लाईफस्टाईल

आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर हि एक सवय आजच लावा.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो जगातील ९० टक्के संपत्ती हि फक्त १० टक्के लोकांकडे आहे आणि जगातील १० टक्के संपत्ती हि ९० टक्के लोकांकडे आहे. असे चित्र का आहे जगातील १० टक्के लोकच फक्त श्रीमंत आहेत. व बाकीचे ९० टक्के लोक हि पैसे कमवण्यासाठी धडपडत आहेत. असे का ह्याचे उत्तर तुम्हाला ह्या लेखाच्या शेवटी नक्की मिळेल.

आज आपण अशी एक गोष्ट सांगत आहोत ज्याचे मर्म तुम्हाला समजले तर तुमच्या जीवनात कमालीचे बदल घडेल. एक साधू त्याच्या शिष्यासोबत गावी निघालेले असतात दुपारची वेळ असते आणि सूर्य अगदी तळपत असतो. त्यांना खूप तहान लागते म्हणून ते शेजारीच असणाऱ्या शेतातील विहरीजवळ जातात.

शेत हे उपजाऊ दिसत होते. परंतु त्यात धनधान्य लावले नव्हते, ते बरेच वर्ष तसेच पडून होते. शेताच्या मधोमध त्यांना एक झोपडी दिसते त्याच्या बाहेर जाऊन ते झोपडीच्या दरवाजा वाजवून हाक देतात. ते म्हणतात आम्हाला खूप तहान लागली आहे आम्हाला पाणी मिळेल का, तो माणूस पाणी आणायला जातो तेव्हढ्यात त्याची २ मुले व बायका घरी येतात.

त्याच्या मुलांच्या व बायकॊच्या अंगावर फाटके कपडे असतात. तो साधू त्या माणसाला विचारतो शेतात तर काही उगवत नाही मग तुमचे घर कसे चालते. माणूस ह्यावर उत्तर देतो कि शेत आहे परंतु आमच्यकडे मैह्स आहे ती दूध देते, त्या दुधाची विक्री करून आम्ही आमचे घर चालवतो. गप्पा रंगतात व संध्याकाळ होते. तो साधू व शिष्य तिथेच रात्री थांबतात.

मध्यरात्री साधू आपल्या शिष्याला उठवतात आणि म्हणतो आपल्याला लगेच निघायचे आहे. तो शिष्याला सांगतो जी बाहेर मैह्स बांधलेली आहे तिला देखील सोबत घे. शिष्याला देखील साधूंचे असे विचारणे थोडे त्याला विचारात टाकते परंतु गुरूंची आज्ञा असल्यामुळे तो देखील तिला घेऊन येतो त्यांना जाताना वाटेत एक जंगल लागते. त्यावेळी साधू आपल्या शिष्याला सांगतात त्या म्हशीला इथेच सोडून दे. शिष्याला काही कळत नाही कारण ज्या म्हशीच्या जीवावर ज्या माणसाचे घर चालले आहे ती मैह्स जंगलात जाणार होती, पंरतु गुरु आज्ञा म्हणून तिला तो शिष्य जंगलात सोडतो.

ह्या गोष्टीला १० वर्ष काळ लोटतो. शिष्य साधूकडून शिक्षा घेऊन मोठा माणूस बनतो, पंरतु त्या शिष्याच्या मनात एक खंत असते कि आपण एका माणसाचा संसार उध्वस्त केला. म्हणून एके दिवशी तो प्रयशस्चीत करण्यासाठी तो आपली गाडी घेऊन त्या माणसाच्या घराकडे निघतो. माणसाकडे आल्यानंतर त्याच्या शेतात त्याला वेगवेगळ्या फळांची झाडे त्याला दिसतात. त्याला वाटते मैह्स गेल्यामुळे त्याने त्याची जमीन दुसऱ्याला विकली असावी.

तो जायला निघतो तेवढ्यात त्याला तोच माणूस त्या शेतात दिसतो. तो त्याला भेटून विचारतो कि मला ओळखलं का मी माझ्या गुरूंसोबत १० वर्षापूर्वी तुमच्यकडे आलो होतो. तो माणूस म्हणतो कशी विसरेन मी ती रात्र, तुम्ही त्या रात्री न सांगताच निघून गेला आणि नेमके त्या रात्रीच आमच्या गावात चोर आले होते जे आमच्या म्हशीला देखील चोरून घेऊन गेले.

मैह्स चोरीला गेल्यामुळे आमचे सुरवातीचे काही दिवस खूप वाईट गेले मेहनत केल्याशिवाय काहीच उपयोग नव्हता. म्हणून आम्ही लाकडे तोडून विकायला सुरुवात केली थोडे पैसे येईला लागले. त्या पैस्याचे आम्ही शेतात धनधान्य पेरले त्याचे चांगले पीक आले, व त्याच पैस्यातुन आम्ही वेगवेगळ्या फळांची झाडे लावली. झाडे चांगली फळे देऊ लागली म्हणून मी आणखी झाडे लावली आता मी जिल्ह्यात एक नंबरचा व्यापारी झालो आहे.

त्यावर तो शिष्य त्या माणसाला विचारतो तुम्ही हे आधीही करू शकला असता. त्यावर तो माणूस त्याला सांगतो, आधी मैह्स असल्यामुळे पांगळा झाला होता. मला वाटत होत कि सर्व काही ठीक आहे. परंतु मैह्स चोरीला गेल्यावर मला दुसरा काही पर्याय नव्हता, त्यावेळी खूप मेहनत घेतली आणि त्याचेच फळ हे आत्ता आमची फळांची बाग आहे.

मी त्या चोरांचे आभार मानतो ज्यांच्यामुळे मी आज श्रीमंत आहे. मित्रांनो हि गोष्ट विचार करायला लावते कि आपण देखील आपल्या जीवनात कोणती मैह्स नाहीए ना ज्यावर आपण विसंबून असतो. जी आपल्या प्रगतीच्या आड येते, असे असेल तर हीच ती वेळ आहे आत्मविश्वासाने पाऊल उचल्याण्याची. आयुष्यात जर काही मोठे करायचे असेल तर चौकटीच्या बाहेर जाऊन काही गोष्टी करायला लागतात. तुम्ही म्हणाल हे बोलायला खूप सोपे आहे आणि तुमचे बरोबर देखील आहे.

परंतु तुम्हाला असामान्य जीवन जगायचे असेल तर तुम्ही तयार राहा नाहीतर मेहनत करा. महेंद्रसिंग धोनी ने टी सि चा जॉब सोडला नसता तर भारताचा कॅप्टन झाला नासता अशी अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या कंफर्ट झोन सोडून गोष्टी केल्यात व ते यशस्वी झालेत. असे माही कि त्यांना अपयश नाही आले त्यांनी संकटांचा धैर्याने सामना केला. तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात काही करायचे असेल तर तुमच्या कंफर्ट झोन च्या बाहेर येऊन प्रयत्न करावे लागतील.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट