वास्तू शास्त्र

घरात ह्या ४ मातीच्या वस्तू ठेवल्याने होतात शुभमंगल फायदे.

मित्रांनो वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनात फार महत्व आहे. आपल्या घरातील सर्व वस्तू व वास्तूची रचना हि वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर ह्या सर्वांचा शुभ परिणाम आपल्यावरती होतो. वास्तुशास्त्राप्रमाणे केलेलं कोणतेही काम हे शुभ व मंगलकारी ठरते. श्री कृष्ण भगवान हे वास्तुशास्त्राचे मोठे जाणकार होते. त्यांनी राजा युधिष्ठिर ह्यांचा जेव्हा राज्याभिषेक सोहळा झाला होता त्यावेळी त्यांनी महाराज युधिष्टिर ह्यांना वर व राज्याच्या समृद्धीसाठी काही वास्तूचे नियम सांगितले होते, ह्याच काही वास्तुशास्त्रातील नियमांचे पालन करून आपण आपले जीवन देखील सुखमय करू शकतो.

ह्या काही वस्तू जर आपण आपल्या घरात ठेवल्या तर घरात दारिद्र्य चुकूनही येत नाही, ह्या काही ५ वस्तू आहेत ह्या घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते, तसेच घरात नेहमी सुख समृद्धी नांदते. श्री कृष्ण भगवंत असे म्हणतात कि मानवी शरीर हे मातीपासूनच बनलेलं आहे. म्हणून मातीच्या काही वस्तू घरात ठेवल्याने आपल्या घरात काढिहि पैस्यांची कमी राहत नाही, अश्या घरात देवी लक्ष्मी वास्तव्य करते. चला जाणून घेऊयात त्या वस्तू कोणत्या आहेत.

श्री कृष्णांनी महाराज युधिष्ठिराला सांगितले होते कि राज्यात कधीही पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून राज्याच्या उत्तर पूर्व भागात म्हणजे ईशान्य कोन्यात आपण पाण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे आपल्या घरात देखील ईशान्य दिशेला पाण्याने भरलेला घडा अवश्य ठेवावा. ह्यामुळे नेहमी सुख संपन्नता राहते. तसेच घराच्या बाहेर किंवा घराच्या छतावर आपण ईशान्य दिशेलाच पक्ष्यांसाठी आपण मातीचे पाण्याचे भांडे अवश्य ठेवावे. तसेच घराच्या ह्या उत्तर पूर्व दिशेला मातीपासून बनवलेला एक पक्षी देखील ठेवावा.

मातीपासून बनवलेला पक्षी ठेवल्याने आपल्या घरातील वातावरण हे नेहमी सकारात्मक व आनंदमय राहील. आपल्या देवघरात सोने, चांदी, पितळ ह्यापासून बनवलेल्या मूर्ती असतात, परंतु ह्या मूर्तींसोबत आपण देवघरात मातीपासून बनवलेली आपण एक मूर्ती आपण अवश्य ठेवावी. ह्यामुळे आपल्याला देवघरातील देवपूजनाचे पूर्ण फळ प्राप्त होते. तसेच दिवे देखील आपल्याला विविध धातूंचे व विविध आकारांचे असतात पंरतु मातीच्या दिव्यांचे जे महत्व आहे ते इतर कोणत्याही दिव्यांचे नाही म्हणून दररोज संध्यकाळी आपल्या घराच्या उंबरठयावर आपण दोन मातीचे दिवे आपण अवश्य लावावेत.

ह्या मातीच्या दिव्यांमध्ये आपण गाईच्या साजूक तुपाचा वापर करावा, तसेच आपण कापूर लावला असेल तर त्यात दोन लवंगा आपण अवश्य टाकाव्यात त्यामुळे आपल्या घरातील नाकारात्मकता नष्ट होते, आणि घरात सकरात्मक शक्तींचा प्रवेश होतो. मित्रांनो आपल्या आता आपल्या लक्षात आले असावे के कोणत्या गोष्टी ठेवल्याने त्याचे काय परिणाम होतात. आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट