धार्मिक

फक्त एक शनिवार करा एक उपाय सर्व संकटे, शनीची साडेसाती दूर होईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे, मित्रांनो ज्या व्यक्तींच्या पाठीमागे शनीची साडेसाती लागलेली आहे त्या व्यक्तींना खूप साऱ्या संकटाना सामोरे जावे लागते. खूप वेळा आपला व्यवसाय, धंदा काय केले नीट चालत नाही. खूप काबाडकष्ट करून देखील म्हणावे इतके पैसे मिळत नाही, कामाचा योग्य तो मोबदला मिळत नाही. कधी कधी पैसा तर मिळतो पंरतु तो टिकत नाही तो कोणत्या ना कोणत्या कारणाने वायफळ खर्च होतो. विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण ज्यांच्या मागे साडेसाती आहे त्यांना यश काही मिळत नाही.

रात्रदिवस अभ्यास करून देखील विद्यार्थ्यांच्या पदरात यश काही मिळत नाही. ह्या सर्व घटनांच्या मागे शनीची साडेसाती असते. शनीची साडेसाती मागे लागली कि ती सर्वात सुरवातीला आपल्या उद्योग व्यवसायावर परिणाम करते. ज्या गोष्टीमधून पैसा येत होता त्या सर्व गोष्टींमधून शनीच्या साडेसातीमुळे परिणाम होतो. परिणामी आपल्या घरावर आर्थिक संकट ओढावले जाते. अश्या व्यक्तींची शारीरिक स्थिती देखील खूप बिकट असते, अश्या व्यक्ती सतत आजारी पडत असतात. आजारपण देखील असे कि जे खूप प्रयत्न करून देखील ते कमी होत नाही.

पोटाचे विकार किंवा एलर्जी सारखे आजार शनी दोष असणाऱ्या व्यक्तींना असतात. म्हणून आजच्या लेखात आपण शनीची साडेसाती कमी करण्यासाठी उपाय पाहणार आहोत. हा उपाय आपल्याला एका शनिवारी करायचा आहे, पण ह्या उपायाने आपली सर्व शनीची लागलेली साडेसाती निघून जाईल. त्यासाठी आपण स्वच्छ तांब्याभर स्वच्छ पाणी घ्याचे आहे तांब्या हा स्टील चा वापरावा, एक तेलाचा दिवा, ३ मीटर काळा धागा, व थोडी खडीसाखर आपल्याला आजच्या उपायासाठी लागणार आहे.

उपायासाठी सर्वप्रथम कोणत्याही एका शनिवारी आपण सकाळी उठून स्वच्छ स्नान करून आपण एका पिंपळाच्या झाडाखाली जायचे आहे. तिथे गेल्यावर आपण सर्वप्रथम तिथे बसायचे आहे व नंतर आपण हनुमान व शनिदेवाचे नामस्मरण करायचे आहे. नंतर आपण तांब्याभर पाणी घ्याचे आहे त्यात आपण खडीसाखर टाकायची आहे. व असे पाणी आपण त्या पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याशी घालायचे आहे.

त्यानंतर आपण काळा धागा पिंपळाच्या खोडाला गुंडाळायचा आहे, गुंडाळताना आपण घडाळ्याच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईस दिशेने आपण संपूर्ण सात फेऱ्या मारायच्या आहेत. हे मारत असताना एका मंत्राचा जप आपलयाला करायचा आहे. मंत्र आहे ॐ शं शनैश्चराय नमः। तुम्हाला शक्य होईल तितके वेळा आपण त्या मंत्राचा जप करा. त्यानंतर सात फेऱ्या मारून जर धागा राहिला तर आपण तो तोडायचा किंवा गाठ मारायची नाही तर आपण तो धागा बाकीच्या धाग्यात तसाच गुंतवून ठेवायचा आहे. घरी उरलेला धागा चुकूनही घेऊन जाऊ नये.

त्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाखाली शांत चित्ताने बसून आपण त्या झाडाखाली तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यांनंतर आपण शनी चालीसा किंवा हनुमान चालीसा ह्यापैकी कोणत्याही एकाचा पाठ आपण म्हणायचा आहे त्यानंतर आपण आपली प्रार्थना आपल्याला जी काही हानी होत आहे किंवा काही शारीरिक त्रास होत आहे त्याचे लवकरात लवकर निदान करा.

मला ह्या संकटातून बाहेर काढा. आणि तुम्हाला दिसेल कि दुसऱ्या दिवसापासूनच आपल्याला फरक जाणवायला दिसून येईल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट