वास्तू शास्त्र

ज्या घरात असतात अश्या वस्तू त्या घरात नेहमी राहते सुख व ऐश्वर्य

नमस्कार मित्रांनो तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपल्याला पैसा मिळावा म्हणून आपण नेहमी प्रयत्नशील असतो पण कधी कधी घरात अशी काही परिस्थिती निर्माण होते कि कितीही कष्ट केले तरी घरात पैसा काही टिकत नाही.

आपण कितीही बचत करून पैसा खर्च केला तरी आपल्या हातात काहीच राहत नाही. वास्तुशास्त्राप्रमाणे घरात अश्या काही वस्तू आहेत ज्या दारिद्रतेला आपल्याकडे आकर्षित करतात व पैसा पाण्यासारखा खर्च होतो. आपल्या आजच्या लेखात अश्याच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पैस्याला घरात टिकून देत नाहीत.

कबुतराचे घरटे तसे तर कबुतरांना आपल्या हिंदू धर्मशास्त्रात दाणे टाकणे खूप शुभ मानले जाते परंतु जर कबुतराने जर आपल्या घरात घरटे केले असेल तर ते अशुभ असते. शक्यतो कबुतर अश्याच ठिकाणी आपले घरटे निर्माण करतात जेथे त्यांना सुरक्षित वाटते परंतु आपल्या घरात किंवा छतावर कबुतराचे जर घरटे असेल तर आपल्या घरावर आर्थिक अडचण येते. घरावर नेहमी गुटुरगु असा आवाज जरी येत असेल तरी घरात वादविवाद निर्माण होतात म्हणून असे कबुतराचे घरटे अगदी सावध व हळुवारपणे ते दुसऱ्या जागी घेऊन जावे.

मधमाशीचे पोळे, मधमाशी हि अतिशय कष्टाळू कीटक आहे, ते आपले संपूर्ण जीवन मध गोळा करण्यातच घालवतात परंतु ह्यांचा दंश खूप भयंकर आहे. त्यामुळे आपल्याला फक्त शारीरिकच नाही तर आर्थिक नुकसान होऊ शकते.

म्हणून मधमाशीचे पोळे घरजवळ असू नये. त्यानंतर आहे कोळ्याचे जाळे, कोळ्याचे जाळे घरात दिसणे म्हणजे घरात काहीतरी अडचणी येण्याचे संकेत असतात. किचन मध्ये जर घरात जाळे असेल तर फूड पोइसोनिंग चा देखील धोखा असतो. त्या ठिकाणी नकारात्मकता शक्ती असते अश्या ठिकाणी नेहमी दरिद्रता राहते.

फुटलेला आरसा फुटलेल्या आरश्यात पाहणे किंवा फोडणे खूप अशुभ मानले जाते. फुटलेला आरसा घरातून लगेचच टाकून द्यावा कारण तो घरात नकारात्मक शक्ती आकर्षित करतो म्हणून घरात अडचणी निर्माण होतात. वटवाघुळाचे घरात येणे अशुभ मानले जाते तो सकाळी झोपतो व रात्री जागा राहतो व तो मृत शरीरांना खातो व त्यांचे रक्त पितो. वैज्ञानिक व वास्तुशास्त्राप्रमाने देखील वटवाघुळाचे घरात येणे अशुभ मानले जाते. घरातील भिंतींना तडे जाणे हे देखील दरिद्रेचे लक्षण आहे, म्हणून घरातील भिंतींना तडे गेल्यास त्यांची डागडुजी करावी.

घरातील नळातून पाणी वाहत राहणे हे देखील अशुभ लक्षण असते पैसा देखील पाण्यासारखा वाहून निघून जातो. म्हणून गळणारा किंवा खराब झालेला नळ लगेच बदलावा. घरातील गच्चीवर किंवा घरात कचरा किंवा अनेक गोष्टी जमा करून सामान वाढऊ नये. घरातील छत हे आपल्या डोक्याएवढेच महत्वाचे असते. म्हणून घरातील छत व घर स्वच्छ असेल तर घरात नेहमी सकारत्मक ऊर्जा राहते. न वापरातल्या भंगार वस्तू टेरस वरती ठेवू नये त्याची वेळच्या वेळी विल्ल्हेवाट लावावी.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट