या झाडाचे मूळ गुरुपुष्यामृत दिवशी गुपचुप घरी घेऊन या.
धार्मिक

या झाडाचे मूळ, गुरुपुष्यामृत दिवशी गुपचुप घरी घेऊन या. सर्व समस्या दूर होतील.

येत्या काही दिवसात गुरुपुष्या नक्षत्र लागणार आहे. यालाच आपण आपण गुरुपुष्यामृत योग्य असे सुद्धा म्हणतो. या दिवशी अनेक जण आपल्या घरी केळीच्या झडाचे मुळ आणतात. आज आपण या झाडाचे मूळ कश्या पदतीने घरी घेऊन याचे आणि त्या सोबत असा एक उपाय पाहणर आहोत त्यामुळे आपल्या घरात आलेल्या सर्व समस्यांचे निराकरण होईल.

काही व्यक्तीना या बदल कोणतीच कल्पना नसते कि केळीच्या झाडाचे मूळ कश्या पद्धतीने घरी घेऊन यायला हवे. करणं जर का पण चुकीच्या पद्धतीने हे मूळ घरी घेऊन आलो तर आपल्या घरात व्यक्ती आजारी पडू शकतात, घरची संपत्ती लगेच घराबाहेर निघून जाते. आर्थिक समस्या जाणवण्यास सुरवात होते. यामुळे कोणताही उपाय करताना त्याची योग्य काळजी घेऊन जर का काम केले तर त्याचे खुप लाभ आपल्याला मिळत रहातात.

केळीचे झाड हे भगवान श्री हरी श्री विष्णू याना अति प्रिय आहे. अशी मान्यता आहे स्वतः भगवान श्री हरी श्री विष्णू ज्या ठिकाणी वास करतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी सुद्धा वास करत असते. आपल्या वर आलेली अर्थिक समस्या दूर करण्यासाठी, ज्यांच्या घरात लग्न जुळत नाही, लग्नाच्या समस आहेत., पारिवारिक समस्या आहेत. या लोकांनी केळीच्या झाडाचे मूळ विधिवत नक्की घरी घेऊन या. या उपाय मुळे ज्या काही समस्या जाणवत आहेत. त्या नक्की दूर होतील.

येत्या २५ नोव्हेबंर ला गुरुपुष्यामृत योग आहे. हा योग सकाळी ६.५४ मिनिटांनी सुरु होऊन सायंकाळी ६.४८ मिनिटा पर्यंत आहे. जवळ पास संपूर्ण दिवस. या कालावधीत हा उपाय करायचा आहे. आदल्या दिवशी आपल्या घरा जवळील केळीच्या झाडाजवळ जायचे आहे. जाताना एक तांब्या पाणी, हळदी कुंकू, उदबत्ती घेऊ जयाचे आहे.विधीवत पूजा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योग आहे त्या दिवशी म्हणजे गुरुवारी स्वच्छ कपडे परिधान करून ज्या केळीच्या झाडाची पूजा पण केली आहे. त्या झाडाची मुळे आणण्यासाठी गेल्यावर त्या ठिकाणी कोणत्याही धातूचा उपयोग न करता माती बाजूला करून एक केळीचे मूळ आपल्याला घरी घेऊन याचे आहे.

घरी आल्यावर स्वच्छ सध्या पाण्याने मूळ धून घेऊन घ्याचे आहे. नंतर गंगा जलाने धून घ्याचे हाये गंगा जल हे आपल्याला कोणत्याही पूजा साहित्य मिळण्याच्या दुकानातून मिळून जाईल. हे मूळ स्वच्छ धून घेतल्यावर त्यानतंर एका पाटावर एक पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेऊन त्यावर हे केळीच्या झाडाचे मूळ त्यावर ठेवा. त्याची विधिवत पूजा करा धूप दीप दाखवा, हळदी कुंकू लावा.

हे सर्व झाल्यावर हात जोडून प्रार्थना करायची त्या नंतर एक मंत्र आहे. त्या मंत्राचा जप कमीत कमी पाच माळ करायचा आहे. हा मंत्र असा हे ” ओम ग्राम ग्रीम ग्रौं सह गुरवे नमः ” हा मंत्र पाच माळी झाल्यावर. छोट्याश्या वस्त्रात गुडाळून बाजारत एक ताबीज मिळते त्यात ते मूळ ठेऊन द्याचे आहे. हे ताबीज आपल्या उजव्या हातात किंवा गळ्यात बांध्याचे आहे. किंवा आपल्या घरातील पैसे ठेवण्याची जागा असेल किंवा दुकानातील पैसे ठेवण्याची पेटी असेल त्यात ठेऊन द्याच आहे.

हातात किंवा घरात ठेवेपर्यंत मंत्र जप चालू ठेवा. हा ताबीज घाल्यानंतर काही नियमांचे पालन अवश्य करायला हवे, नाहीतर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. जसे कि मांसाहारी करण्या पूर्वी हि ताबीज कडून ठेवा. अशा योग्य पद्धतीने हे झाडाचे मूळ घेऊन आलो तर याचा लाभ नक्की आपल्या झाल्यशिवाय रहाणार नाही.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट