वास्तू शास्त्र

ज्या घरात हि ५ झाडे असतात लक्ष्मी तिथे पाणी भरते.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण प्रेत्येकजण आपल्या घरात किंवा आपल्या अंगणात काही झाडे लावत असतो, ह्या झाडांमुळे घराची शोभा वाढते. पण तुम्हाला हे माहित आहे का काही झाडे शोभेबरोबरच भाग्य बदलण्याची देखील क्षमता राखतात.

ह्या झाडांमुळे आपले नशीब बदलू शकते, मित्रांनो काही झाडांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते असे पुरांणाध्ये सांगितले आहे आणि काही झाडे तर ह्या सकारात्मक ऊर्जेने इतकी भरलेली असतात कि धनदौलत, पैसा, मानसम्मान ह्या गोष्टी खेचून आणण्याचे काम हि झाडे करतात.

मित्रांनो वास्तुशास्त्रातसुद्धा काही झाडांचा उल्लेख आढळतो ज्या झाडांमुळे प्रगती आणतात. घराला एका नवीन उंचीवर नेहून ठेवतात. मित्रांनो काही झाडांमद्ये देवीदेवतांचा वास असतो, तर आपण आजच्या लेखात अशीच काही झाडे पाहणार आहोत जी आपल्या घरात लावल्याने धनदौलत तर खेचून आणतातच पण ती आपल्या कुटुंबाला समाजात मनाचे स्थान देखील मिळवून देतात. चला तर जाणून घेऊयात ती झाडे कोणती आहेत.

पहिले झाड तुळस आपल्या सर्वाना माहिती आहे कि हिंदुधर्मशास्त्रात तुळशी इतके पवित्र झाड कोणतेच नाही म्हणून प्रेत्येक घरात तुळस हि असायलाच हवी. आपल्या घरी हे झाड असेल तर आपण ह्या तुळशीची नित्यनियमाने पूजा करत चला, केवळ झाड लावल्याने सर्व काही होत नाही तुळस हि विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते म्हणून सायंकाळी आपण दिवा लावावा तुळशीची मनोभावे पूजा करावी. ज्यामुळे आपल्या वरती माता लक्ष्मीची कृपा बरसते.

मित्रांनो दुसरे जे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड, मित्रांनो हे केळीचे झाड घरसमोर असते त्या घरातील लोकांना मनशांती मिळते. एक पवित्र असे वातावरण आपल्या घरात राहते. मित्रांनो केळीचे जे झाड आहे ते ईशान्य दिशेला लावावे ह्या झाडामुळे धनाची देवता माता लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते.

तिसरे झाड आहे ते म्हणजे शमीचे झाड, हे झाड सर्व प्रकारचे दोष नष्ट करणारे झाड मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत राहू आणि शनी दोष आहेत अश्या लोकांनी शमीचे झाड आपल्या घरासमोर लावावे. मित्रांनो तुमच्या घरी जर शमीचे झाड असेल तर एक उपाय नक्की करा सायंकाळी आपण त्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तुम्हाला दिसले कि तुमच्या सर्व आर्थिक समस्या संपतील तुम्ही श्रीमंत बनाल.

चौथे झाड आहे ते म्हणजे पांढरी रुई, मित्रांनो ज्यांना जलद धनलाभ पाहिजे आहे त्यांनी आपल्या घरासमोर हे झाड नक्की लावावे हे झाड आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला लावू शकता. पांढऱ्या रुई ने केवळ धनलाभाचं नव्हे तर आपल्या शत्रूवर विजय देखील आणून देते. तसेच ज्यांना वैवाहिक जीवनात काही समस्या आहेत त्यांनी हे झाड अवश्य लावावे.

मित्रांनो पाचवे झाड म्हणजे मनी प्लांट. पण मित्रांनो हे जे मनी प्लांट आहे ते आपण विकत अनु नये, ते आपण कोणाच्या तरी घरून ते आपण घेऊन यावे असे मनी प्लांट आपण घरी लावले तर त्या घरात नेहमी पैस्याची बरकत होते, त्या घरातील लोकांमध्ये सौख्य राहते. आपण एक काळजी घ्या कि हे मनी प्लांट जे आहे ते नेहमी हिरवेगार राहायला हवे. हे जे मनी प्लांट आहे ते आपल्या समाजमध्ये मानसम्मान देखील मिळवून देते.

अशी हि पाच झाडे आहेत आपण आपल्या घरासमोर ह्यातील कोणतेही झाड लावावे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट