लाईफस्टाईल

कष्ट करून सुद्धा यश काही मिळत नाहीए, तेव्हा फक्त हि एक गोष्ट नक्की वाचा.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो १९५० च्या शतकात हार्व्हर्ड यूनिव्हसिटी मध्ये curt richrd नावाचे एक खूप मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी hope नावाचा एक खूप मोठा प्रयोग केला जो जगभर प्रसिद्ध आहे. एका पाण्याचा भरलेला जार आणि काही उंदरांना घेऊन त्यांनी हा प्रयोग केला. त्यांनी पाण्याच्या जार मध्ये एक उंदीर टाकला. तो उंदीर पोहोत राहिला. त्यांनी त्याचा जीव वाचवायचा खूप प्रयत्न केला. १५ मिनिटानंतर त्यांनी हार मानली आणि नंतर तो मरण पावला.

त्यानंतर शास्त्रज्ञाने आणखी एक नवीन जार आणला परत त्याच्यामध्ये एक नवीन उंदीर टाकला, आता ह्या उंदराने सुद्धा आपला जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. अगदी पाय हालवत होता, काही वेळातच तो बुडणार होता साधारण १५ मिनटे झाले असतील त्यानंतर त्या शास्त्रज्ञाने त्या उंदराला त्या जर मधून बाहेर काढले.

त्यांनी त्याला टॉवेल ने पुसणं घेतले त्याच्या शरीरावर मायने हात फिरवला त्याला प्रेमाची उब दिली. थोडा त्याला अराम करू दिला त्यानंतर काही वेळानी त्याला परत एका दुसऱ्या जार मध्ये टाकले. दुसऱ्या जार मध्ये आधीच्या जार एवढे पाणी भरले होते. शास्त्रज्ञानाला वाटले गेल्या टाइम ला त्याने १५ मिनटे वेळ प्रयत्न करत होता ह्यावेळी तो थोडा जास्त प्रयत्न करेल.

जास्तीत जास्त अर्धा तास आणि मग त्याला मला वाचवावे लागेल. शास्त्रज्ञानाला एक आश्चर्याचा जणू एक धक्काच ह्या उंदराने दिला. तो उंदीर बुडाला नाही. तो प्रयत्न करत राहिला पाय मारत राहिला दोन तास झाले तरी तो उंदीर बुडाला नाही. तो प्रयत्न करतच राहिला आपला जीव वाचवण्यासाठी ३ तास झाले तरी त्याने आपले प्रयत्न चालूच ठेवले. तो काही हार मानायला तयार नव्हता. त्याची दमछाक झाली होती मात्र तो त्यात तरुण होता. ७ तास झाले तरी तो पोहोत होता तो त्या हाताची वाट पाहत होता ज्याने त्याला मागच्या वेळी वाचवले होते.

तो बुडाला नाही तो हार मारत नव्हता, त्याचे प्रयत्न पाहून शास्त्रज्ञाने त्याला पाण्यातून बाहेर काढले. आणि ह्याच प्रयोगाला त्यांनी नाव दिले होप एक्सपेरीमेंट. म्हणजे आशेचा प्रयोग. शास्त्रज्ञ म्हणाला जेव्हा उंदीर पहिल्यांदा पाण्यात गेला होता तेव्हाच तो पाणयात बुडायला लागला होता. त्याने त्यावेळीच हार मानली होती मात्र जेव्हा मी त्याला बाहेर काढले. व नंतर त्याला जेव्हा बाहेर काढून पुन्हा पाण्यात टाकले तेव्हा वेळच्या सर्व सीमा त्याने पार केल्या. अगदी ७ तास तो जबरदस्त प्रयत्न करत राहिला कारण त्याला अशा होती कि तो वाचवणारा हात येईल म्हणून.

मित्रांनो आपणसुद्धा अश्या संकटांच्या जार मध्ये पडतो, तेव्हा आपल्याला समजत नाही कि नक्की करायचे तरी काय. त्या उंदराने जशी हार मानली तशी आपण सुद्धा सुरवातीलाच हार मानली तर आपण देखील बुडून जाऊ. पण जर आपण प्रयत्न करत राहिलो, आशेचा किरण असेल तर ज्याने आपल्याला ह्या जार मध्ये फेकलेले आहे. जो हि सर्व सृष्टी चालवतो ज्याच्या शिवाय ह्या सृष्टीचे पान देखील हालत नाही तो परमात्मा एकदिवस त्याचा देखील हात आपल्याकडे येईल व त्यातून आपल्याला बाहेर काढेल हा जर विश्वास असेल तर तुम्ही आयुष्यात तुम्ही कधीही हार मानणार नाही.

मित्रांनो हिंदी मध्ये एक म्हण आहे उम्मीद पे पुरी दुनिया कायम हे, म्हणजे हे जग चालले आहे ते आशेच्या किरणावर चालले आहे. त्यामुळे आयुष्यात उम्मीद कधीही सोडू नका विश्वास कधीही सोडू नका. ज्यांनी आपल्याला संकटांच्या जार मध्ये सोडले आहे तो आपली परीक्षा पाहत असतो. कि हा किती प्रयत्न करतो. जेव्हा हा हात येतो. तेव्हा तो ह्या जार मधून संकटातून बाहेर काढतो. तर मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेलच तर लाइक व शेयर नक्की करा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट