नमस्कार दोस्तांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो साधारणपणे घरात ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी खाल्ली जाते बाजरी सहसा हिवाळ्यात खाल्ली जाते. बाजरी चवीसोबत आरोग्यसाठी देखील चांगली असते. बाजरी हि उष्णता देते हिवाळ्यात तर ती हमखास खाल्ली जाते, ह्यात लोह, फॉस्फरस, प्रथिने, फायबर्स, मॅग्निशियम असते आणि हे सर्व घटक आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेमंद आहेत. वजन कमी करण्यासाठी सुद्धा बाजरीची भाकरीचा जेवणात वापर करता येतो, तर मित्रांनो आहे ना खास बात.
वजन कमी करण्यासाठी खूप काही करून देखील काही फायदा होत नसेल तर हे एक करून पहा, आजचा लेख खास त्याबद्दलच माहिती देणारा आहे तर शेवटपर्यंत नक्की वाचावा. सामान्यतः घरात ज्वारीशिवाय मक्याची भाकरी, आणि बाजरीची भाकरी देखील खाल्ली जाते. वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश अवश्य करा. बाजरीच्या भाकरीत फायबर्स चे प्रमाण जास्त असल्याने ते पचायला वेळ लागतो आणि त्यामुळे भूक देखील सारखी लागत नाही. आणि आपोआप वजन कंट्रोल मध्ये राहते.
निरोगी त्वचेसाठी देखील बाजरीची भाकरी खूप फायदेशीर ठरतेह्यात अँटिऑक्सिडेन्ट, सेलेनियम, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E सारखे पोषक घटक असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. फ्री रॅडिकलस जे त्वचेचे नुकसान करतात अँटीऑक्सडेन्ट हे फ्री रॅडिकलस पासून आपले संरक्षण करते,व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C हे देखील खूप फायदेशीर ठरतात.
रक्तदाबाची समस्या, बाजरी खाल्याने ऊर्जा हि मिळते ऊर्जेचा हा एक चांगला स्तोत्र आहे. बाजरीत पुरेश्या प्रमाणात मॅग्नाशीयम, पोटॅशिअम असते जे सामान्य रक्तदाब म्हणजेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यात कंट्रोल मध्ये ठेवण्यास मदत करते. कोलेस्ट्रॉल कंट्रोल ठेवण्याचे काम हे बाजरी करते. ज्या लोकांचे कोलेस्ट्रॉल जास्त राहते त्यांनी आपल्या आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश केला तरी चालेल ह्याच्या सेवनाने हृदयासंबंधी आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहतात.
चांगल्या झोपेसाठी देखील बाजरी खूप उपयुक्त ठरते, त्यामुळे तणाव कमी होतो. तणाव कमी झाल्याने झोप देखील चांगली लागते. अश्या परस्थितीत जर तुम्हाला झोप लागत नसेल तर तुम्ही रात्रीच्या जेवणात बाजरीच्या भाकरीचा समावेश नक्की करा. कर्करोग आणि मधुमेह असणाऱ्या पेशंटने देखील आपल्या आहारात बाजरीचा समावेश नक्की करावा.
हे रक्तातील साखरेची पातळी वाढूच देत नाही ह्या दोन्हीमुळे रक्तातील साखरेची पातळी कंट्रोल मध्ये राहते. इतकेच नाही तर बाजरी हि कर्करोगापासून बचाव करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरते. आजची लेखातील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच लेख आपल्या मित्रमैत्रिणींना शेयर नक्की करा.




