लाईफस्टाईल

जाणून घ्या निंदा केल्याने काय होते, व त्याचे परिणाम काय होतात.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो खूप व्यक्तींना दुसऱ्याची निंदा करण्यास खूप समाधान वाटत असते ते नेहमी कोणाची ना कोणाची निंदाच करत असतात. कोणाचे काही चांगले माहित पडले कि वाईटच त्या व्यक्तींना दिसते कारण ह्यांना कोणाबरोबर चांगले बोलण्याची सवयच नसते. कोणी जर एखाद्या मंदिरात मोठी देणगी दिली किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला तर आपण म्हणतो हा काय मोठेपणा किंवा बडेजावपणा आहे. पण इतका पैसा त्याच्याकडे कुठून येतो ना ते फक्त मलाच माहित आहे.

तो लोकांना कशाप्रकारे लुबाडतो कसे फसवतो ह्या बद्दल आपण चर्चा करतो. आपण नेहमी इतरांचे वाईट कर्म व आपल्या कर्माचीच चर्चा करत असतो परंतु ह्याचा परिणाम असा होतो कि समोरच्या व्यक्तीने जे काही वाईट कार्य केले असेल त्याच्याविषयी आपण चर्चा केल्यास त्या वाईट कर्माबद्दल जे काही फळ त्या व्यक्तीला मिळणार असेल ते त्यातील थोडेसे फळ आपल्याला मिळते.

ह्या विषयी आपण एक कथा सांगतो एक राजा होता तो खूप धार्मिक वृत्तीचा होता त्याचा असा दरोरोजचं नियम होता कि जेवढे पण त्याच्या नगरात ब्राह्मण आहेत त्या सर्वाना तो भोजन देत असे त्यासाठी त्याच्या भंडारगृहात दरोरोज भरपूर अन्न शिजत होते. व राजा स्वतः त्या ब्राह्मणांना वाढत असेल दररोज जेवणाच्या पंक्ती भरत असत. ह्या सर्व कार्यमुळे त्या राजाची सर्वत्र कीर्ती पसरली, राजाची सर्वत्र व्हा व्हा झाली.

राजचा मोठा वाद होता आणि त्या ठिकाणीच हे भोजन बनत असे. एकदा भोजन बनवत असताना वरून घार आपल्या तोंडात विषारी साप घेऊन नेत होती सापाचे तोंड उघडे असल्यामुळे नेमके विष त्या खिरीच्या भांड्यात पडले हे सर्व घटना कोणाच्याही लक्षात अली नाही. ब्राह्मण भोजनास आले राजानी खीर वाढली जेवण झाल्यानंतर सर्व ब्राह्म्ण तेथेच मरून पडले.

असे कसे घडले हे राजाला कळेना म्हणून राजाने स्वयंपाक करणाऱ्याला बोलावणे पाठिवले परंतु सर्वांचे जेवण झाल्यानंतर तोही जेवला होता आणि तोही मरून पडला होता. आता राजाला काय करावे कळेना. त्याच्या हातून खूप लोकांची हत्या झाली आहे ह्याचे त्याला दुःख झाले होते. त्याने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रजेने राजाला रोखले.

परंतु राजा नेहमी चिंतेत राहू लागला व राजा मरण पावला. त्याला नेण्यासाठी यमदेव आले व न्यायासाठी भगवंतांसमोर उभे केले व सांगितले कि ब्राम्हण हत्याचे पाप कोणाच्या माथी टाकायचे कारण राजा अन्नदानाचे पवित्र काम करत होता त्याला दोषी धरता येणार नाही. कारण ह्यात त्याची काहीच चूक नाही. आचारी होता त्याने काही टाकले नाही तर त्याचा हि काही दोष नाही सापाने विष टाकले परंतु तोच मृत्यूच्या दारात होता म्हणून त्याचा हि दोष नाही. घार आपले पोट भरण्यासाठी साप घेऊन जात होती.

हे देखील काही पाप नाही म्हणून घार देखील दोषी नाही. पण ब्रह्महत्या तर झाल्यात आणि कोणाला तरी दोषी ठरवावे लागेल व शिक्षा द्यावी लागेल. मग भगवंता आता तुम्हीच न्याय करा असा यमराज म्हणाले. त्यावर भगवंतांनि यमाला खाली राजच्या नगरीत पाहा म्हणाले तिथे सर्वत्र शोककळा पसरली होती सगळेजण राजाच्या जाण्याची हळहळ व्यक्त करत होते.

तर काही लोक राजाची निंदा करत होते सांगत होते कि बरोबर त्या राजाला त्याच्या कर्माचे फळ मिळाले राजा खूप वाईट होता. असे सर्व बोलणे यमदेवांनी ऐकले व भगवंताकडे पहिले, भगवंतांनी सांगितले कि हे जितके लोक राजाची निंदा करत आहेत व ब्रम्हहत्येबद्दल चर्चा करत आहेत त्या सर्वांच्या नावावर ब्रह्महत्याचे पाप जमा करा.

तर जेव्हा आपण एकाद्या बद्दल किंवा त्याच्या वाईट कामाची चर्चा करता, तेव्हा आपण समजून जावे कि त्याच्या पापात आपण भागीदार झालो आहोत. खूप घरात भांडणतंटे ह्या कारणामुळे होतात कि माझे कोणी देखील ऐकत नाही, आपण कोणाचे ऐकून घ्यालच तयार नाही फक्त मी सांगेन तेच खरे व तसेच तुम्ही करा असे आपण इतरांना सांगतो परंतु, आमचेच ऐका म्हण्यापेक्षा आमचेही ऐका असे बोलल्याने भांडण वाद होत नाहीत. आपण इतरांची निंदा करण्यातच जास्त रस घेतो.

जर आपल्या दारात कोणी कचरा टाकला तर आपण लगेच दुसऱयांशी भांडण करतो परंतु आपल्या मनात जर कोणी कचरा टाकला इतरांबद्दल कोणी वाईट बोलले तर आपल्याला त्याबद्दल काहीच कसे वाटत नाही. कोणाची हि निंदा करू नये कारण ते सर्व आपल्या समोरच येऊन उभे राहते. म्हणून चांगले बोला आपले जीवन पवित्र करा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट