमाणे आहेत, त्यामुळे तो असा वागतो. ज्यावेळी आपण मनात असा स्वीकार भाव आणतो त्यावेळी आपण ती गोष्ट तिथल्या तिथेच सोडून द्देतो. त्यामुळे आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली कि मनामध्ये ती लगेच स्वीकार करा.

आपले नियंत्रण आपल्या फक्त कृतीवरती असते: मित्रांनो तुम्हाला ह्याची जेव्हा जाणीव होईल कि तुमच्या हातात फक्त तुमच्या कृती आहेत बाकी तुमच्या हातात काहीच नाही. लोकांनी कसे वागले पाहिजे, दुसरे तुमच्या बद्दल काय विचार करतोय हे काहीच तुमच्या हातात नाही. तुमच्या कृतीमुळे तुम्ही ह्या गोष्टी बदलू शकता. तुम्ही ज्यावेळी दुसऱ्यांना दोष देणे कमी कराल व तुमच्या कृती वरती लक्ष द्याल त्यावेळीच तुमचे दुसऱ्यांना दोष देणे कमी होईल. नोकरी वाल्यानी चांगले काम करणे त्याच्या हातात आहे परंतु पगार किती वाढेल त्याच्या हातात नाही.

ध्यान: ध्यान किंवा मेडिटेशन तुम्ही दिवसातून १० मिनटे का होईना करून पहा. कसे असते जोपर्येंत आपण एखादी गोष्ट करणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा परिणाम भेटणार नाही. तुम्ही फक्त करून पहा तुम्हाला फरक नक्की जाणवेल. तुमच्या विचारांची संख्या झपाट्याने कमी होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट