लाईफस्टाईल

जेव्हा आयुष्यात संकटे, दुःखे येतात तेव्हा आपले मन शांत ठेवण्यासाठी हि एक गोष्ट वाचा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो फार पुरातन काळातील हि एक गोष्ट आहे गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावातून दुसऱ्या गावात धर्माची शिष्या देण्यासाठी भ्रमण करत असत, एकदा ते असे प्रवास करत असताना एका गावात विश्रंतीसाठी एका झाडाखाली थांबतात. दुपारची वेळ असते ते आपल्या एक शिष्याला सांगतात कि मला तहान लागली आहे गावाजवळच एक नदी आहे तिथून मला पाणी घेऊन ये.

तो शिष्य त्या नदीजवळ पाणी आणायला जातो तेव्हा तो बघतो कि बायका त्या नदीत कपडे धुवत असतात. काही माणसे आपली जनावरे धुवत असतात. काही लोक तिथे अंघोळ करत असतात त्यामुळे तेथील नदीचे पाणी खूपच गढूळ झालेलं असते शिष्य विचार करतो कि हे पाणी पिण्यायोग्य नाही आणि तो परत माघारी बुद्धाकडे जातो. शिष्य सर्व हकीकत बुद्धांना सांगतो आणि त्यावेळी बुद्ध त्या शिष्याला म्हणतात काही काळजी नको आपण इथे थोडी विश्रांती घेऊयात.

बऱ्याच वेळ झाल्यानंतर परत बुद्ध त्याला पाणी आणायला सांगतात आज्ञाधारक शिष्य तोही पाणी आणायला जातो तो तिकडे जाऊन पाहतो तर काय काही वेळा पूर्वी जी लोक तिथे होती ती सर्व निघून गेली होती, आता तिथे कोणीच नव्हते आणि महत्वाचे म्हणजे नदीचे सर्व पाणी एकदम स्वत्च्छ झालेलं असते. माती सर्व तळाला जाऊन बसली होती आणि सर्व घाण हि पाण्यासोबत वाहून गेलेली होती.

शिष्याला खूप आनंद होतो तो एका मडक्यात आपल्या गुरुंसाठी पाणी भरून घेतो व गुरुकडे येतो. बुद्ध ते पाणी पाहून खूप प्रसन्न होतात, आपल्या सर्व शिष्यानं ते एक शिक्षा देतात. जेव्हा केव्हा आपल्या जीवनात संकटे, दुःख, समस्या येतात तेव्हा आपले आयुष्य देखील गढूळ पाण्यासारखे वाटते परंतु आपण निराश होऊन हार नाही मानली पाहिजे त्यावेळी आपण फक्त धैर्य ठेवायचे आहे. आणि शांत मानाने परस्थीचा आढावा घ्यावा शांत मनच योग्य निर्णय घेऊ शकते.

कधी कधी तर अशी परिस्थिती येते कि जेव्हा आपल्याला काय करायचं तेच सुचत नाही किंभवना आपल्याला काय करायचे आहे तेच सुचत नाही. तेव्हा फक्त शांत राहून स्वीकार करणे हेच आपल्या हातात असते जसे त्या नदीतील माती हळू हळू तळाला गेली आणि घाण तळाला गेली आणि घाण वाहून गेली तशीच आपल्या जीवनातील दुःखांची तीव्रता देखील कमी होईला लागते. आणि नवे मार्ग दिसू लागतात. तर मित्रांनो हा होता गौतम बुद्धांचा त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग. मला खात्री आहे कि हि शिकवण तुमच्या आयुष्यातील वाईटातील वाईट प्रसंगाला तोंड देण्यास उपयुक्त ठरेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट