खुप जण जया एकादशी करतात. हि एकादशी माग महिण्याच्या शुक्ल पक्षात येते. येत्या काही दिवसात हि एकादशी येणार आहे. जया एकादशीला भक्त श्रीहरी विष्णूची पूजा करतात. काही मान्यते नुसार जर का आपण जया एकादशी केली तर पाप कर्म आणि कष्ट या पासून सर्वां मुक्ती मिळते. त्याच बरोबर जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात.
जर का हे व्रत मनापसून आणि नित्य नियमाने केल्यास प्रत्येक माणसाला सर्वच संकटा पासून मुक्ती मिळते. जो व्यक्ती कोणतेही व्रत मनापसून करतो त्याला फळ नक्की मिळते. तसेच यादिवशी जया एकादशीचे पठण नक्की करावे. भारतीय दिनदर्शिका नुसार जया एकादशी हि या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शुक्रवारला अली आहे. या दिवशी आपल्या मनामध्ये कोणतीही शंका नघेता हे व्रत करावे.
हि एकादशी कधी आहे असा तुम्हला प्रश्न येत असेल. दिनांक अकरा फेब्रुवारीला एकादशी सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे बारा फेब्रुवारीला संपणार आहे. हि जया एकादशी दुसऱ्या दिवशी ४. ५७ मिनिटा पर्यंत असेल. या वेळेत जया एकादशीचे व्रत करायचे आहे, तसेच या एकादशीला काही जुन्या कथा सांगितल्या गेल्या आहेत.
जया एकादशी नंतर हरलेले राज्य पुन्हा राजा हरिशचंद्र याला मिळाले होते. अशी गोष्ट सांगितली जाते. त्याच बरोबर या एकादशीमुळे त्यांची सर्व दुःख दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त झाली होती. जया एकादशीला अन्नदा एकाद्शी किंवा कामिका एकादशी सुद्धा बोले जाते. परायणाची वेळ तेरा फेब्रुवारीला सकाळी ७ ते ९ आहे. तसेच हे व्रत करताना काही नियम आपल्या पालन करावे लागते.
चलतर काही व्रताचे नियम आपण जाणून घेऊ. ज्या व्यक्तीला जया एकादशीचे व्रत करायचे आहे त्यांनी दशमीच्या दिवसा पासून याची तयारी सुरु केली पाहिजे. दशमीच्या दिवशी जे व्यक्ती उपवास ठेवतात त्यानी या दिवशी कांदा, लसूण, तसेच डाळी पासून तयार केलेले पदार्थ खाऊनये. त्याच सोबत मध सुद्धा खाणे टाळावे. त्याच सोबत व्रत पूर्ण होईपर्यंत ब्रम्हचर्या सारखे रहावे.
हे व्रत कधी सोडावे तर ज्या दिवशी व्दादशी संपणार आहे त्या आधी सोडावे. एकादशी दिवशी सकाळी अंघोळ केल्यावर देवाची पूजा केल्यावर त्या ठिकाणी गंगा जल शिंपडून घ्यावे त्या ठिकाणी एक पाठ किंवा चौरंग ठेऊन त्यावर एक पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरावे. त्यावर नारायणाची मूर्ती ठेवावी. भगवान श्री हरी विष्णूची आराधना करून संकल्प सोडावा. धूप, तुपाचा दिवा, उदबत्ती , फुले अर्पण करावे. त्यानंतर कथा वाचून आरती करावी. दिवस भर उपवास करून रात्री फल आहार करू शकतात. दुसऱ्या दिवशी अधोळ करून अन्न दान करावे आणि उपवास सोडावा.
ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी कोणा सोबत भांडण करुनये त्याच सोबत कोणाची निदा करुनये. कोणाचे मन दुखावेल असे बिलकुल वागूनये. शक्य असेल तर या दिवशी दिवस भर देवाचे नामस्मरण करावे. तसेच रात्री जागरण करून भजन करावे.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




