आपल्या कडे मंत्र आणि तंत्र शास्त्रात तवा आणि कढई याचे खुप महत्व आहे. आणि या दोन्ही गोष्टी आपण स्वयंपाक घरात त्याचा नियमित उपयोग करत असतो. आपले स्वयंपाक घर हे नियमीत पणे रोज वापरात येणारी जागा आहे. या ठिकाणी दिवसातून कित्येक वेळेस आपण येजा करत असतो. तसेच या स्वयंपाक घरातून आपल्याला रोज नवनवीन ऊर्जा येत असते.
ज्या दिवशी आपले स्वयंपाक घर बंद, त्या दिवशी आपल्या काही तरी चुकल्या सारखे होत असते. आपल्याला रोजच्या कामासाठी जी ऊर्जा लागणार असते. ती आपल्याला याच स्वयंपाक घरातून मिळत असते. जो पर्यंत पोट भरून जेवण होत नाही, तोपर्यंत आपल्याला नवनवीन गोष्टी सुचत नाही. तसेच कोणतेच काम करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळेच आपल्या रोजच्या व्यवहारात स्वयंपाक घर खुप महत्वाच आहे
स्वयंपाक घरात अन्नपूर्णा देवीचे वास्तव्य असते. आणि ज्या ठिकाणी देवीचे वास्तव्य असते ती जागा नेहमी स्वच्छ असायला हवी. तुम्हला माहीतच असेल ज्या ठिकाणी देवी देवता असते त्या ठिकाणी स्वच्छता असायला हवी ज्या ठिकणी अस्वच्छता असते त्या ठिकाणी देवी देवतांचा वास काहीच नसतो. जर का आपल्याला देवी अन्नपुर्णाचा आशीर्वाद आपल्याला मिळायला हवा असे वाटत असेल तर नेहमी स्वयंपाक घर स्वच्छ आणि नीट नेटके ठेवावे.
बऱ्याच लोकांना एक खुप वाईट सवय असते ती म्हणजे आपण स्वयंपाक केल्यानंतर ती जागा स्वच्छ ठेवतो पण सर्व भांडी राञभर तशीच बेसिन मध्ये ठेवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ती सर्वात मोठी चूक आहे. कधीही रात्रीचे खरकटे भांडे तसेच बेसिन मध्ये ठेऊ नका यामुळे वस्तू दोष निर्माण होऊ शकतो. तसेच देवी अन्नपूर्ण सुद्धा नाराज होऊन घरातून जाऊ शकते. त्यामुळे शक्य नसेल तर कमीत कमी ती भांडी स्वयंपाक घरात न ठेवता बाहेर ठेवावी.
आज आपण एक छोटासा उपाय पाहणार आहोत. ज्या मुळे आपल्याला पैसा कमावताना येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. या साठी काही नियमांचे पालन अवश्य करायला हवे जेणेकरून या उपायाचा लाभ आपल्याला मिळत राहील. काही नियम असे आहेत. रोज रात्री झोपण्याधी सर्व खरखटी भांडी स्वच्छ धून ठेवावी. तसेच तवा आणि कढई कधीच समोर ठेऊ नये.
आपण जो उपाय पाहणार आहोत तो रोज आपल्याला करायचा फक्त काही दिवस त्यात खंड पडला तरी चालेले पण शक्यतो हा उपाय रोज करायचा आहे. हा उपाय आपल्या घरातील गृहिणी जी रोज स्वयंपाक घरात काम करते त्यांनीच हा उपाय करावा. उपाय खुप सोपा हा आणि तो फक्त रात्रीच करण्याचा आहे. तो सुद्धा झोपण्याच्या आधी.
उपाय कसा करायचा या बद्दल आपण माहिती जाणून घेऊ. आपल्या लागणारे साहित्य एक तेजपत्ता लागणार आहे. त्या सोबत दोन इलायची लागणार आहेत. रोज तरी झोपताना आपल्या गॅस शेगडी वर एक तवा ठेवायचा आहे. ज्या ठिकणी आपण स्वयंपाक करतो त्या ठिकणी हा उपाय करायचा आहे. जर का गॅस शेगडी नसेल त्या ठिकाणी तुम्ही चुलीवर स्वयंपाक करत असाल तर चुलीवर तवा ठेवा. तवा ठेवल्यानंतर त्या तव्यावर एक तेजपत्ता ठेवा आणि त्यावर इलायची ती सुद्धा हिरव्या रंगाची ठेवायची आहे. आणि झोपायचे आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या नंतर तेजपत्ता आणि इलायची हातात घ्याची आहे. आणि गॅस चालू करायचा आहे. आणि त्यावर तेज पत्ता आणि इलायची ठेवायची आहे. ती पूर्ण जळू द्यायची आहे. जी राख उरेल ती आपल्याला कोणत्याही झाडा खाली टाकून द्याची आहे. हा उपाय रोज आपल्या नित्य नियमाने करायचा आहे. आपल्या मनापासून हा उपाय नक्की करा नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




