वास्तू शास्त्र

वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील सोफासेट ठेवा ह्या दिशेला.

नमस्कार मित्रांनो कॉफी विथ स्टोरीस ह्या आमच्या वेबसाइट वरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो तुमच्या घरातील सोफासेट त्याची दिशा कोणती आहे. घरातील सोफासेट ची दिशा कोणती असावी, वास्तुशास्त्राच्या अनुसार घरात कोणत्या दिशेला सोफासेट ठेवल्याने घरात आनंदी वातावरण निर्माण होते. मित्रांनो ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या लेखात देणार आहोत म्हणून पूर्ण लेख अवश्य वाचावा.

वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय, ह्यामुळे नेमके होते तरी काय असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. समजा आपल्या डोळ्यांच्या जागी कानाच्या जागी असते, नाक गुडघ्यांवर असते तर काय झाले असते, आपन विकृत दीसलो असतो कि नाही. तसेच काही वास्तुशास्त्राचे देखील आहे. वस्तूची नेमकी जागा तिची लाभदायकता ह्या विषयीचे योग्य मार्गदर्शन वास्तुशास्त्र करते. वास्तूमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो, म्हणून चांगल्या वास्तूसाठी व त्याच्या सुरक्षेतेसाठी ह्यात सतुंलन ठेवणे फार महत्वाचे असते.

कधी कधी भिंतीवरील एखादे चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा करते. स्वयंपाकघरात काही दोष असतील तर घरातील लोकांच्या आरोग्यवर त्याचा परिणाम होतो. आणि ह्याच सर्व वास्तूमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या घरातील हॉल. कारण त्या हॉल मध्ये आपण घरात आल्या आल्या तिथे विसावा घेतो. कोणत्याही घरात प्रवेश केला असता त्या लक्ष वेधून घेतात, घरात प्रवेश करताच त्या आपल्याला जणू काही खुणवत असतात. अश्या जागांपैकी एक म्हणजे आपल्या घरातील कोपऱ्यातील सोफासेट.

घरात प्रवेश केल्यानंतर काही वेळ निवांत बसण्याची जागा. तुम्हाला माहिती आहे का ह्या जागेला देखील महत्वव आहे, म्हणजेच तुमच्या घरात जितका महत्वाचा सोफासेट आहे तितकाच त्याची जागा घरातील महत्वाची आहे. वास्तुशास्त्राच्या मते घर जर पूर्व दिशेला असेल तर त्यातील हॉल हा पूर्व उत्तर दिशेला असावा म्हणजेच ईशान्य दिशेला. घर जर पश्चिम दिशेला असेल तर हॉल हा वायव्य दिशेला असावं आणि जर घर दक्षिण दिशेला असेल तर हॉल हा आग्नेय दिशेला हॉल असावा.

वास्तुशास्त्रात सांगितल्यानुसार घराचा दरवाजा जर पश्चिमेस असल्यास घरातील सोफा हा नैऋत्य दिशेस म्हजेच दक्षिण व पश्चिम च्या मध्ये असावा. घराचे दार पूर्व दिशेला असेल तर सोफासेट हा नैऋत्य दिशेस असावा ते फायद्याचे ठरते. इतरत्र कोणत्याही दिशेला मुख्य दरवाजा असेल तर उत्तर आणि ईशान्य कोपरा सोडून दुसरे कुठेही सोफासेट ठेवावा जेणेकरून घरात नेहमी आनंददायी वातावरण निर्माण होते.

खास करून घरातील कमावत्या व्यक्तीसाठी घराच्या दरवाजाकडे तोंड करून बसने त्यांच्या फायद्याचे ठरते. मग मित्रांनो तुमच्या घरातील सोफ्याची दिशा बरोबर आहे ना नसेल तर ती आजच नीट करून घ्या. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट