दूध हे खुप पौष्टिक आहे. तसेच रोज याचे सेवन केल्यास त्याचे आपल्याला खुप फायदे सुद्धा आहेत. पण काही लोकांना दूध कधी प्यायचे, त्या सोबत कोणते पदार्थ खावे कोणते पदार्थ खाऊ नये याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्याना सामोरे जावे लागते . काही जणांना पोटात गॅस होणे, अपचन होणे या सारख्या बऱ्याच समस्या आपल्याला दिसून येतात. तसेच दूध कसे प्यावे त्याचे सुद्धा काही नियम दिले आहेत. या बद्दल आपण आज थोडी माहिती जाणून घेऊ.
आपल्या सर्वाना माहीत असेल दुधाचे फायदे किती आहेत ते. पण बरेच लोक याबद्दल नेहमी बोलताना दिसून येतात. दूध पिल्याने वजन खुप वाढले आहे. काही जण बोलतात चरबी (fatt) खुप जास्त झाली आहे. काही जणांना पचन नीट होत नाही यासारख्या समस्या दिसून येतात. यासाठी आपण कोणते नियम पाळले पाहिजे या बद्दल थोडी माहिती जणू घेऊ, जेणेकरून आपल्या दुधाचे फायदे पूर्ण पणे मिळतील.
बरेच जण जेवण झाल्यावर दूध पीत असतील तर पीत जाऊ नका. जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर दूध कधीच घेऊ नये. कारण दूध हे एक पूर्ण अन्न असल्यासारखे आहे. दुधात पौष्टिक आहार खुप चागल्या प्रकारे असतो. त्याच बरोबर जर का आपण जेवणानंतर आपण दूध घेतले तर जे अन्न आपण खाल्ले आहे. त्या अन्नसोबत दुधाची रसायनिक प्रक्रिया होण्याची शक्यता असते.
त्यामुळे बऱ्याच लोकांच्या समस्या असतात अन्नपचन न होणे, तसेच गॅसेस होणे या गोष्टी होऊ शकतात. त्याच सोबत पोटाचा घेर वाढणे आणि अपचन होणे या सारख्या समस्या होऊ शकतात. मग दूध कधी प्याचे असा प्रश्न तुम्हला येत असेल. तर जेवणाच्या किंवा जेवणाच्या दोन ते तीन तास आधी दूध प्यावे जेणेकरून आपल्या इतर समस्यांचा त्रास होत नाही.
दुसरा नियम असा आहे आपण कांदा खाल्यानंतर दूध पिले नाही पाहिजे, किंवा कांदा खाताना सुद्धा दुधाचे पदार्थ खाऊ नये यामुळे आपल्याला त्वचा संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो. त्याच सोबत मांसाहार केल्यावर सुद्धा दूध घेत जाऊ नये. जर आपण मांसाहार केल्यावर दूध पिल्यास बऱ्याच जणांना पचना संबंधित त्रास होऊ शकतात, तसेच त्वचा संबधी समस्या होऊ शकतात.
चौथा नियम असा आहे जर का आपण जास्त प्रमाणत मिठाचे आणि तेलाचे पदार्थ खाल्ले असेल तर त्या वेळेस सुद्धा दूध घेऊ नका. यामुळे आपल्याला अपचन होणे, पोट फुगणे, मळमळ होणे या सारख्या समस्या होऊ शकतात. त्याच सोबत दही आणि दूध हे दोन पदार्थ एकत्र खाऊ नये. जरी दही दुधापासून तयार झलेले असेल तरी ती प्रक्रिया पूर्ण झालेली असते. जर का या दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्यास पुन्हा या प्रक्रिया होऊ शकतात.
दूध कधी आणि केव्हा घेतले पाहिजे. दूध शक्यतो रात्री जेवण झाल्यावर दोन तासांनी घेतले तर खुप चागले. तसेच दूध कधी पण कोमट करून घ्यावे जेणेकरून पचायला खुप सोपे जाते. तसेच सकाळी लवकर उठून दूध घेणे चागले असते. त्याच सोबत बऱ्याच जणांना प्रश्न येत असतो कि दुधात साखर टाकून प्याचे कि नाही. शक्यतो साखरे पेक्षा दुधात खडी साखर बारीक करून घेतल्यास खुप चागले तसेच तुम्ही मध सुद्धा टाकून दूध घेऊ शकतात.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.




