वास्तू शास्त्र

कवडीचे धनप्राप्ती साठीचे उपाय, वास्तुशास्त्रानुसार करोडो रुपयाच्या आहेत ह्या वस्तू

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो कवडी ह्या कवडीचे लक्ष्मी पूजनात खूप महत्व आहे. कवड्या विविध रंगात येतात जश्या कि पांढऱ्या, पिवळ्या, भुरकट, ठिपक्यांच्या, ह्यातील पांढरी कवडी हि देवी लक्ष्मीची प्रतीक आहे. श्री हरी विष्णूंना पिवळी कवडी आवडते. कवड्या ह्या समुद्रात मिळतात.

आजच्या ह्या आपल्या लेखात कवड्यांच्या उपायाने धन कसे मिळवायचे हे पाहणार आहोत. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीच्या पूजनाबरोबरच ११ सिद्ध कवड्यांचे पूजन करावे आणि ह्या कवड्याना पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून त्या तिजोरीत किंवा आपल्या पैसे ठेवण्याच्या जागेत ठेवून द्यावे.

ह्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते व आपली तिजोरी नेहमी पैश्याने भरून राहते. आपल्या घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दारावर ११ सिद्ध कवड्या लाल रंगाच्या कपड्यात बांधून ती कपडे लटकवून द्यावी असे केल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी येते त्याचबरोबर आपल्या घरात कोणत्याही प्रकराची नाकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही.

जर वाईट नजरेपासून आपला बचाव करायचा असेल तर एक पिवळ्या रंगाची कवडी काळ्या दोऱ्यात टाकून धारण करावी असे केल्याने आपले सर्व प्रकारच्या वाईट नजरदोषपासून संरक्षण होते. शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. ह्या दिवशी काही खास उपाय करून आपण देवी आईला प्रसन्न करू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार पिवळ्या रंगाच्या कवडीचा तोटका फार प्रभावी ठरतो.

कवडीने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. शुक्रवारी पिवळ्या रंगाच्या कपड्यात ११ सिद्ध कवड्या थोडेसे केसर आणि चांदीचे नाणे असे सर्व ठेवून त्याची गाठोडी तयार करावी. आता हि गाठोडी देवीच्या चरणांना लावून आपण आपल्या तिजोरीत ठेवून द्या ह्यामुळे आपल्या धनात वाढ होते. शुक्रवारी गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करणे देखील शुभ मानले जाते. ह्यामध्ये पांढरे वस्त्र, पीठ, साखर, तांदूळ ह्यासारख्या वस्तूंचे दान आपण करू शकता.

ज्या व्यक्तींना आपली इच्छा पूर्ण करायची असेल त्यांनी शुक्रवारच्या दिवशी ३ किंवा ५ कन्यांना घरी बोलावून त्यांना खीर खायला द्यावी ह्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. जर आपल्याला सुख समृद्धी मिळवायची असेल तर देवी लक्ष्मीसमोर ११ पांढऱ्या कवड्या ठेवून तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. त्याचबरोबर त्या दिव्यात आपण २ केशराच्या काड्या टाकाव्यात. ह्यामुळे घरातील धनधान्यात वाढ होते.

देवी लक्ष्मी हि श्री हरी विष्णूंची पत्नी आहे ह्यामुळे श्री हरी विष्णूंचे शुक्रवारी पूजन केल्याने देखील आपल्यावर देवी प्रसन्न होते. जर आपले एखादे काम अडले असेल बाधा येत असतील तर चारमुखी दिवा आपण शुक्रवारी देवासमोर लावावा. त्यात लाल रंगाच्या वाती लावाव्यात व हा दिवा श्री हरी विष्णू व लक्ष्मी समोर लावावा ह्यामुळे आपली सर्व अडलेली कामे मार्गी लागतात.

पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी शुक्रवारी सौभाग्याचे सामान दान करावे. ह्यामुळे देवी प्रसन्न होते. जर नोकरी लागण्यात आपल्याला बाधा येत असतील तर शुक्रवारी २१ सिद्ध कवड्या नवीन पिवळ्या वस्त्रात ठेवून देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करून देवीला लाल गुलाबाचे फुल अर्पण करावे. आता पूजनानंतर आपण त्या फुलाला जवळ ठेवावे व इंटरव्हिवला जाताना आपल्या सोबत घेऊन जावे ह्यामुळे आपले काम लवकर होईल व नोकरी देखील आपल्याला लागेल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट