नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो २४ जून गुरुवारचा दिवस जेष्ठ पौर्णिमा चा दिवस आणि ह्या दिवशीच अली आहे वटपौर्णिमा. मित्रांनो हि पौर्णिमा खासकरून विवाहित महिलांसाठी खास असते. पतीसाठी ह्या दिवशी महिला व्रत करतात, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.
ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला उपाय हा महिलांसाठीच आहे, पाच तुळशीची पाने घरात ह्या ठिकाणी ठेवले तर कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. घरात बरकत राहील, धनधान्य कमी पाडणार नाही, घरातील लोकांचे स्वास्थ्य हे उत्तम राहील म्हणून हा उपाय करायचा आहे. आणि ह्या उपायासाठी तुम्हाला फक्त ५ तुळशीची पाने लागणार आहेत.
वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ५ तुळशीची पाने तोडून घ्यावेत, ती तुळशीची पाने धुवून ती देवघरात ठेवायची आहेत. देवघरात ठेवल्यानंतर आपण दररोज नित्यनियमाने देवपूजा करतो ती करावी. नंतर आपण दिवा लावावा अगरबत्ती लावावी. नंतर आपण त्या तुळशीच्या पानांवर हळदी कुंकू अक्षदा टाकून त्याची पूजा करावी. हे सर्व झाल्यानंतर आपण ती तुळशीची पाने त्यातील ५ तुळशीची पाने आपण वेगवगळ्या ठिकाणी ठेवायची आहेत.
पहिला जागा म्हणजे आपण आपल्या घरातील जिथे धान्य ठेवतो तिथे हे एक पण ठेवायचे आहे, म्हणजे त्या धान्यातच हे एक पण टाकायचे आहे. दुसरे तुळशीचे पान आपण तिजोरीत ठेवायचे आहे जिथे तुम्ही दागदागिने ठेवता. तिथे तुम्ही ठेवायचे आहे. तिसरे पान आपण आपल्या पतीच्या पाकिटात ठेवायचे आहे. चौथे पान आपण देवघरातच राहू द्याचे आहे.
पाचवे पाण आपण आपल्या गॅस ओट्यावर ठेवायचे आहे. अश्या प्रकारे आपण ५ तुळशीची पाने ठेवायचे आहेत. ह्या पानांपैकी आपण गॅस ओट्याजवळील पान आणि देवघरातील पाण आपण दुसऱ्या दिवशी काढून घेऊ शकता कारण ते तिथे खराब होईल आणि म्हणून ते तिथून ते आपण तुळशीच्या वृदावनात ठेवून द्या किंवा विसर्जित करून द्या. बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी आपण ठेवलेली पाने आपण तशीच ठेवून द्यावी ते सुकलेले असेल तरी राहू द्यावे.
अश्या पद्धतीने आपण २४ जुन ला गुरुवारी हि ५ तुळशीची पाने आपण ठेवा तुम्हाला कोणत्याच गोष्टींची कमी राहणार नाही. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




