धार्मिक

जेवण झाल्यावर गॅस किंवा चुलीवर ठेवा हि खास वस्तू, घरात नेहमी धनदौलत राहील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहतो कि खूप लोक अशी आहेत कि जी खूप मेहनत करतात खूप कष्ट करतात पण त्यांच्या आर्थिक स्थितीत काही सुधारणा होत नाही. किंवा काही वेळा काहींच्या बाबतीत पैसा येतो पण तो घरात मात्र टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो जात राहतो जसे कि आजारपण, कधी चोरी होते अश्या घटनांमध्ये कमावलेले धन निघून जाते आणि हातात काहीच राहत नाही.

ज्या व्यक्तीला हे समजत नाही कि असे का होत आहे ते नाराज होतात. हे त्यांच्यावर आलेल्या दुर्भाग्यमुळे होत असते. अश्या वेळी असे दुर्भाग्य आपल्याला बदलावे लागते. आजच्या लेखात आपण हेच दुर्भाग्य बदलणारा एक छोटासा उपाय आपण सांगणार आहोत जो आपण आपल्या किचन मध्ये आरामात करू शकता. चला तर जाणून घेऊयात उपाय कोणता व कसा करायचा ते.

किचन हि घरातील एक अशी जागा आहे जिचा संबंध घरातील सर्व लहान मोठ्या सदस्यांशी व अतिथींशी देखील असतो. कारण इथेच घरातील सर्वांसाठी स्वयंपाक बनविला जातो आणि त्याद्वारेच आपल्याला ऊर्जा मिळते. किचन मध्ये अनेक अन्नधान्य व इतर अन्नपदार्थ देखील असतात इथेच अन्नाची देवी अन्नपूर्णा निवास करते. असे म्हणले जाते कि स्त्री अन्नपूर्णेला प्रसन्न करते तिच्या घरात कधीही अन्नाची व धनाची कधीही कमी पडत नाही. तिचे घर नेहमी अन्न्धान्यानाने भरलेले राहते व तिच्या घराची भरभराट होते.

तर आता आपण काय करावे अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्यासाठी, आपण दररोज किचन मध्ये स्वयंपाक बनवितो आणि जेव्हा आपण चपात्या बनवितो तेव्हा शेवटची पोळी बनवून झाली कि थोडासा कणिकेचा गोळा आपण राखून ठेवावा व त्याची छोटीशी पोळी लाटावी, शेवटची पोळी आपण तव्यावरून काढली कि गॅस बंद करून त्यावर हि छोटी पोळी टाकावी तवा गरम असल्याने हि पोळी दोन्ही बाजूने अर्धकच्ची भाजली जाईल मग तवा गॅस वरून उतरवून ती पोळी तशीच त्या बंद केलेल्या गॅस वरती ठेवून द्यावी ती रात्र भर तशीच ठेवावी.

हयामुळे आपल्या घरातील ज्या काही नाकारात्मक शक्ती जागृत असतील त्यांना ह्या पोळीचा भोग मिळेल व तुम्ही जेव्हा ह्या नाकारात्मक शक्तींना भोग द्याल तेव्हा त्या तुमच्यावर खुश होतील व इतर नाकारात्मक कारवाया बंद करतील. अश्या प्रकारे किचन मधील सर्व नकारत्मकता निघून जाईल व सकारत्मक मध्ये घरात वाढ होईल. अश्या प्रकारे किचन मध्ये नाकारात्मकता निघून साकारत्मकता आल्याने देवी अन्नपूर्णा सैदैव तिथे वास राहील. व तुम्हाला कधीही अन्नधान्याची व इतर कशाची कमतरता भासणार नाही.

रात्रभर ती पोळी तशीच ठेवलेली ती आपण दुसऱ्या दिवशी गाय, कुत्र्याला किंवा कावळ्याला घालावी. मित्रांनो हा उपाय करून आपण देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवू शकता. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट