८ दिवसात तुमच्या मेंदूची शक्ती वाढवा, Increase your brain power in 8 days
लाईफस्टाईल

एका आठवडयात मेंदूची कार्य शक्ती वाढवा.

प्रत्येका मध्ये आणि प्रत्येकाच्या मेंदू मध्ये काम करण्याचे आर्याद सामर्थ आहे. काही सर्वे नुसार प्रत्येक व्यक्ती हा फक्त आपल्या मेंदूचा एक ते दोन टक्के वापर करतो. सर्वात जास्त मेंदूचा वापर हा अल्बर्ट आईन्स्टाईने (Albert Einstein) केला होता असे काही जणांचे मत आहे. जर का आपण ठरवले तर आपल्या मनाची आणि मेंदूची कार्य शक्ती काही दिवसात वाढू शकतो.

आज आपण मनाची आणि मेंदूची कार्य शक्ती कशा पद्धतीने वाढवता येईल या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. खरे पहिले तर मन आणि मेंदू या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. पण आपल्याला या दोन्ही गोष्टी एकत्र कारण काम कशा पद्धतीने चागले करता येईल हे जाणून घ्याचे आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल, त्याच सोबत स्मरणशक्ती वाढण्यास सुद्धा मदत होईल.

पहिला मार्ग कोणतेही काम करताना त्यावर आपले लक्ष केंद्रित करा. बऱ्याच वेळेस असे होत असते. आपण काम करत असतो पण आपले लक्ष हे दुसरी कडे असते. या मुळे त्या कामाचा आनंद आपल्याला घेता येत नाही. दिवसभरात किती तरी असे काम आहेत. ते आपण करताना आपले लक्ष हे दुसरी कडे असते. त्यामुळे त्या कामाचा आनंद आपल्या घेता येत नाही. कोणतेही काम असो त्याचा आनंद घेत आणि त्यावर आपले लक्ष केंद्रित करून केल्यास आपली एकाग्रता वाढेल. काही दिवस आपल्या या गोष्टीचा त्रास होईल कारण आपले मन हे चंचल असते. रोज ठरवून केल्यास ते शक्य होईल.

दुसरा मार्ग समोरच्या व्यक्तीचे निरीक्षण करायला शिका. समोरचा व्यक्ती कशा पध्द्तीने बोलतो. त्याची काम करण्याची पद्धत काही आहे. इतर व्यक्ती सोबत कशा पद्धतीने बोलतो आणि वागतो. त्याची काम करताना देहबोली कशी असते या कडे लक्ष द्या. यामुळे तुम्हला तुमच्या मेंदूला चालना देण्यास मदत होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा समोरच्या व्यक्तीचे कोणतेही वाईट गुणच लक्षात ठेवायचे असे नाही किंवा त्यावर लक्ष केंद्रित करायचे असे नाही.

तिसरा मार्ग कोणतेही काम आत्मविश्वासाने करा. आपल्या हातात एखादे काम आले असेल. आणि जर का आपल्याला त्या बद्दल जास्त माहीत नसेल तरी सुद्धा ते पूर्ण करण्याची जिद्द्त मनात ठेवा. जर का पण कोणतेही काम अर्धवट मनाने केल्यास आपल्या मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते. तसेच एखादे छोटेसे काम सुद्धा आपल्याला डोगरा एवढे वाटेल. कोणतेही काम असो हातात घेतल्यावर पूर्ण क्षमतेने करा त्याचा कोणताही परिणाम येणार असेल तरी त्या कडे लक्ष देत बसू नका.

चौथा मार्ग स्वतःल नेहमी अपडेटेड ठेवा. ज्या क्षेत्रात काम आपण करत असतो त्या क्षेत्रातील प्रत्येक नवीन गोष्टी शिकत जा. तुम्हला माहित असेल ज्या गोष्टी वापरात नसतील त्या वस्तूला गंज चढतो. त्याच प्रमाणे जर का आपण नवनवीन गोष्टी शिकल्या नाहीत तर आपल्या मधील आत्मविश्वास कमी होत जातो. त्यामुळे स्वतःल नेहमी अपडेटेड ठेवत जा.

पाचवा मार्ग नेहमी अवघड कामे करायला शिका. प्रत्येक जण हा आधी सोपी कामे करायला पहात असतो आणि अवघड कामे टाळण्याचे पर्यन्त करत असतो. पण एक लक्षात असुद्या जर का पण अवघड कामे टाळत गेलो तर काही दिवसात त्यापेक्षा जास्त ताकतीने ती कामे आपल्या समोर येऊन उभी राहत. तसेच अवघड कामे केल्यास आपल्या मेंदूला जास्त चालना मिळते.

वरील या पाच गोष्टीचे योग्य पालन करत गेलो तर काही दिवसात मेंदूची कार्य शक्ती वाढेल. कोणतेही काम करताना आपली एकाग्रता वाढेल आणि आत्मविश्वास सुद्धा वाढेल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट