गुलाब समोर आल्यावर आनंद झाल्या शिवाय रहात नाही. त्याचा वास आपले सर्व आळस झटकून आनंदचे वातावरण तयार करतात. गुलाबाचे विविध रंग आणि विविध सुगंधा मुळे आजूबाजूचा परिसर प्रसन्न करून ठेवतात. त्याच बरोबर आपले मन शुद्ध ताजे व टवटवीत होते. आनंदच्या वेळेस आपण एकमेंकाना गुलाब देत असतो. गुलाब या नावातच आनंद आहे.
वास्तू शास्त्र नुसार गुलाबाचे झाड कोणत्या दिशेला लावावे. त्याचे कोणते परिणाम आपल्यावर होतात. या सारखे विविध आपण माहिती जाणून घेणार आहोत. कारण काटेरी झाडे घरात लाऊनये. या मुळे आपल्या घरात नकारात्मक गोष्टी वाढवत असतात; त्यामुळे घरात काटेरी वनस्पती लाऊनये असे संगितले जाते. मग आपण गुलाबाचे झाड घरात लावावे किंवा लावूनये या संदर्भात माहिती जाणून घेऊ.
गुलाब हे झाड जरी काटेरी असले तरी ते आपल्या घरात नाकारात्मक गोष्टी पसरवत नाही या कारण म्हणजे या झाडाच्या पानांमुळे त्याची काटे झाकली जातात. त्यामुळे त्या पासून नकारात्मक गोष्टी पसरत नाही. आणि त्याचा सुगंध सर्व परिसरात पसरत असल्यामुळे आनंदचे वातावरण तयार होते. आणि हा सुगंध या नकारात्मक गोष्टीला कमी करतो.
माता लक्ष्मीस गुलाबचे फुल अत्यन्त आवडीचे आहे. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी एक तरी फुल माता लक्ष्मीला अर्पण करावे. यामुळे आपल्या जीवनात असलेली गरिबी कमी होऊन. धन लाभ होण्यास मदत होईल. जर का माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या कोणत्याच अडचणी येत नाही. ज्या घरात आनंद असतो त्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य असते.
घरात कुठेही गुलाबाचे झाड लावले तरी चालते, आपल्या बाल्कनीत असेल, हॉल मध्ये, किंवा आपल्या बेडरूम मध्ये आपण कुठेही गुलाबचे झाड लावू शकतो. फक्त आपण गुलाबचे झाड हे आपल्या घराच्या मध्य भागी लाऊनये. तसेच बाजारात आता बऱ्याच प्रकारच्या कलरचे गुलाब उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या कलरचे गुलाब आपण लावले तरी चालते. फक्त काळा कलरचा गुलाब आपल्या घरात किंवा जवळ लावू नये.
तसेच शत्रू पीडा पासून मुक्ता मिळवण्या साठी सुद्धा आपण गुलाबाचा खुप चंगळ उपयोग करू शकतो. रोज दोन गुलाब आपण आपल्या जवळील मारुतीला अर्पण करावे या मुळे सुद्धा आपल्याला बाहेरून होणार त्रास सुद्धा कमी होतो. तसेच माता लक्ष्मी ला आकर्षित करायचे असेल आहे. अशा वेळेस आपण एक छोटासा उपाय करू शकतात. एक किलो गुलाबाच्या पाकळ्याने महादेवाला अर्पण करावे. यामुळे जर महादेव प्रसन्न झाले तर भोलेनाथ आपल्याला सरळ हाताने मदत करतील. हा उपाय सात शुक्रवार सतत करायचा आहे.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




