धार्मिक

श्रावणात जर का तुम्हाला हे संकेत दिसले तर समजून जा कि भगवान शंकरांची कृपा आपल्यावर होणार आहे

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ. भगवान शंकरांचा सर्वात प्रिय महिना म्हणजे हा श्रावण महिना होय. ह्या श्रावण महिन्यात प्रेत्येक भक्त हा भगवान शिवशंकराची उपासना करत असतो. शिवालयात जाऊन पूजा करतो, ओम नमः शिवाय ह्या महामंत्राचा जप करतो. जेणेकरून महादेव प्रसन्न होतील व आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतील आपल्या जीवनातील कष्ट दुःख हारन करतील.

मित्रांनो ह्या श्रावण महिन्यात जर हे काही संकेत आपल्याला दिसले तर लक्षात घ्या कि आपण केलेली शिवशंभूंची पूजा मान्य आहे. महादेवांची अस्सीम कृपा आपल्याला आता लवकरच प्राप्त होणार आहे. ह्यातील सर्वात महत्वाचा संकेत म्हणजे गाईचे दर्शन होणे, मित्रांनो घराबाहेर पडताच जर तुम्हाला गाई दिसली तर लक्षात घ्या कि हिंदू धर्मशास्त्रानुसार गाईमध्ये ३३ कोटी देवीदेवता वास करतात. भगवान भोलेनाथ हे देखील गोमातेत वास करतात म्हणून भगवान भोलेनाथांनी आपणास दर्शन दिले आहे हा एक मोठा संकेत आहे, कि भगवान शंकरांनी आपली पूजा स्वीकार केली आहे.

दुसरा संकेत म्हणजे घराबाहेर पडताच नंदी चे दर्शन होणे नंदीदेव हे महादेवांचे एक प्रमुख गण आहेत आणि त्यांचे दर्शन होण्याने हा संकेत मिळतो कि शिवशंभूंनी आपली पूजा स्वीकार केली आहे. स्वप्नात किंवा साक्षात नागदेवतेचे दर्शन होणे, हा देखील एक मोठा संकेत आहे कारण नागदेवता ह्या शिवशंकरांच्या गळ्यात आभूषण स्वरूपात आहे. शिव शंभूंनी त्यांना आपल्या गळ्यात धारण केले आहे, म्हणूनच श्रावण महिन्यात सापाचे किंवा नागाचे दर्शन होणे शुभ संकेत मानण्यात आले आहे.

शिवशंभूंच्या हातातील त्रिशूळ हे शिवशंभुच्या हातातील प्रिय शस्त्र ह्याचे दर्शन तुम्हाला स्वप्नात किंवा साक्षात झाले तर हा देखील एक मोठा संकेत आहे कि शिवशंकरांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे कष्ट दूर होणार आहेत. श्रावण महिन्यात रुद्राक्षाचे दर्शन सुद्धा प्रेत्येक्ष शिवदर्शना इतकेच हिंदू धर्मशास्त्राने महत्वपूर्ण मानले गेले आहे. रुद्राक्षाचे दिसणे म्हणजे प्रेत्येक्ष शंकरानी आपल्याला दर्शन दिल्यासारखे आहे. ह्याचा अर्थ हा संकेत असा सांगतो कि आपल्या इच्छांची पूर्तता लवकरच होणार आहे.

मित्रांनो ह्या श्रावण महिन्यात आपल्या दारापुढे एखादी विद्वान धार्मिक व्यक्ती किंवा एखादे साधुसंत येत असतील तर त्यांना रिकाम्या हाती कधीच पाठवू नका आपल्या कुवतीप्रमाणे त्यांना दानधर्म नक्की करा. कारण हा देखील एक संकेत आहे कि जाठाधारी साधुसंत ऋषीमुनी आपल्या घरी आल्याचा आपली पूजा स्वीकार केल्याचा संकेत आहे.

स्वप्नात जर पार्वती मतांनी दर्शन दिले तर जे विवाहइच्छुक मुले मुली आहेत त्यांचा विवाह लवकरच होणार. स्वप्नात शिवमंदिराचे दर्शन होणे हा देखील एक मोठा संकेत आहे शिवकृपा प्राप्त होण्याचा. स्वप्नात जर शिव तांडव करताना दिसले तर लवकरच आपले शत्रू शांत होतात आणि आपले सर्व पैसे देखील लवकरच प्राप्त होतात. श्रावण महिन्यात स्वप्नात दूध किंवा दही दिसणे हा देखील खूप मोठा संकेत आहे. भगवान शिवशंकराची कृपा आपल्यावर लवकरच प्राप्त होणार आहे.

तर हे होते काही संकेत ह्यातील एकही संकेत जर तुम्हाला मिळाला असेल तर समजून जा कि तुमची प्रार्थना तुमची इच्छा भगवान शिवशंकरानी ऐकली आहे तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. त्यांनी आपली पूजा स्वीकार केली आहे. तर मित्रांनो आजचा लेखाला लाइक व शेयर नक्की करा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट