नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो घरातील स्वयंपाक घर हि महिलांची हक्काची जागा असते. ह्या खोलीमध्ये काही वास्तू दोष असेल तर महिलांना अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. स्वयंपाक घर म्हणजे अन्नपूर्णेचे स्थान आहे तसेच धनधान्य असते त्यामुळे लक्ष्मी माता देखील इथे असते. म्हणून वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे नेहमी योग्य दिशेलाच असावे. स्वयंपाकघराचा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्यावर आपण स्वयंपाक करत असतो ती शेगडी स्वयंपाकघरात हि शेगडी आपण दक्षिण पूर्व दिशा म्हणजे आग्नेय दिशेला असावे. आग्नेय दिशा हि अग्नीची दिशा असे मानले जाते म्हणून आपण घरातील गॅस शेगडी हि ह्या दिशेलाच ठेवावी ती जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला ठेवले तरी चालेल.
स्वयंपाकघर संपूर्ण वास्तुशास्त्र माहिती.
घरातील दक्षिण व पश्चिम दिशेला स्वयंपाकघर असू नये ह्यामुळे घरातील सदस्य मानसिक रित्या अशांत राहतात तसेच घरातील लोक आजारी पडतात. स्वयंपाकघरातील जड वस्तू म्हणजे गॅस सिलेंडर, फ्रिज, मिक्सर अश्या वस्तू आपण दक्षिण दिशेला असाव्यात. आपले पिण्याचे पाणी अश्या सर्व वस्तू पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवाव्यात. फ्रिज हे दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच असावे. स्वयंपाकघरात देवघर देखील असू नये ह्यामुळे घरामध्ये एकमेकांविषयी राग निर्माण होतो. घराच्या मुख्य दरवाजवर कधीही स्वयंपाकघर असू नये ह्यामुळे घरातील कर्त्या पुरुषाच्या कामत अडचणी निर्माण होतात.
स्वयंपाकघरात बेसिन दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावे परंतु आग व पाण्याच्या मधून जाऊ नये. स्वयंपाकघरात घरातील किचन कट्टा बनविताना लाल रंगाच्या ग्रेयनाईट चा वापर करावा. स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवन्याऱ्याचे तोंड हे पूर्व दिशेला असावे. स्वयंपाकघरात निळा किंवा आकाशी कलर देऊ नये.उष्टे व खरकटे भांडे स्वयंपाकघरात तसेच राहू देऊ नये. ह्यामुळे आपल्या घरात नाकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




