लाईफस्टाईल

सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला ह्या वस्तूंचे दर्शन झाले, तर समजून जा कि तुम्हाला कामात यश मिळणार

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या वेबसाइटवरती. मित्रांनो जर दिवसाची सुरवात चांगली झाली कि पूर्ण दिवस चांगला जातो. कदाचित म्हणूनच मुले घराबाहेर चालली तर त्यांना आई दहीसाखर देते, जेणेकरून त्यांचा दिवस चांगला जाईल. पुराणामध्ये अश्या काही गोष्टींचे वर्णन केले गेले आहे ज्या घटना घडल्यास आपला संपूर्ण दिवस शानदार जातो. आजच्या लेखात आपण अश्याच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. ह्यापैकी एखादी जरी वस्तू दृष्टीस पडली तरी समजून जा कि तुमचा आजचा दिवस चांगला जाणार आहे.

पहिली गोष्ट आपण उठल्या उठल्या सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्यांना पाहावे हे खूप शुभ समजले जाते. आपल्या हातात देवी सरस्वती, देवी लक्ष्मी व श्री हरी विष्णूंचा वास असतो. म्हणून सकाळी आपण तळहाताकडे बघणे म्हणजे ह्या तिन्ही देवीदेवतांना बघून दर्शन केल्यासारखे होते व ह्यामुळे आपला दिवस मंगलमय जातो.

घरातून बाहेर पडताना जर तुम्हाला एखादी गौ माता म्हणजेच गाई दिसली तर ते खूप शुभ असते. जर तुम्हाला एखादा गवळी गाईचे दूध काढताना दिसले ते देखील खूप शुभ मानले जाते त्याचबरोबर गाईचे वासरू दूध पिताना दिसले तर तेही एक शुभ संकेत मानला जातो. सकाळी सकाळी पक्ष्यांचा कलकलाट ऐकणे किंवा ते दिसणे हे देखील खूप शुभ मानले जाते.

सकाळी पांढरी फुले किंवा हत्ती किंवा आपला एखादा मित्र दिसला ते देखील खूप शुभ असते. सकाळी सकाळी तुम्हाला एखाद्या ठिकाणी पूजेचा यज्ञ होताना दिसणे हे देखील खूप शुभ मानले जाते. त्यातल्या त्यात आपल्याला होमकुंडातील अग्नीचे दर्शन होणे हे तर त्याहून जास्त शुभ मानले जाते. सकाळी अग्नी दिसल्यास तुमचे सर्व वाईट दोष जळून जातात व तुमचे जीवन पवित्र होते.

पुराणात सुवासनी स्त्रीला देवी मानले गेले आहे, सकाळी सकाळी सुवासनी स्त्री दिसणे देखील खूप पवित्र मानले जाते परंतु ती घरातील स्त्री नसावी तर ती बाहेरची असावी तर ते शुभ मानले जाते. जर रस्त्याने जाताना एखाद्या मंदिरात आरती चालू असेल आणि तुम्ही ते पाहिल्यास आपल्या मनातील सर्व विकार दूर होतात, सकाळी घंटानाद कानावर पडणे ते देखील खूप शुभ मानले जाते.

सकाळी सकाळी शेणाला तसेच सोने तांबे ह्यांना पाहणे देखील खूप शुभ मानले जाते, ह्या वस्तू तुमचा दिवस शुभ बनवतात. सकाळी सकाळी सूर्योदय होताना पाहणेव त्याचे दर्शन करणे शुभ मानले आहे हयामुळे शरीरात स्फूर्ती संचारून आपला उत्साह वाढतो. सकाळी हिरवेगार गवत बघणे देखील शुभ असते ह्यामुळे आपल्या डोळ्यांना थंडावा मिळतो. जर सकाळच्या वेळी एखाद्या नदीचे दर्शन झाले तर तेदेखील खूप चांगले असते. नदीचा अर्थ प्रगतीकडे वाटचाल असा होतो.

तर मित्रांनो ह्यापैकी एखादी तरी वस्तू आपल्याला सकाळी दिसावी ह्यामुळे आपला दिवस आनंदमय जाईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट