घरगुती उपाय

कामात यश प्राप्तीसाठी एक नारळ इथे ठेवा, काम यशस्वीरीत्या पार पडेल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो कोणत्याही कामात यश प्राप्त करण्यासाठी ते काम सफल बनवण्यासाठी एक अचूक उपाय आपण जाणून घेणार आहोत. ज्या दिवशी आपण आपले महत्वाचे काम करण्यासाठी बाहेर जाल. तर आपण बाहेर पडण्यापूर्वी आपण आपल्या आईवडिलांचे पाया पडावे. जर आई वडील हयात नसतील तर त्यांच्या फोटोचे स्मरण करून आपण त्यांच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद अवश्य घ्या जर तेही शक्य नसेल तर आपण त्यांची आठवण काढून नमस्कार करा. नतमस्तक व्हा.

आपल्या ह्या कार्यात यश मिळण्याची पार्थना करा. मित्रांनो आपले घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या द्वाराच्या उंबरठयावर थोडेसे मीठ आपण उजव्या हाताने अवश्य टाका. त्यानंतर आपण घरातून बाहेर पडा. एकदा घरातून बाहेर पडल्यानंतर आपण घरात पुन्हा यायचं नाही. मित्रांनो आपले कार्य यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी हा एक यशस्वी तोटका आहे. सोबतच आपण आपल्याजवळ एक साबूत नारळ ज्याची आपण शेंडी काढलेली नाही असा एक नारळ आपण आपल्या सोबत घेऊन जा आणि असा नारळ आपण सोबत घेऊन जाण्यापूर्वी आपण तो आदल्यादिवशी विकत अनु शकता.

त्या नारळावरती आपल्या देवघरातील कुंकू आपण लावायचे आहे. जे लोक बाहेर गावी राहतात ते कोणतेही कुंकू त्यावर लावू शकतात. ह्यानंतर आपण हा नारळ आपल्या सोबत घेऊनच बाहेर पडायचे आहे. संपूर्ण काम होईपर्यंत हा नारळ आपण आपल्या सोबतच ठेवायचा आहे. कामात आपल्याला सफलता प्राप्त झाल्यानंतर हा कुंकू लावलेला नारळ आपण गणेश बाप्पांच्या मंदिरात नेऊन आपण दक्षिणेसहित चढवायचा आहे. अगदी ११ रुपयेपासून अगदी तुमच्या इच्छेने कितीही दक्षिना आपण ठेवू शकता.

मित्रांनो आपण आज तीन गोष्टी पहिल्या पहिली म्हणजे आपल्या आईवडिलांचे स्मरण, त्यानंतर मूठभर मीठ आपण प्रवेश द्वारावर टाका जर आपले काम एकापेक्षा जास्त दिवसाचे आहे तर आपण दररोज काम होईपर्यँत आपण दररोज घराबाहेर पडताना उजव्या हाताने असे मीठ टाकावे. त्यानंतर एक नारळ हा सातत्याने आपल्या सोबत ठेवा आपल्याला कामात यश अवश्य प्राप्त होईल आणि यश प्राप्त झाल्यानंतर आपण हा नारळ आपण श्री गणेशाला अर्पण करा. जे यश आपल्याला प्राप्त करून दिले आहे त्याबद्दल आपण आभार माना.

मित्रांनो हि एक सवय आपण लावून घ्या आपले जीवन सुखमय बनवण्यासाठी. आपले जीवन सुखमय अवश्य बनेल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट