लाईफस्टाईल

दिवाळीच्या साफसफाई करताना घरात जर ह्या वस्तू सापडल्या तर, समजून जा कि माता लक्ष्मीने घरात आगमन केले आहे.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो दिवाळी जवळ आलेली आहे अनेकजण आपल्या अंगणाची घराची साफसफाई करत आहे. हि साफसफाई करत असताना ह्यातील कोणतीही वस्तू दृष्टीस पडली तर समजून जा कि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आणि माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात आपल्या वास्तूत झालेलं आहे. जाणून घेऊयात कि दिवाळीच्या साफसफाईत कोणत्या गोष्टी दिसणे भाग्यदायी असते.

मित्रांनो दिवाळीची साफसफाई करत असताना जर एखाद्या जुन्या पर्स कपड्यात काही पैसे तुम्हाला दिसून आले जे कि तुम्हाला लक्षात देखील नाही के हे तुम्ही केव्हा ठेवले होते असे अकस्मात पैसे सापडल्यास लक्षात घ्या हे माता लक्ष्मीचे संकेत आहे, कि तुमच्या घरात तिचे आगमन झालेलं आहे. लक्ष्मीला टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

मित्रांनो जे हे पैसे तुम्हाला जुन्या कपड्यात पर्स मध्ये सापडले आहेत हे तुम्ही चुकूनही खर्च करू नका त्याबदल्यात ते आपल्या देवघरात आपण ठेवू शकता किंवा आपण आपल्या तिजोरीत सांभाळून ठेवू शकता. पैसे जर खूप जास्त असतील तर ते आपण मंदिरात दान करू शकतात. एखाद्या पूजेत किंवा हे गरजू व्यक्तीस सतपत्री दान आपण ह्या पैस्यांचे करू शकता.

मित्रांनो दिवाळीची साफसफाई करताना जर तुम्हाला जर शंख, अनेक दिवस झाले मात्र तुम्हाला हा शंख दिसला किंवा एखादी कवडी नजरेस आली तर हा शंख किंवा कवडी जी माता लक्ष्मीस प्रिय असणाऱ्या वस्तूंपैकी आहे. अश्या वस्तू दिसल्यास आपण त्या स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवून त्या आपण आपल्या तिजोरीत ठेवाव्यात. पैस्यांमध्ये सतत वाढ होत जाते.

काहींच्या घरात साफसफाई करत असताना मोर किंवा बासरी दृष्टीस पडते. मोरपंख किंवा बासरी ह्या भगवान श्री कृष्णांच्या संभंदीत वस्तू आहेत. आणि भगवान श्री कृष्ण हे साऱ्या विश्वाचे अवतार. आणि म्हणूनच आपण ह्या वस्तू लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून सांभाळून ठेवाव्यात. मोरपंख आपण घरात कुठे लावावा ह्याबद्दल माहिती आपण आपल्या पहिल्या लेखात दिली आहे. आणि बासरी सुद्धा आपण आपल्या हॉल मध्ये किंवा आपल्या घरातील मुले ज्या ठिकाणी अभ्यासासाठी बसतात त्या ठिकाणी लावावी.

मित्रांनो दिवाळीची साफसफाई करत असताना एखाद्या देवीदेवतेची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला दिसून आला तर हा देखील एक शुभ संकेत आहे, मातेकडून हा इशारा आहे कि तुमच्या घरात आलेली आहे. घरात साफसफाई करत असताना आपल्याला अखंड तांदूळ जुने तांदूळ सापडले तर हा एक माता लक्ष्मीचा खूप मोठा शुभआशिर्वाद मानला जातो.

तांदूळ हे अत्यंत शुभ आहेत आणि हे शुक्र ग्रहाशी संभंदीत आहेत आणि ज्या काही शुक्र ग्रहाशी निगडित असतात त्या वस्तू सर्व सुख व ऐश्वर्याशी निगडित आहेत. ज्या सर्व वस्तूंची आपल्याला हौस असते त्या सर्व आप्ल्याला मिळतात म्हणून हे असे तांदूळ आपण आपल्या तिजोरीत ठेवावेत. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट