लाईफस्टाईल

नवरात्रीत हे संकेत जर तुम्हाला मिळाले तर समजून जा कि, देवी माता तुमच्यावर प्रसन्न आहे.

मित्रांनो नवरात्री सुरु आहेत आणि आपल्या सर्वांच्या घरी घटस्थापना केली असेलच. नवरात्रीच्या ९ दिवस देवींच्या ९ रूपांची आपण पूजा करतो त्यांना पुजतो आपण त्यांची मनोभावे पूजा करतो. पण नवरात्रीच्या पूजा हि आपली सफल होत आहे का, देवी आपल्यावरती प्रसन्न आहे का हे माहिती करून घ्याच असेल तर काही छोटे छोटे संकेत आपल्याला मिळत असतात.

काही स्वप्ने अशी पडतात काही प्राणी पक्षी आपल्याला समोर येतात आपण त्यांना बारकाईने जाणले आणि हे संकेत समजून घेतले तर हि आपली नवरात्रीची पूजा आपली संपन्न झाली आहे का माता राणीचा कृपाशिर्वाद आपल्याला लाभत आहे का हे आपण सहजासहजी ओळखू शकतो. हे संकेत आपण आपल्या आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

मित्रांनो नवरात्रीतील पहिला संकेत आहे तो म्हणजे नवरात्रीच्या कोणत्याही दिवसात स्वप्नात घुबड दिसले तर हा संकेत म्हणजे म्हणजे माता लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होणार आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या घरादाराची सर्व परिसराची स्वछता करा मातेच्या आगमनासाठी सुसज्ज व्हा. घरात दिवाबत्ती करा अखंड दिवा तर आपण लावलेला आहेच. मित्रांनो हा संकेत हे सांगतो कि आपल्या जीवनात धन संपदा पैसा ऐशवर्य हे नक्की येणार आहेत.

मित्रांनो घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन मानले जाते ह्यावरच माता बसून संपूर्ण पृथ्वीतलावर विचरन करत असतात. दुसरा जो संकेत आहे तो म्हणजे ह्या दिवसात सर्व शृंगार केलेली महिला जर तुम्हाला दिसली तर माता राणीने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. आणि मग तुमच्या जीवनातील कोणत्याही प्रकारची समस्या असेल पैस्यांची च नाही तर इतर कोणतेही समस्या असतील तर ती समस्या लवकरच दूर होणार आहे ह्याचा हा संकेत असतो आणि म्हणून आपली नवरात्रीची पूजा आपण विधिविधान चालू ठेवा.

तिसरा जो संकेत आहे तो म्हणजे नारळ, कमळाचे फुल किंवा हंस पक्षी हे जर सकाळी सकाळी तुम्हाला दिसू लागले तर लक्षात घ्या कि हि माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपादृष्टी आहे कारण नारळ आणि कमळ ह्यांना मातेच्या पूजेत विशेष महत्वव आहे. आणि हंस हे मातेचे वाहन आहे ह्या गोष्टी सकाळी दिसणे हे मातेचा आपल्यावर आशीर्वाद मिळाल्याचे संकेत आहेत.

चौथा संकेत जर घरातून बाहेर पडल्यानंतर जर तुम्हाला गोमातेचे म्हणजेच गाईचे दर्शन झाले तर हे खूप शुभ गोष्ट आहे कारण नवरात्रीच्या दिवसात गोमातेचे दर्शन होणे आणि त्यातल्या त्यात सफेद रंगाची गाई दिसणे म्हणजे तुमच्या मनातील एखादी मनोकामना. लवकरात लवकर पूर्ण होणार आहे ह्याचा हा संकेत असतो. तुम्ही मातेसमोर नतमस्तक होऊन एखादी इच्छा सांगितली नसेल तर ती तुम्ही बोलून दाखवा कारण हा संकेत तुमची इच्छा पूर्ण करणार आहे ह्याकडे दर्शवतो.

पाचवा संकेत असा येऊ कि जर तुम्ही नवरात्रात कुठे बाहेर एका कामानिमित्त पडला असाल जर तुमचा प्रवास चालू असेल आणि त्यावेळी जर तुमच्या उजव्या हाताला जर तुम्हाला एखादा सॅप दिसला किंवा एखाद्या वान्यराचे दर्शन झाले किंवा स्वप्नात तुम्हाला सोनेरी कलर चा साप दिसला तर हे सर्व संकेत देवीची कृपा तुमच्यावर बरसत आहे ह्यावर निर्देशित होतात.

तर अश्या प्रकारे देवी मातेकडून नवरात्रीत काही संकेत आपल्याला मिळत असतात त्यांना समजून आपण मेहनत कष्ट ह्यांच्याकडे अधिकाधिक लक्ष द्यावे. मित्रांनो आपल्याला आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट