धार्मिक

जी स्त्री हि ५ कामे करते तिच्या सौभाग्याचे नशीब उजळते.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि प्रेत्येक घरातील स्त्रीने आपल्या पतीच्या नशीब उजळण्यासाठी कोणत्या ५ गोष्टी नक्की करायला हवीत. मित्रांनो पती पत्नी हे जे नाते आहे हे संसार रुपी रथाचे २ चाके आहेत आणि आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी भाग्य जर त्याला साथ देत नसेल.

त्याचे नशीब त्यासाठी साथ देत नसेल तर हि ५ कामे नक्की करा आपल्या पतीला कामांमध्ये यश नक्की लाभेल तसेच तुमच्या जीवनात, तुमच्या संसारात सुख समृद्धी येईल लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल. घरात कोणतेही क्लेश शिल्लक च राहणार नाहीत. तुमच्या कुटुंबावरती कोणतेही संकट येणार नाही.

ह्यातील पहिले काम आहे दररोज आपण तुळशी मातेची पूजा करायला हवी. तुळस हि विष्णुप्रिया आहे कारण भगवान श्री विष्णू कि जे ह्या जगाचे पालनहार आहेत. त्यांना सर्वात प्रिय असणारी हि तुलसी माता आहे. आणि म्हणून आपण दररोज तुळशी मातेची दररोज पूजा करत असाल तर भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील कृपा आपल्यावरती बरसते आणि त्यामुळे आपल्या पतीचे नशीब त्याला साथ देऊ लागते.

तुळशी मातेची सेवा करणे म्हणजे नेमकं काय तर सकाळी लवकर उठून आपण सर्वजण देवपूजा तर करत असालच, देवपूजा झाल्यानंतर आपण माता तुळशीची देखील पूजा करायची आहे त्यांना एक तांब्या जल आपण अर्पण करायचे आहे. आणि मनोभावे आपण पूजा अर्चना करायची आहे. त्यानंतर आपण ७ प्रदक्षिणा आपण घालायच्या आहेत. त्याचबरोबर आपण सूर्यास्तवेळी तुळशीजवळ एक दिवा लावावा.

जर आपण असे दररोज केले तर आपल्या जीवनात सुख समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही. माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होतील तसेच एखादे संकट आपल्या घरावरती येणार असेल तर त्याची पूर्वसूचना माता तुलसी आपल्याला देत असते. जर तुमचे तुळशीचे रोप जर सुकू लागले तर आपल्यावरती संकट येणार आहे.

दुसरा उपाय जो आपण करायचा आहे तो म्हणजे प्रेत्येक शनिवारी खोबऱ्याची वाटी घ्याची आहे आणि त्यात आपण साखर घालायची आहे. तर अशी साखर घालून खोबऱ्याची हि वाटी आपण सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे त्यामुळे आपल्यावरती जे काही संकट असेल ते तर दूर होतेच त्याचबरोबर तुमचे वैवाहिक जे जीवन आहे ते देखील सफल बनते. पतिपत्नींमध्ये वादविवाद होत असतील तर हा उपाय नक्की करा.

तिसरा उपाय म्हणजे आपण मोहरीच्या तेलात आपण गोड भजी तळायचे आहेत आपण जे भजी तिखट बनवतो त्याऐवजी आपण त्यात साखर घालून ते गोड बनवायचे आहेत. अशी हि भजी आपण दान म्हणून द्याची आहेत त्यांना भिक्षा म्हणून गरजू व्यक्तींना द्याची आहेत शनिवारी हा उपाय करायचा आहे. त्यामुळे शनी ग्रहाशी संबंधित काय समस्या असतील तर त्या सर्व समस्या दूर होतात.

चौथा जो उपाय आहे तो म्हणजे माता पार्वती म्हणजेच गौरी पूजा नक्की करा आणि त्यांच्या ह्या पूजेत त्यांना सिंधूर लावण्यास विसरू नका असे केल्याने माता गौरींची अस्सीम कृपा आपल्यावरती बरसते. ज्या स्त्रिया माता गौरींची पूजा करतात त्यांच्या वैवाहिक जीवन अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यतीथ होते. ज्या घरात पतिपत्नींमध्ये वाद होत असतील पती पत्नीचे ऐकत नसेल तर हा उपाय आपण नक्की करा.

शेवटचा म्हणजेच पाचवा उपाय आहे तो म्हणजे आपल्या दारात एखादा किन्नर आला तर ज्यावेळी हि व्यक्ती दिसले तेव्हा आपण तिला काही ना काही दान अवश्य करा. अश्या प्रकारे दान केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्यांचे आशीर्वाद अत्यंत लाभदायी असतात. त्यांची शक्ती इतकी मोठी असते कि त्यांच्या आशीर्वादाच्या बळावर तुमच्या जीवनातील मोठ्यात मोठी संकटे दूर होतात. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट