सध्या संपूर्ण देशात चर्चा चालू आहे ती म्हणजे काही दिवसा पूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट KGF Chapter २. सध्या या चित्रपटाचे नवनवीन विक्रम बॉक्स ऑफिस वर चालू आहेत. काही मीडिया रिपोर्ट नुसार आजच्या दिवसा पर्यंत आठशे करोड रुपयची कमाई केली आहे. सध्या सुद्धा हा चित्रपट हाऊस फुल चालू आहे. म्हणजे येणाऱ्या काही दिवसात हा चित्रपट अजून नवीन रेकॉर्ड करेल यात शंका नाही.
ज्या प्रमाणे KGF Chapter २ हा चित्रपट गाजत आहे त्याच प्रमाणे आधी आलेला KGF म्हणजे याचा पहिला भाग सुद्धा खुप प्रसिद्ध झाला होता. त्यावेळेस सुद्धा या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर रेकॉर्ड केले होते. तसेच काही प्रेक्षकांच्या मता नुसार KGF Chapter ३ सुद्धा येऊ शकतो. पण याबद्दल सध्या तरी काही बोलता येत नसले तरी येणाऱ्या काळात याबद्दल सविस्तर माहिती मिळते.
KGF Chapter २ चा हिरो यश ची खरी गोष्ट.
KGF Chapter २ हा चित्रपट मुळात कन्नड भाषेत तयार झाला होता. नंतर हा सिनेमा इतर भाषेत सुद्धा डब करण्यात आला. जवळ पास पाच भाषेत हा चित्रपट डब झाला आहे. हिंदी, कन्नड, तेलगू, मल्याळम, आणि तमिळ. मीडिया रिपोर्ट नुसार सात दिवसात पाचशे करोड रुपयाची कमाई केली आहे. या चितपटात काम करणारे सर्व कलाकार सध्या प्रकाश झोत्यात आहेत.
या चिपटात काम करणारा हिरो म्हणजे यश सध्या सर्व रसिकांच्या मनावर राज करत आहे. यश याबद्दल बऱ्याच नवनवीन गोष्टी सध्या जगासमोर येत आहेत. असे बोले जाते यश घरातून फक्त तीनशे रुपय घेऊन बाहेर पडला होता. पण आज त्याच्याकडे करोड रुपयांची संपत्ती तयार झाली आहे. यश ने खुप कष्ट करून हि संपत्ती तयार केली आहे. यश बद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊ.
KGF Chapter २ च्या हिरोचे खरे नाव तुम्हला माहित आहे का?
यशचे खरे नाव नवीन कुमार गोडा आहे त्याचा जन्म कर्नाटक मधील भूवनहली या गावी झाला आहे. यश हा खुप सामान्य घरातून आला आहे. त्याचे वडील हे BMTC मध्ये बस ड्राइवर होते. तसेच यश ने म्हणजे नवीन कुमार गोडा याने लहान पनापासून हिरो व्ह्याचे असे स्वप्न बाळगुन होता. त्याला शिक्षणात कधीच रस नव्हता.
पण त्याचा घरातून त्याला फारशी मद्दत मिळत नव्हती. त्याच्या वडिलांना यश ने चांगले शिक्षण घ्यावे असे वाटत होते. पण यश हा त्याच्या मतांवर ठाम होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला एक अट घातली तुला जितका वेळ घ्याचा आहे तो घे पण तू वापस घरी आल्यास तुला मी जे सांगेन तुला ते करावा लागेल. आणि त्यावेळेस यश तीनशे रुपय घेऊन बेंगलुर ला आला.
KGF Chapter २ सात दिवसाची कमाई जाणून घ्या.
तसे पहिल्या गेल्यास यश हा मध्यम घरातून असल्यामुळे चित्रपट व्यवसायात कोणीच ओळखीचे नव्हते. सुरुवातील जे काही काम मिळेल ते तो करत होता.सुरवातीला तो छोट्या पाड्यावर काम करत होतात. नंतर काही दिवसात त्याला सहाय्यक कलाकारचा ( supporting actors) रोल मिळाला होतात. त्याचा पहिला चित्रपट २००९ यावर्षी प्रदर्शित झाला होतात. त्याचे नाव होते. kallara santhe असे होते. त्याने त्यांच्या पहिला चित्रपटाचे जाहिरात हि रिक्षा चालून करत असे.
आपण आज KGF Chapter २ हा चित्रपट तो त्याच्या खाजगी विमान (private jet) मधून संपूर्ण देशात प्रमोशन करत आहे. बेंगुलर मध्ये त्याचे आलिशान घर असून जवळ पास जगातील सर्वात महाग आणि आलिशान असेलेल्या गड्या त्याचा जवळ आहेत. त्याच्या आलिशान घराची किंमत जवळ पास सहा करोड आहे. यशच्या आयुष्यातून आपल्याला एक गोष्ट नक्की शिकण्यासारखी आहे. ती म्हणजे कष्ट करण्याची तयारी आणि मनात जिद्द असेल तर नक्की आपण यश प्राप्त करू शकतो.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.




