घरगुती उपाय

केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी, फक्त हे एक पान जवळ ठेवा.

कुठलीही परीक्षेत यश मिळवण्यासाठी केलेला अभ्यास लक्षात राहणे खूप महत्वाचे असते. अनेक जणांच्या बाबतीत असे घडते कि ते अभ्यास तर ते करतात परंतु तो केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही. काही दिवस राहिलेलं लक्षात राहते मात्र विशिष्ट दिवसानंतर, केलेलं सर्व काही विसरून जाते. अश्या वेळी केलेला सर्व अभ्यास लक्षात राहण्यासाठी गणपतीचे अथर्वशीर्षमध्ये काही उपाय सांगितले आहेत.

हे उपाय अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत लागू पडतात. आपले मूल अगदी नर्सरी मध्ये असूद्यात नाहीतर अगदी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वयाचे असूद्यात. प्रत्येकासाठी हे उपाय अगदी समान आहे, हा उपाय कसा करायचा आहे तो आपण जाणून घेऊयात. जे मुले अगदीच लहान आहे त्यांच्या माता पित्याने त्यांच्या पालकांनी हे उपाय करावे.

ह्या साठी आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ती म्हणजे आपण आपल्या मुलांना अभ्यास करायला बसवताना आपण त्यांना उत्तर दिशेला तोंड करून बसवावे त्यांना तशी सवय लावावी. दुसरी गोष्ट आपण अथर्वशीर्षाचा पाठ करावा, आणि ते करण्यासाठी आठवड्यातील मंगळवार किंवा बुधवार ह्या दिवशी करावा आणि तसेच आपण गणपती चतुर्थीच्या दिवशी देखील आपण पाठ करायचा आहे.

हा पाठ करताना आपण गणपती बापांना २१ दुर्वा व्हायच्या आहेत, आपट्याची पाने अडीच, सफेद रुईचे दोन फुले, आणि शमी ह्या झाडाची ११ पाने ठेवावीत, जर शमीचे झाड आपल्या जवळपास नसेल तर तुम्ही अपराजिताची पाने देखील आपण ठेवू शकता. जर ह्यामधील काही नसेल तरी चालेल मात्र आपण दुर्वा व आपट्याची अडीच पाने मात्र नक्की अर्पण करावीत. हे सर्व अर्पण केल्यानंतर आपण अथर्व शीर्ष पठण करायचे आहे व त्यानंतर आपण हि सर्व सामग्री आपण पिवळ्या किंवा सफेद रंगाच्या वस्त्रात गुंडाळून त्याची एक पोटली म्हणजेच एक पुरचंडी करायची आहे व ती आपण विद्यार्थाजवळ आपण ठेवायची आहे.

जेव्हा तुमचे मूल अभ्यास करत असेल तेव्हा तेव्हा हि पोटली पुरचुंडी आपण त्याच्या अभ्यासाच्या जागी त्याच्या खोलीत त्याच्या आसपास कशी राहील ह्याची काळजी आपण घ्यावी. परीक्षेला जाताना किंवा त्याचे काही क्लासेस ला जाताना हि पोटली त्याच्या सोबत आपण ठेवायचि आहे. तिया आपण त्याच्यासोबत बाळगण्यास सांगा. तो जो काही संपूर्ण अभ्यास करील तो सर्व काही त्याच्या लक्षात राहील.

जेव्हा जेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा कराल तेव्हा त्याला जवळ घेऊन आपण अथर्वशीर्षाचा पाठ आपण अवश्य करा. मित्रांनो जर आजचा लेख आवडला असेल तर तुम्ही तो जास्तीत जास्त आपल्या मित्रांना तसेच तुमच्या कुटुंबातील लोकांना शेयर करा. तसेच आमच्या सर्व नवनवीन लेखांसाठी आमच्या पेज ला लाइक नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही, धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट