मित्रांनो coffeewithstories.com या आमच्या चॅनेल वर आपले मनःपूवर्क स्वागत आहे. अश्याच आर्टिकल वाचण्यासाठी आपल्या चॅनेल ला नक्की लाइक आणि फॉलो करा. मित्रांनो हे व्यक्ती मत्व हे मोठे कोणी चित्रपटातील हिरो नाहीत किंवा ते मोठे उदोयग पती देखील नाहीयेत किंवा कोणी गोल्डन म्यान देखील नाहीयेत पण हे असे व्यक्तीमत्व आहे त्यांचा कडे गर्दी खेचण्याची ताकद आहे होई हेच ते हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज. त्यांची कीर्ती अगदी महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली आहे. आजच्या मोबाइल च्या दुनियेत ते यु-ट्यूब च्या माध्यमातून त्यांची विनोदी कीर्तने अगदी सर्व वयोगट्यांचे लोकांना आवडतात आणि त्याचमुळे ते सर्वांचे चाहते झाले आहेत.

महाराजांना प्रत्येक्ष ऐकण्यात जी मजा आहे ती एखाद्या विनोदी अभिनेत्याला प्रत्येक्ष ऐकण्यात देखील नाही. अगदी गावरान भाषेत कीर्तन सांगणारे इंदूरकर महाराज हे उच्च शिक्षित आहेत ते बी एस सि बी एड आहेत काही दिवस त्यांनी प्राध्यापक म्हणुन देखील काम केल. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी कीर्तन करायला सुरवात केली. आणि विशेष म्हणजे त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी जर तारिक बुक करायची असेल तर एक वर्ष आधी करावी लागते आहेत कि नाही सेलिब्रिटी. ते कीर्तनातून येणारे पैसे हे ज्ञानेश्वर माउली बहुउद्देशीय शिक्षण सस्था यासाठी वापरतात. महाराजांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यामधील अकोला तालुक्यातील इंदोरी हे आहे, पण आता संगमनेर तालुक्यातील ओझर येथे राहतात.

महाराजांच्या पत्नी शालनी ताई देशमुख ह्या देखील कीर्तनकार आहेत.त्या देखील गावो गावी जाऊन कीर्तन करतात. महाराजांचा दररोजचा प्रवास किमान ६०० किलोमीटर इतका होतो. महाराजांच्या शाळेत फक्त २५० इतका खर्च प्रतेय्क विद्यार्थ्याला येतो इथे चाचणी ची फी नाही कि दाखल्याची फी नाही अगदी मोफत शिक्षण आहे. फेसबुक, टिकटॉक, व्हाट्स अँप, यासारख्या अँप वरती देखील महाराज खूप प्रसिद्ध आहेत मुले त्यांची नक्कल करतात महाराज हे तरुण पीडीमध्ये देखील खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. महाराजांना २ आपत्य आहेत मुलगी ज्ञानेश्वरी आणि मुलगा कृष्णा. हे दोघे देखील वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहेत.

महाराजांचं कीर्तन म्हणलं रे म्हणलं कि गर्दी जमा होते. येव्हडच नवे तर महाराज स्वतः आत्मविश्वासाने म्हणतात कि माझ्या येवढी गर्दी कोणत्या कीर्तनकाराने जांवूनच दाखवावी. महाराज म्हणतात मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, हलके फुलके नर्म विनोद करत कीर्तनाच्या माध्यमातून समजप्रभोदन करतात अनेक गावातील रात्रीच्या वराती बंद झाल्या आहेत तसेच कितेय्क गाव दारूबंदी देखील झाली आहेत हे सर्व त्याची आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून केलं आहे. आई वडिलांचा सांभाळ न करणारी मूल सांभाळ करू लागली आहेत हे सर्व महाराजांच्या कीर्तनामुळे शक्य झाले आहे.महाराज म्हणतात कि माझा कीर्तनांच हेच फलिद आहे. कोणी निंदा कोणी वंदा पण माझा विनोदातुन समाज प्रभोदन करत कीर्तन करण्याचा धंदा असच ते म्हणतात.




